गड्या आपला गाव बरा! महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सव्वा लाख पुणेकर परतले

मुंबई, पुण्यातील कोरोना रुग्ण संख्या वाढल्याने शहरातील लोकांनी गावाकडचा रस्ता धरला (Mumbai and Pune citizens return village due to corona) आहे.

गड्या आपला गाव बरा! महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सव्वा लाख पुणेकर परतले

पुणे : मुंबई, पुण्यातील कोरोना रुग्ण संख्या वाढल्याने शहरातील लोकांनी गावाकडचा रस्ता धरला (Mumbai and Pune citizens return village due to corona) आहे. आतापर्यंत अनेकजण परवानगी घेऊन तर काहीजण छुप्या मार्गाने गावाकडे पोहोचले आहेत. पुणे जिल्ह्यातही गेल्या दोन आठवड्यात तब्बल एक लाख 22 हजार 498 लोक आपल्या मूळ गावी परतले (Mumbai and Pune citizens return village due to corona) आहेत.

यामध्ये सर्वाधिक 24 हजार 543 नागरिक हे खेड तालुक्यातील विविध गावे, वाड्या, रस्त्या, तांडे आणि पाड्यांवरील लोकं गावी परतले आहेत. तर सर्वांत कमी म्हणजे केवळ एक हजार 335 लोक हे हवेली तालुक्यातील परतले आहेत.

जिल्हा परिषदेच्या गुगल फॉर्मच्या माध्यमातून केलेल्या नोंदणीतून ही आकडेवारी स्पष्ट झाली आहे. केवळ दोन आठवड्यात सव्वा लाख लोक परतले आहेत. लॉकडाउनपूर्वी आलेले आणि पोलीस किंवा महसूल प्रशासनाची परवानगी न घेता, लपून-छपून आलेल्यांचा यामध्ये समावेश नाही.

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील लाखो नागरिक मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद आणि नागपूर आदी प्रमुख शहरांसह राज्याच्या विविध भागात नोकरी किंवा कामा-धंद्याच्या निमित्ताने स्थायिक झालेले लोक कोरोनामुळे गावी परतले आहेत.

आपापल्या मूळ गावी परतलेल्या लोकांची तालुकानिहाय संख्या

आंबेगाव- 11607, इंदापूर- 5969, खेड- 24,543, जुन्नर- 11,486, दौंड- 6762, पुरंदर- 2446, बारामती- 9607, भोर- 12,323, मावळ- 2952, मुळशी- 5988, वेल्हे- 5734, शिरूर- 21,746 आणि हवेली- 1335.

संबंधित बातम्या :

Pune Corona | पुण्यात कोरोनामुक्त होण्याचं प्रमाण वाढलं, आतापर्यंत 2,875 जणांची कोरोनावर मात

मुंबई, पुण्यानंतर ठाण्यात कोरोनाचा कहर, कुठे किती कोरोनाबाधित?

Maharashtra Corona Update | राज्यात दिवसभरात 105 जणांचा कोरोनाने मृत्यू, बाधितांचा आकडा 56,948 वर

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *