सत्तार-खैरेंचा हातात हात, उद्धव ठाकरेंकडून दोघांचे पॅचअप

| Updated on: Jan 06, 2020 | 8:14 PM

सत्तार आणि खैरेंचे समज गैरसमज दूर झाले आहेत. यापुढे पक्षाच्या आदेशाप्रमाणे काम करणार," असे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी  (Abdul Sattar and chandrakant khaire at matoshree) सांगितले.

सत्तार-खैरेंचा हातात हात, उद्धव ठाकरेंकडून दोघांचे पॅचअप
Follow us on

मुंबई : शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी नुकतंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे, अब्दुल सत्तार आणि चंद्रकांत खैरेंची बैठक पार पडली. या बैठकीनंतर अब्दुल सत्तार, चंद्रकांत खैरे आणि सार्वजनिक मंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतची माहिती दिली. सत्तार आणि खैरेंचे समज गैरसमज दूर झाले आहेत. यापुढे पक्षाच्या आदेशाप्रमाणे ते दोघेही काम करतील अशा विश्वास एकनाथ शिंदेंनी व्यक्त  (Abdul Sattar and chandrakant khaire at matoshree) केला.

“कालपर्यंत झालेल्या सगळ्या घटनांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहिती आहे. या सर्व विषयांवर चर्चा झालेली आहे. आता दोघांनाही एकत्र काम करण्याचं, पक्षाचे आदेश आणि पक्षाची शिस्त पाळण्याचे  ठरवले आहे. त्यामुळे आता कुठलाही वाद-विवाद नाही. हे दोघेही तुमच्या समोर आहेत,” असे एकनाथ शिंदे म्हणाले.

“अब्दुल सत्तार हे शिवसेनेचे मंत्री आहेत. पक्षवाढीसाठी ते संभाजीनगरमध्ये काम करतील. चंद्रकांत खैरे आणि अब्दुल सत्तार हे दोन्ही मिळून संभाजीनगरमध्ये पक्ष वाढवतील. संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे सात आमदार आहेत. कालपर्यंत जे झालं ते झालं. आता तो विषय संपलेला आहे.” असेही शिंदे म्हणाले.

शिवसेनेचे नियम, शिस्त पाळू : चंद्रकांत खैरे

“वाद हा मिटलेला आहे. बरीच चर्चा झाली. अब्दुल सत्तार माझे मंत्री आहेत मी त्यांच्या शिवसेनेचा नेता आहे. त्याच्यामुळे शिवसेनेचे नियम आणि शिस्त आम्ही सगळे व्यवस्थित पाळू. आमच्या पुढच्या निवडणुकीत आम्ही हातात हात घालून काम करु, असे चंद्रकांत खैरे (Abdul Sattar and chandrakant khaire at matoshree) म्हणाले.

पक्षाच्या आदेशानुसार काम करु : अब्दुल सत्तार

“आदरणीय खैरे साहेब हे शिवसेनेचे नेते आहेत. मी मंत्री आहे. दोघांच्या समज-गैरसमजमध्ये ज्या घडलेल्या घटना आहेत याच्यानंतर त्या घडणार नाहीत. पक्षाच्या आदेशानुसार एकत्रपणे काम करु. मुख्यमंत्री मातोश्रीवरुन जे आदेश देतील त्यांचे तंतोतंत पालन केले जाईल. यानंतर अशाप्रकारची घटना घडणार नाहीत याची काळजी आम्ही घेऊ,” असे अब्दुल सत्तार म्हणाले.

अब्दुल सत्तारांनी राजीनाम्याचं वृत्त फेटाळलं, माझा कंट्रोल ‘मातोश्री’वर, 9 तासांनी सत्तारांची प्रतिक्रिया

काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेले आमदार अब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचं वृत्त शनिवारी (4 जानेवारी) आलं. कॅबिनेट मंत्रिपदाची आशा असताना पदरी पडलेलं राज्यमंत्रिपद आणि औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदावरुन अब्दुल सत्तार गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेवर कमालीचे नाराज होते. या नाराजीतूनच सत्तार यांनी राज्यमंत्रिपदाचा राजीनामा (Abdul Sattar resigns as MOS) दिल्याचं सांगण्यात येत होतं.

यानंतर अब्दुल सत्तार यांनी जवळपास 9 तासांनी हॉटेलबाहेर येऊन त्यांनी माध्यमांकडे राजीनाम्याबाबतचं स्पष्टीकरण दिलं. अब्दुल सत्तार यांनी राजीनाम्याचं वृत्त फेटाळलं, शिवाय ज्यांनी माझ्या राजीनाम्याच्या पुड्या सोडल्या त्यांना विचारा, असं अब्दुल सत्तार म्हणाले. दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी (5 जानेवारी) अब्दुल सत्तार यांनी उद्धव ठाकरेंशी चर्चा केली.

शिवसेनेची बदनामी व्हावी यासाठी माझ्या राजीनाम्याची पुडी सोडली : अब्दुल सत्तार

“शिवसेनेची बदनामी व्हावी यासाठी काही ‘हितचिंतकांनी’ माझ्या राजीनाम्याची पुडी सोडली. मात्र, हा सर्व प्रकार थांबावा यासाठी आज मी ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरे यांना संपूर्ण घटनाक्रमाची माहिती दिली. उद्धव ठाकरेंनी माझं बोलणं ऐकूण घेतलं. यानंतर आता उद्धव ठाकरे इतर लोकांना बोलावणार आहेत. त्या लोकांशी चर्चा केल्यानंतर उद्धव ठाकरे योग्य तो निर्णय घेतील”, असे स्पष्टीकरण शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलं.