भेटा काँग्रेसच्या नव्या चाणक्यांना, प्रियंका गांधी काय काय करतायत ते वाचा

अहमद पटेल यांच्या निधनांनंतर त्यांची भूमिका प्रियांका गांधी पार पाडत असल्याचं बोललं जातेय. (Priyanka Gandhi Ahmed Patel)

भेटा काँग्रेसच्या नव्या चाणक्यांना, प्रियंका गांधी काय काय करतायत ते वाचा
प्रियंका गांधी, महासचिव, काँग्रेस
Follow us
| Updated on: Dec 21, 2020 | 1:21 PM

नवी दिल्ली: प्रियांका गांधींच्या प्रयत्नांमुळे गेल्या काही दिवसांमध्ये काँग्रेसमधील वाद शांत होताना दिसत आहेत. काँग्रेसचे चाणक्य अहमद पटेल यांच्या निधनांनंतर काँग्रेसमध्ये पोकळी निर्माण झाली होती. प्रियांका गांधी अहमद पटेलांची भूमिका निभावत आहेत, असं राजकीय क्षेत्रातील जाणकारांचं मत आहे. प्रियांका गांधींनी काँग्रेस नेतृत्व आणि  23 वरिष्ठ नेते यांच्यातील तणाव देखील कमी करण्याचा प्रयत्न केला, असल्याचं बोललं जातेय. (Priyanka Gandhi bridges gap between Senior leaders after Ahmed Patel death)

टाईम्स ऑफ इंडियांच्या वृत्तानुसार प्रियांका गांधी नोव्हेंबर महिन्यात काँग्रेसच्या वरिष्ठ 23 नेत्यांशी चर्चा केली होती. काँग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल(Ahmed Patel) यांना श्रद्धांजली देताना प्रियांका गांधींनी सर्व नेत्यांना एकजूट राखण्याचे आवाहन केले होते. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी संवाद वाढवला.

प्रियांका गांधींच्या प्रयत्नाने 23 नेत्यांसोबत बैठक

प्रियांका गांधींच्या प्रयत्नांमुळे शनिवारी (19 डिसेंबरला) पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष मिळावा यासाठी पत्र लिहिणाऱ्या नेंत्यांची आणि काँग्रेस नेतृत्वाची बैठक शक्य झाली, असं म्हटलं जात आहे. ऑगस्ट महिन्यात पक्षनेतृत्वाला पत्र लिहेलल्या नेत्यांनी बैठक यशस्वी झाल्याचे सांगितले होते. ऑगस्टमध्ये काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा आणि कपिल सिब्बल सहीत काँग्रेसच्या 23 नेत्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहिलं होतं.

राजस्थानमधील सत्तासंघर्ष थांबवण्यात यश

काँग्रेसशासित राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यामध्ये जून महिन्यात तणाव निर्माण झाला होता. यानंतर राजस्थान सरकारला धोका निर्माण झाला होता. प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांनी सचिन पायलट यांच्यांशी चर्चा करुन त्यांना काँग्रेसमध्येच थांबवण्यात यश मिळवले. यामुळे राजस्थानातील काँग्रेस सरकारला असणारा धोका कमी झाला.

राहुल गांधींकडे पुन्हा अध्यक्षपद?

काँग्रेसच्या पत्र लिहीणाऱ्या 23 नेत्यांची बैठक 10 जनपथ येथे झाली होती. याबैठकीला सोनिया गांधी यांच्यासह माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, ज्येष्ठ काँग्रेस नेते ए. के. अँटनी, पी. चिदंबरम, गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, शशी थरूर, भूपिंदरसिंग हुड्डा, के. सी. वेणुगोपाल यांच्यासह राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत राहुल गांधी यांना काँग्रेसचे अध्यक्ष करण्याची मागणी करण्यात आली होती. यानंतर राहुल गांधींनी पक्ष जी जबाबदारी देईल ती पार पाडण्यास तायर असल्याचे राहुल गांधींनी सांगितले होते. पक्षातील नाराजी दूर करण्यासाठी ही बैठक अत्यंत महत्त्वाची असल्याचं मानलं जात आहे.

अहमद पटेल यांचे निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल 25 नोव्हेंबरला  निधन झालं. अहमद पटेल यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांची प्रकृती अधिकच ढासळली होती. अहमद पटेल काँग्रेसचे चाणक्य म्हणून ओळखले जात होते. काँग्रेसमध्ये निर्माण होणाऱ्या अडचणी सोडवण्यामध्ये त्यांची महत्वाची भूमिका असायची.

संबंधित बातम्या:

Congress: काँग्रेससाठी ऐतिहासिक दिवस; ते ‘स्पेशल 23’ इतिहास घडवणार की विजनवासात जाणार?

सोनियांचं उद्धव ठाकरेंना पत्र, पण काय आहे त्यात? वाचा महाराष्ट्र प्रभारी काय सांगतायत?

(Priyanka Gandhi bridges gap between Senior leaders after Ahmed Patel death)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.