शहांचा दौरा आटोपला अन् भाजप खासदाराची बायको टीएमसीत

भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोन दिवसाच्या दौऱ्यात संपूर्ण पश्चिम बंगालमधील राजकारण ढवळून काढले आहे. (Bengal election 2021: BJP MP Saumitra Khan's wife Sujata Khan joins tmc)

शहांचा दौरा आटोपला अन् भाजप खासदाराची बायको टीएमसीत
Follow us
| Updated on: Dec 21, 2020 | 2:47 PM

कोलाकाता: भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोन दिवसाच्या दौऱ्यात संपूर्ण पश्चिम बंगालमधील राजकारण ढवळून काढले आहे. ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीचे खासदार, आमदार आणि नगरसेवकांना पक्षात प्रवेश देऊन शहा यांनी निवडणुकीचे रणशिंगच फुंकले आहे. मात्र, शहा यांचा दौरा आटोपताच भाजप खासदाराच्या पत्नीने टीएमसीत प्रवेश केल्याने भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. तर पत्नीच्या या निर्णयामुळे नाराज झालेल्या खासदाराने थेट पत्नीलाच तलाक देण्याची नोटीस पाठवण्याचा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. (Bengal election 2021: BJP MP Saumitra Khan’s wife Sujata Khan joins tmc)

भाजपच्या या खासदाराचं नाव सौमित्र खान असून त्यांच्या पत्नीचं नाव सुजाता मंडल असं आहे. मी अनुसूचित जमातीतून येणारी दलित महिला आहे. मला राजकारणात भाजपसह पतीशीही लढाई लढावी लागली आहे. भाजपमध्ये केवळ संधीसाधूंनाच संधी दिली जात आहे. त्यामुळेच मी भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे, असं सुजाता यांनी सांगितलं. भाजप केवळ 2 ते 18 जागा जिंकू शकतो हे माहीत होतं, तेव्हापासून आम्ही भाजपसाठी प्रचार करतोय. त्यावेळी आम्हाला कोणतंही संरक्षण नव्हतं आणि कोणताही बॅकअप नव्हता. आम्ही जनतेसाठी लढलो आणि जिंकलोही. भाजपमध्ये मला कोणताच मान सन्मान दिला गेला नाही, त्यामुळेच मी अजूनही एक लढाई लढतेय, असं मला वाटत आहे, असंही त्या म्हणाल्या.

यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. पश्चिम बंगालमध्ये भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदाचे 6 आणि उपमुख्यमंत्रीपदाचे 13 दावेदार आहेत. त्याबाबत वरिष्ठांकडूनही काहीच ठोस आश्वासन दिलं जात नाही, अशी टीका त्यांनी केली.

तलाक देणार?

दरम्यान, सुजाता यांच्या निर्णयावर त्यांचे पती सौमित्र खान नाराज आहेत. त्यांनी सुजाता यांना तलाक देण्याची तयारी सुरू केली आहे. तसेच सुजाताच्या घरी तैनात करण्यात आलेले सुरक्षा रक्षकही त्यांनी हटवले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सौमित्र आणि सुजाता यांच्या दरम्यान खटके उडत असून घरातील वाद आता रस्त्यावर आल्याचं बोललं जात आहे.

भाजपच्या विजयात हात

सुजाता यांचा भाजपच्या पश्चिम बंगालमधील विजयात मोठा हात आहे. त्यांनी लोकसभा निवडणुकीत बांकुरा येथील निवडणूक प्रचाराची धुरा सांभाळली होती. सुजाता यांच्या आक्रमक प्रचाराची आणि संघटन कौशल्याची तृणमूल काँग्रेसने धास्ती घेतली होती. त्यामुळेच संपूर्ण निवडणूक पार पडेपर्यंत सुजाता यांना बांकुरा येथे प्रचारास येण्यापासून मनाई करण्यात आली होती. (Bengal election 2021: BJP MP Saumitra Khan’s wife Sujata Khan joins tmc)

संबंधित बातम्या:

ममता बॅनर्जी-अमित शाह, दोघांमध्ये कोण श्रीमंत, कुणाकडे किती पैसा?

भेटा काँग्रेसच्या नव्या चाणक्यांना, प्रियंका गांधी काय काय करतायत ते वाचा

बंगालवर प्रशांत किशोरची ‘ट्विटर प्रतिज्ञा’, भाजपला किती जागा मिळणार? खळबळजनक दावा

(Bengal election 2021: BJP MP Saumitra Khan’s wife Sujata Khan joins tmc)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.