
मुंबई : देशात आणि राज्यात लोकशाहीचा मोठा उत्सव सुरु झालाय. महाराष्ट्रात निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला. राज्यात सगळीकडे निवडणुकीचेच वातावरण दिसत आहे. बिगूल वाजलं. तुताऱ्या फुंकल्या. सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आलेत. कुणाला किती जागा मिळणार? कुणाचं सरकार येणार याच्याच चर्चा झडताना दिसत आहे. ज्या राज्याने 50 टक्के महिला आरक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. ज्या राज्यात 50 टक्के महिला मतदान करतात त्याच राज्याच्या राजकारणात महिलांचे स्थान काय आहे? क्षमता असूनही महिला उमेदवार यांना का डावलले जाते? हा महत्वाचा परंतु एक जटील प्रश्न राज्यासमोर आहे. मात्र, असे असले तरी राज्याचा नव्हे देशाच्या राजकारणात आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटविणाऱ्या महिलाही याच राज्याने दिल्या आहेत. 17 व्या शतकामध्ये राजकारणाला नवी दिशा देणारी एक महिला महाराष्ट्रात होऊन गेली. त्यांनी प्रत्यक्ष राज्यकारभार केला नाही. पण, आपल्या मुलाला त्यांनी राजकारणाचे धडे दिले. त्यामुळे महाराष्ट्रात स्वराज्य अवतरले होते. त्या होत्या...