AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिला आयोग अध्यक्षपदावर माजी IPS मीरा बोरवणकर यांची नियुक्ती होणार ?

राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष पद रिक्त आहे. आता या पदावर माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी नियुक्ती होणार असल्याची चर्चा आहे.

महिला आयोग अध्यक्षपदावर माजी IPS मीरा बोरवणकर यांची नियुक्ती होणार ?
meera borwankar
| Updated on: May 04, 2026 | 10:12 PM
Share

राज्यात एकीकडे महिलांवरील अत्याचारात वाढ झाली असताना हे पद सध्या रिक्त आहे. या पदावरील रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिल्यानंतर या पदावर अजूनही कोणाची नियुक्ती केलेली नाही. त्यातच आता या पदावर माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांच्या नावाची चर्चा सुरु असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. त्यामुळे राज्य महिला आयोगावर तडफदार आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर येणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्य महिला आयोगाच्या पदावर माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांची नियुक्त होणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मीरा बोरवणकर या कर्तव्यदक्ष आणि तडफदार महिला आयपीएस अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. त्यांची या महत्वाच्या पदावर नियुक्त होणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्य महिला आयोगाचे पद गेले अनेक दिवस रिक्त आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी नुकताच महिला आयोगाच्या पदावरुन राजीनामा दिला आहे. भोंदूबाबा अशोक खरात याच्यासोबत रुपाली चाकणकर यांचा फोटो आल्यानंतर त्यांनी या प्रकरणात राजीनामा दिला आहे.

अधिकृत दुजोरा नाही

राज्य महिला आयोगाच्या पदी एखादी माजी आयपीएस अधिकारी नेमण्यात यावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली होती. त्यानंतर यावर चर्चा सुरु असतानाच आता माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांचे नाव या पदासाठी चर्चेत असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. या संदर्भात अद्याप सरकारकडून कोणताही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

‘मॅडम कमिशनर’ मध्ये राजकारण्यांवर आरोप

मीरा बोरवणकर यांनी पुण्याच्या पोलिस आयुक्त म्हणूनही काम केले होते. त्यांनी मुंबई क्राईम ब्रँचचे नेतृत्वही केले होते. त्यांनी अलिकडेच ‘मॅडम कमिशनर’ नावाचे आत्मकथनपर पुस्तक लिहीले होते. या पुस्तकात त्यांनी तत्कालिन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर काही आरोप केल्याने खळबळ उडाली होती.

Follow Us
दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Rohit Pawar | दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी!
Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी! मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
Devendra Fadnavis | मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मुख्यमंत्री फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर...
Manoj Jarange | मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर जरांगे पाटलांची मोठी मागणी
20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी..
Manoj Jarange Patil |  20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी गॅलेक्सी रुग्णालयात दाखल होणार
90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं!
Maratha Reservation | 90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं! 58 लाख नोंदी अन् हैदराबाद गॅझेटवरही मोठी अपडेट
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान