VIDEO : 'जय श्री राम'च्या घोषणेमुळे ममता बॅनर्जी चिडल्या, गाडीतून उतरुन लोकांवर धावल्या

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जय श्री रामच्या घोषणा दिल्यामुळे ममता बॅनर्जी कार्यकर्त्यांवर चिडल्या. विशेष म्हणजे गाडीतून चक्क बाहेर येत त्यांनी कार्यकर्त्यांच्या अंगावर धाव घेतली. हा व्हिडीओ पश्चिम बंगालमधील चंद्रकोण येथील आहे. पश्चिम बंगालमधील चंद्रकोण येथे एका उमेदवाराच्या प्रचारासाठी प्रचाररॅलीच आयोजन केलं होतं. या …

VIDEO : 'जय श्री राम'च्या घोषणेमुळे ममता बॅनर्जी चिडल्या, गाडीतून उतरुन लोकांवर धावल्या

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जय श्री रामच्या घोषणा दिल्यामुळे ममता बॅनर्जी कार्यकर्त्यांवर चिडल्या. विशेष म्हणजे गाडीतून चक्क बाहेर येत त्यांनी कार्यकर्त्यांच्या अंगावर धाव घेतली. हा व्हिडीओ पश्चिम बंगालमधील चंद्रकोण येथील आहे.

पश्चिम बंगालमधील चंद्रकोण येथे एका उमेदवाराच्या प्रचारासाठी प्रचाररॅलीच आयोजन केलं होतं. या प्रचार रॅलीसाठी चंद्रकोणच्या आरामबाग येथे जात असताना अचानक काही भाजप कार्यकर्त्यांनी जोरजोरात जय श्री रामच्या घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी गाडीची काच खाली करत, गाडी थोडावेळ थांबवण्यास सांगितले.

गाडी थांबवल्यानंतर ममता बॅनर्जी खाली उतरल्या. ममता यांना खाली उतरलेले पाहाताच काही जणांनी तिथून पळ काढला. घोषणा देणाऱ्यांनी पळ काढल्यानंतर त्या रॅलीसाठी रवाना होण्यास परत गाडीत बसल्या. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी जय श्री रामच्या घोषणा देण्यास सुरुवात केली.

घोषणांनी संतापलेल्या चिडत ममता पुन्हा गाडीतून खाली उतरल्या. गाडीतून उतरल्यानंतर त्यांनी थेट भाजप कार्यकर्त्यांच्या अंगावर धाव घेतली. त्यानंतर त्यांनी त्या कार्यकर्त्यांना इकडे या असे सांगितले. मात्र तरीही त्या कार्यकर्त्यांनी जय श्री रामच्या घोषणा तशाच सुरु ठेवल्या.

याबाबत एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना, “हे पश्चिम बंगालमध्ये राहणारे नाही. जय श्री रामची घोषणा देणारे हे तृणमूलचे कार्यकर्ते नसून हे भाजपचे आहेत असा आरोपही त्यांनी केली आहे. तसेच हे सर्व  गुन्हेगार असून यांनी मला शिवीगाळ केली आहे”. अशी प्रतिक्रिया ममता बॅनर्जींनी दिली.

पाहा व्हिडीओ :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *