Chandrakant Patil : ‘मराठा, ओबीसी समाजाला कळून चुकलं पवारसाहेब काय आहेत, मराठा समाजासाठी त्यांनी काय केलं?’ चंद्रकांतदादांचा सवाल

'आता मराठा समाजाला कळून चुकलं की पवारसाहेब म्हणजे काय. आता ओबीसी समाजाला कळून चुकलं की पवार साहेब काय आहेत. सगळ्यांना कळून चुकणार. असा आव आणायचा की मीच तारणहार आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काय केलं?', असा सवाल पाटील यांनी केलाय.

Chandrakant Patil : मराठा, ओबीसी समाजाला कळून चुकलं पवारसाहेब काय आहेत, मराठा समाजासाठी त्यांनी काय केलं? चंद्रकांतदादांचा सवाल
शरद पवार, चंद्रकांत पाटील
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: May 05, 2022 | 6:56 PM

कोल्हापूर : राज्यात सध्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. त्यातच बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडी सरकारला दणका दिलाय. ओबीसी आरक्षणाशिवाय (OBC Reservation) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम 15 दिवसांत जाहीर करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिला आहे. त्यानंतर भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली जातेय. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी महाविकास आघाडी सरकारचे मार्गदर्शक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार टीका केलीय. ‘आता मराठा समाजाला कळून चुकलं की पवारसाहेब म्हणजे काय. आता ओबीसी समाजाला कळून चुकलं की पवार साहेब काय आहेत. सगळ्यांना कळून चुकणार. असा आव आणायचा की मीच तारणहार आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काय केलं?’, असा सवाल पाटील यांनी केलाय.

‘मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पवारांनी काय केलं?’

भाजपला समाजात आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं, पण भाजप कधीही त्यांच्या डावात सापडली नाही. भाजप समाजातील सर्व स्तरांमध्ये वाढतेय. आता मराठा समाजाला कळून चुकलं की पवारसाहेब म्हणजे काय. आता ओबीसी समाजाला कळून चुकलं की पवार साहेब काय आहेत. सगळ्यांना कळून चुकणार. असा आव आणायचा की मीच तारणहार आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काय केलं? एवढ्या तुमच्या संस्था आहेत, त्यात एक निर्णय करुन टाका ना की मराठा समाजाला इतके इतके टक्के देणार. काही त्याचं ऑन पेपरही आणावं लागत नाही. कोर्टातही कुणी जाणार नाही. पण नाही… इच्छाच नाही. आपण मोठं व्हायचं आणि बाकी सगळे आपल्या गाडीमागे फिरणारे निर्माण करायचे, अशीच निती राहिली आणि ही निती आता उघड होत चालली आहे. भाजपचं नाव घेतल्यानं काही फरक पडत नाही. समाजाला माहिती आहे की कुणाची काय भूमिका होती.

‘देवेंद्र फडणवीसांची कर्तृत्व म्हणून ते मुख्यमंत्री झाले’

रावसाहेब दानवे कोणत्या पार्श्वभूमीवर म्हणाले मला माहिती नाही. पण भाजपने आणि शिवसेनेनं सुद्धा मेरिटवर निर्णय केलेला आहे. देवेंद्रजी ब्राह्मण आहेत म्हणून मुख्यमंत्री झाले नाहीत आणि ते ब्राह्मण आहेत म्हणून त्यांनी मुख्यमंत्री होऊ नये असंही नाही. त्यांच्यात कर्तृत्व आहे म्हणून ते मुख्यमंत्री झाले. त्या आधी मनोहर जोशी कर्तृत्व होतं म्हणून झाले. त्यानंतर राणे झाले. आधी विलासराव देशमुखांपासून मोठी आहे. या राज्याने कधीही जातीकडे बघुन मुख्यमंत्री ठरवले नाहीत याचं मोठं उदाहरण वसंतराव नाईक आहेत. वसंतराव नाईक अशा समाजातून येतात ज्या समाजाची संख्या अतीशय कमी असून कर्तृत्वामुळे 11 – 11 वर्षे मुख्यमंत्री म्हणून त्यांना स्वीकारलं. भारतीय जनता पार्टी नेहमी मेरिटवर चालते, असंही पाटील म्हणाले.