AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हो माझा इक्बाल मिर्ची परिवारासोबत आर्थिक व्यवहार : प्रफुल्ल पटेल

"हो मी इक्बाल मिर्ची परिवारासोबत आर्थिक व्यवहार केला. मी काही चुकीचे केलेले नाही", असं राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल (praful patel ED notice) यांनी आज (15 ऑक्टोबर) झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

हो माझा इक्बाल मिर्ची परिवारासोबत आर्थिक व्यवहार : प्रफुल्ल पटेल
prafull patel
| Edited By: | Updated on: Oct 15, 2019 | 7:00 PM
Share

मुंबई : “हो मी इक्बाल मिर्ची परिवारासोबत आर्थिक व्यवहार केला. मी काही चुकीचे केलेले नाही”, असं राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल (praful patel ED notice) यांनी आज (15 ऑक्टोबर) झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. प्रफुल्ल पटेल यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊन इब्राहिमचा सहकारी इक्बाल मिर्चीसोबत संपत्तीचा आर्थिक व्यवहार केल्याप्रकरणी त्यांना प्रवर्तन निदेशालय (Enforcement Directorate) अर्थात ईडीकडून नोटीस (praful patel ED notice) आल्याची चर्चा सध्या सुरु आहे. मात्र या चर्चेला पटेल यांनी पूर्णविराम दिला आहे.

“मला कुठलीही नोटीस आलेली नाही, हे मला तुम्ही मला सांगत आहात. जरी मला कुठलीही नोटीस आली तरी मी ईडीच्या कार्यालयात जाईन, मी कायद्याने चालणारा माणूस आहे”, असं प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

मिर्ची परिवाराशी व्यवहार केल्याची कबुली

“हो मी मिर्ची परिवारासोबत आर्थिक व्यवहार केला. मी काहीही चुकीचे केलेले नाही. हा जो काही व्यवहार झाला तो कायदेशीररित्या झाला”, असं पटेल म्हणाले.

पटेल पुढे म्हणाले, इक्बाल मिर्ची ज्याच्याकडे प्रॉपर्टी होती, याचा आमच्याशी काही संबंध नाही. सगळी कागदपत्रे पब्लिक डोमेनमध्ये आहेत. मिर्ची यांना 1999 मध्ये पासपोर्ट मिळाला, ते युएईला जाऊन आले. त्यामुळे त्यांच्याशी व्यवहार करणे अवैध आहे असं नाही. ही फक्त पर्यायी जागा होती. कोर्टाच्या आदेशानुसार ती जागा मिळाली.

मिर्ची हे भारताचे नागरिक आहेत. ते नियमित टॅक्स भरतात. मी 2007 मध्ये सगळी पार्श्वभूमी तपासली होती, त्यांच्याबरोबर व्यवहार करण्यात काही कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची खात्री केल्यानंतर मी कागदपत्रांवर सह्या केल्या होत्या. त्यामुळे आमच्या संबंधावर वाद उपस्थित करणे गैर आहे, असंही पटेल म्हणाले.

दरम्यान, निवडणुकांपूर्वी अनेक बड्या नेत्यांना ईडीने नोटीस पाठवल्यामुळे विरोधक भाजपा सरकारवर टीका करत आहेत. याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना नोटीसा पाठवल्या होत्या. तसेच आता प्रफुल्ल पटेल यांनाही ईडीने नोटीस पाठवली असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.