AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Assembly | विधानसभेत महिला दिनाला माजी मंत्री वर्षा गायकवाड का संतापल्या?

सरकारच्या वतीने सुरेश खाडे यांनी भूमिका मांडली. महिला प्रतिनिधींनी मांडलेले विषय आम्ही नोंद करून घेत आहोत. आम्ही इथे उपस्थित असलेले चार मंत्री यावर गांभीर्याने काम करत आहोत, असं आश्वासन त्यांनी दिलं.

Maharashtra Assembly | विधानसभेत महिला दिनाला माजी मंत्री वर्षा गायकवाड का संतापल्या?
Image Credit source: सौ. विधानसभा
| Updated on: Mar 08, 2023 | 4:01 PM
Share

मुंबई : महिला दिनाच्या (Womens day) निमित्ताने आज विधानसभेत (Maharashtra assembly) सर्व महिला आमदारांना बोलण्याची संधी देण्यात आली. आमदार यशोमती ठाकूर बोलत असताना इतर आमदार तसेच मंत्रिमहोदय आपापसात बोलत असल्याने माजी मंत्री वर्षा गायकवाड सभागृहात चांगल्याच भडकल्या. केवळ महिला दिन साजरा करून उपयोग नाही. तर महिला आमदार सभागृहात महिलांचे प्रश्न मांडत असताना, त्यांचं म्हणणं बारकाईने ऐकणं आणि त्या समस्यांचे निराकरण करणं आवश्यक आहे. मात्र त्या बोलत असतानाच त्यात अडथळे निर्माण करणं योग्य नाही, असं वक्तव्य वर्षा गायकवाड यांनी केलं.

यशोमती ठाकूर काय म्हणाल्या?

सभागृहात महिला व बालमंत्री सभागृहात असणं आवश्यक होतं. महिला आमदार सभागृहात बोलत असताना त्याची दखल कुणीही घेत नाही. सरकार महिलांना डावलतंय, असा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला. यावरून विरोधकांचे किती आमदार सभागृहात आहेत, असा सवाल ठाकूर यांना करण्यात आला. मात्र सभागृहात शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून वॉकआऊट झाल्याने एवढी कमी संख्या आहे, हे यशोमती ठाकूर यांनी लक्षात आणून दिलं.

वर्षा गायकवाड संतापल्या…

यशोमती ठाकूर यांच्यानंतर काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड यांनी संतप्त होत म्हणणं मांडलं. एकिकडे महिला आमदार बोलत असताना त्याची नोंद घेतली जात नाही. महिला दिन हा दुर्दैवाने एक सोपस्कार होऊन जातो. महिला दिनाला महिलांनी भाषण करायचं आणि त्यांना ऐकूनही घ्यायचं नाही. खरं तर महिला व बालविकास मंत्री इथे असायला हवे होते. पण तसं नाहीये. समोरचे तीन मंत्री त्यांच्याच गप्पांमध्ये आहेत.. अशी संतप्त प्रतिक्रिया वर्षा गायकवाड यांनी दिली.

‘प्रश्नांवर अहवाल हवा’

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आदिती तटकरे यांनी आपल्या भाषणात मुद्दा मांडला. त्या म्हणाल्या, सभागृहात आम्ही विविध पक्षांच्या आमदार असलो तरी आधी महिलांचं प्रतिनिधित्व करतो. इथे 25 ते 27 आमदार महिला आहोत. आज ज्या ज्या आमदार मनोगत व्यक्त करत आहेत. ज्वलंत प्रश्न मांडले, या संदर्भात शासन काय पद्धतीने पाऊल उचलेल, याचा अहवाल महिला आमदारांना मिळेल. तर ही चर्चा योग्य दिशेने जातेय, हे जाणवेल….

सरकारच्या वतीने सुरेश खाडे यांनी भूमिका मांडली. महिला प्रतिनिधींनी मांडलेले विषय आम्ही नोंद करून घेत आहोत. आम्ही इथे उपस्थित असलेले चार मंत्री यावर गांभीर्याने काम करत आहोत, असं आश्वासन त्यांनी दिलं.

प्रणिती शिंदेंची मागणी काय?

काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी महिला व गृहिणींना सर्वाधिक झळ बसत असलेल्या एलपीजी सिलिंडरचे भाव कमी करावेत, अशी मागणी केली. उद्याच्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात ही तरतूद केली जावी, अशी विनंती केली.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...