AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Corona : पुण्यात 24 तासात 7 कोरोनाबळी, रुग्णांची संख्या 1815 वर

देशासह राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात (Corona Patient Death Pune) आहेत.

Pune Corona : पुण्यात 24 तासात 7 कोरोनाबळी, रुग्णांची संख्या 1815 वर
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: May 02, 2020 | 8:14 AM
Share

पुणे : देशासह राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात (Corona Patient Death Pune) आहेत. त्यासोबत लॉकाडऊनही घोषित करण्यात आला आहे. याच दरम्यान पुणे जिल्ह्यात काल (1 मे) 115 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामुळं जिल्ह्यात आतापर्यंत 1815 कोरोनाबाधित रुग्ण झाले (Corona Patient Death Pune) आहेत.

पुणे जिल्ह्यात काल 24 तासात सात कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 99 रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. तर 52 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे शहरात 24 तासात सहा कोरोनाग्रस्तांचा मृत्यू  

पुणे शहरात काल 24 तासात सहा कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरात आतापर्यंत 91 रुग्ण दगावले आहेत. तर 93 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामुळं पुणे शहरात आतापर्यंत 1611 कोरोनाबाधित रुग्ण झालेत. पुणे शहरात अॅक्टिव्ह रुग्ण 1195 सून 64 रुग्ण क्रिटिकल आहेत. आज 51 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुण्यात दररोज रुग्ण वाढत असल्याने पुण्यातील अनेक ठिकाणी प्रशासनाकडून अतिरिक्त निर्बंध लावण्यात आले आहेत. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत.

दरम्यान, राज्यात आतापर्यंत 11 हजारपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 485 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 1879 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

संबंधित बातम्या :

Pune Corona | आणखी चार अधिकारी दिमतीला, अजित पवारांचा निर्णय, पुणे कोरोनाविरुद्ध लढाईचं नियोजन

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात ‘मदतीचा आणि प्रेमाचा गुणाकार’, पुण्यात इंजिनिअर-डॉक्टर तरुणांकडून ‘रिलीफ पुणे’ मोहिम

Follow Us
कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...
रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
Ratnagiri : रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; गजानन महाराज...
Dry Drought Help : राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; शेगावच्या गजानन महाराज संस्थानकडून तब्बल एवढी मदत जाहीर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर....
Thane : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर, जुन्या वादातून....
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...