West Bengal : दिलीप घोष यांच्या सभेपूर्वी भाजपच्या दोन गटांत हाणामारी, टीएमसी नेत्यांच्या प्रवेशावर कार्यकर्ते नाराज

| Updated on: Dec 21, 2020 | 4:12 PM

दिलीप घोष यांची सभा सुरु होण्यापूर्वीच दुर्गापूरमध्ये दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली.

West Bengal : दिलीप घोष यांच्या सभेपूर्वी भाजपच्या दोन गटांत हाणामारी, टीएमसी नेत्यांच्या प्रवेशावर कार्यकर्ते नाराज
Follow us on

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांबाबत भाजपने आपली कंबर कसली आहे. याच धर्तीवर पश्चिम बंगालच्या दुर्गापूरमध्ये सोमवारी भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांची सभा होती (West Bengal BJP two Factions Fight Before Dilip Ghosh Public Meeting).

दिलीप घोष यांची सभा सुरु होण्यापूर्वीच दुर्गापूरमध्ये दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. भाजप कार्यकर्त्यांनी टीएमसीमधून भाजपात प्रवेश घेण्यासाठी आलेल्या लोकांचा विरोध केला. यामुळे भाजपाच्या दोन गटांमध्ये वाद सुरु जाला. या दरम्यान, स्टेजवर चढून भापज कार्यकर्त्यांनी एकमेकांवर हल्ला चढवला.

भाजप कार्यकर्त्यांच्यामते, “आम्ही सर्व कार्यकर्ते याचा विरोध करतो. कारण, जर टीएमसीतून आलेली लोक भाजपात प्रवेश घेतील, तर आम्ही याविरोधात जाऊ.”

यापूर्वी शनिवारी गृह मंत्री आणि भाजप नेते अमित साह यांच्या उपस्थितीत शुभेंदु अधिकारी यांच्यासह 11 खासदार आणि आमदारांनी भाजपात प्रवेश केला. शुभेंदु अधिकारी यांनी नुकतंच टीएमसीचा राजीनामा दिला होता.

शुभेंदु अधिकारी यांच्याशिवाय, टीएमसी आमदार वनश्री माइती, आमदार दिपाली विश्वास, आमदार शीलभद्र दत्ता, आमदार सैकत पांजा आमदार विश्वजीत कुंडू यांचा समावेश होता.

त्याशिवाय, नागराकाटा येथून टीएमसी आमदार सुकरा मुंडा, काँग्रेस आमदार सुदीप मुखर्जी, आमदार अशोक डींडा, खासदार सुनील मंडल, माजी खासदार दशरथ तिर्की, माजी मंत्री श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी देखील भाजपात प्रवेश घेतला.

West Bengal BJP two Factions Fight Before Dilip Ghosh Public Meeting

संबंधित बातम्या :

शहांचा दौरा आटोपला अन् भाजप खासदाराची बायको टीएमसीत

Special report | पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांवर हल्ले का होतात?, अमित शाह काय म्हणाले?