कोथरुडमधून राष्ट्रवादी आणि मनसेची ऑफर, मेधा कुलकर्णी म्हणतात…

मेधा कुलकर्णी (Kothrud MLA Medha Kulkarni) यांना राष्ट्रवादी आणि मनसेकडून ऑफर आल्याचंही त्यांनी सांगितलं. पण आपण भाजपशी एकनिष्ठ असून पक्षासाठीच काम करणार असल्याचं मेधा कुलकर्णी यांनी स्पष्ट केलं.

कोथरुडमधून राष्ट्रवादी आणि मनसेची ऑफर, मेधा कुलकर्णी म्हणतात...
Follow us
| Updated on: Oct 01, 2019 | 9:55 PM

पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोथरुड मतदारसंघातून लढण्याचा निर्णय घेतल्याने विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी (Kothrud MLA Medha Kulkarni) यांचं तिकीट कापण्यात आलंय. यानंतर मेधा कुलकर्णी (Kothrud MLA Medha Kulkarni) यांना राष्ट्रवादी आणि मनसेकडून ऑफर आल्याचंही त्यांनी सांगितलं. पण आपण भाजपशी एकनिष्ठ असून पक्षासाठीच काम करणार असल्याचं मेधा कुलकर्णी यांनी स्पष्ट केलं.

चंद्रकांत पाटलांची उमेदवारी जाहीर होताच, कोथरुडमध्ये जातीय राजकारण रंगलं. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि मनसेनेही मेधा कुलकर्णी यांना संपर्क साधत ऑफर दिल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र, आपण भाजपशी एकनिष्ठ असून नम्रपणे दोघांच्याही ऑफर नाकारल्याचं कुलकर्णी यांनी सांगितलं.

चंद्रकात पाटील यांनी माझ्या मतदारसंघातून निवडणूक लढवणे, हे माझ्यासाठी भाग्यच आहे. त्यामुळे मतदारसंघाचा जास्त विकास होईल. आपण चंद्रकात पाटील यांच्या प्रचारात सक्रिय होणार असून, ब्राह्मण महासंघानेही वेगळी भूमिका घेऊ नये, असं आवाहन त्यांनी केलं.

चंद्रकांत पाटलांना ब्राह्मण महासंघाचा विरोध

कोथरुड विधानसभा मतदारसंघातून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यास ब्राह्मण महासंघाने तीव्र विरोध केला आहे. ब्राह्मण समाजाचं सर्वाधिक मतदान असलेल्या मतदारसंघात इतर समाजातील आयात उमेदवार आम्हाला चालणार नाही, भाजपने ब्राह्मण समाजाचा उमेदवार दिला नाही तर आम्ही ब्राम्हण महासंघाचा स्वतंत्र उमेदवार उभा करु, असा पवित्रा ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी घेतला आहे.

Non Stop LIVE Update
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.