AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIVE यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ

यवतमाळ : लोकसभा निवडणुकीत यवतमाळ-वाशिम मतदारसंघात तिहेरी लढत होईल असे चित्र आहे. मात्र, जाणकारांच्या अंदाजानुसार काँग्रेसचे माणिकराव ठाकरे आणि शिवसेनेच्या भावना गवळी यांच्यातच मुख्य लढत होईल. तिसरे उमेदवार भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार पी. बी. आडे हेही या स्पर्धेत असले, तरी ते एका विशिष्ट समाजाच्या पलिकडे पोहोचू शकले नाहीत, असं जाणकारांचं मत आहे. आडे यांना युतीतीलच […]

LIVE यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM
Share

यवतमाळ : लोकसभा निवडणुकीत यवतमाळ-वाशिम मतदारसंघात तिहेरी लढत होईल असे चित्र आहे. मात्र, जाणकारांच्या अंदाजानुसार काँग्रेसचे माणिकराव ठाकरे आणि शिवसेनेच्या भावना गवळी यांच्यातच मुख्य लढत होईल. तिसरे उमेदवार भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार पी. बी. आडे हेही या स्पर्धेत असले, तरी ते एका विशिष्ट समाजाच्या पलिकडे पोहोचू शकले नाहीत, असं जाणकारांचं मत आहे. आडे यांना युतीतीलच काही नेत्यांनी उमेदवार म्हणून उभे केले असले, तरी आता या नेत्यांनी पक्षाच्या दबावामुळे आडेंवरील आपले छत्र काढल्याची चर्चा आहे. पी. बी. आडे, प्रहार जनशक्ती पक्षाच्या वैशाली येडे, वंचित बहुजन आघाडीचे प्रवीण पवार, बसपचे अरूण किनवटकर हे उमेदवार मतांचे विभाजन करतील. मात्र, या मतदारसंघात आघाडी आणि युतीतच मुख्य लढत होईल असे संकेत मिळत आहे.

LIVE UPDATE

  • यवतमाळ – भाजपचे बंडखोर उमेदवार पी.बी आडे यांनी कुटुंबासह आज सकाळी सात वाजता वाय पी एस शाळेत मतदानाचा हक्क बजावला. पी.बी. आडे यांच्या उमेदवारीमुळे शिवसेनेच्या भावना गवळी आणि काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांच्या विजयाचे समीकरण बदलविण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे.
  • यवतमाळ शहरातील महात्मा फुले नगरपरिषद माध्यमिक विद्यालय यवतमाळ इथे EVM मध्ये तांत्रिक बिघाड, EVM तासभर बंद पडले होते, नागरिकांची मतदानाला मोठी गर्दी

माणिकराव ठाकरेंच्या प्रचाराला मोठ्या नेत्यांची गैरहजेरी

शिवसेनेच्या उमेदवार भावना गवळी वगळता इतर कोणत्याही उमेदवाराच्या प्रचारासाठी स्टार प्रचारक आले नाहीत. त्यामुळे हा मुद्दा दुर्लक्षित करता येण्यासारखा नाही. भावना गवळी यांच्यासाठी आदित्य ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सभा घेतल्या असून याचा त्यांना नक्कीच फायदा होईल. मात्र, काँग्रेस नेते आणि आघाडीचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांच्यासाठी एकाही बड्या नेत्याची सभा याठिकाणी झाली नाही.

यावेळी बंजारा समाजाची मते निर्णायक ठरणार का?

यवतमाळ-वाशिम मतदारसंघात बंजारा समाजाची मते निर्णायक ठरतात. यावेळी मात्र, पी. बी. आडेच नव्हे, तर वंचित बहुजन आघाडीचे प्रवीण पवार आणि अन्य 3-4 अपक्ष बंजारा उमेदवारही रिंगणात आहेत. त्यामुळे ही मते विभागली जाऊन प्रभावी न ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. म्हणूनच ही मते यावेळीही निर्णायक ठरतील की नाही हे येणारा निकालच ठरवेल. मागासवर्गीय आणि मुस्लिम मते यावेळी काँग्रेस सोडून इतरत्र जाण्याची शक्यता नसल्याचे बोलले जात आहे. प्रविण पवार यांना मागासवर्गीय आणि मुस्लिम मतांचा फायदा होईल, असे सध्या तरी चित्र नाही.

माणिकराव ठाकरे आणि भावना गवळी यांच्यासाठी कुणबी मतांचे विभाजन अटळ आहे. मात्र, मतदारसंघातील तिरळे कुणबी कोणाच्या पारड्यात मते टाकतात आणि कुणबींशिवाय इतर तेली, माळी, धनगर हे बहुजन कुणाला झुकते माप देतात यावरही निवडणुकीची पुढील बरीच गणिते अवलंबून आहेत. यानुसारच निकाल पाहायला मिळेल.

Follow Us
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण..
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण...
कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...