Corona : धार्मिक तेढ निर्माण करणारी पोस्ट, पिंपरीत व्हॉट्‌सअॅप ग्रुप अॅडमीनसह सदस्यावर गुन्हा

पिंपरी-चिंचवडमध्ये व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनसह ग्रुप मधील एका सदस्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Corona : धार्मिक तेढ निर्माण करणारी पोस्ट, पिंपरीत व्हॉट्‌सअॅप ग्रुप अॅडमीनसह सदस्यावर गुन्हा

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडमध्ये व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनसह(WhatsApp Group Admin) ग्रुप मधील एका सदस्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धार्मिक तेढ निर्माण करणारी पोस्ट व्हॉट्सअॅपवर शेअर केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला (WhatsApp Group Admin) आहे.

एका ठराविक धर्माच्या नागरिकांकडून कुठल्याही प्रकारचे साहित्य खरेदी करु नये, अशी जनमानसात द्वेष निर्माण करणारी पोस्ट दोन दिवसांपूर्वी पिंपरी मधील एका व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून व्हायरल करण्यात आली होती. अमित भालेराव हा ‘अमित भालेराव मित्र परिवार’ या ग्रुपचा अॅडमीन आहे. तर सुशीलकुमार हा त्या ग्रुपचा सदस्य आहे. सुशीलकुमार याने त्या व्हॉट्‌सअॅप ग्रुपवर “धर्माच्या विशिष्ट समाजाची व्यक्ती भाजी मंडईत विक्री करताना आढळली, तर त्यांच्याकडून काही खरेदी करु नका. तसेच, त्यांना आपल्या (WhatsApp Group Admin) गल्लीत येऊ देऊ नका”, अशा आशयाची पोस्ट केली.

या पोस्टमुळे जनमानसात द्वेष निर्माण होऊन, जातीय एकोपा टिकण्यास बाधा निर्माण होण्याची शक्यता होती. ही बाब पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या निगराणीत आली. त्यांनंतर पोलिसांनी अवघ्या काही तासांत संबंधित ग्रुप अॅडमीन आणि पोस्ट टाकणाऱ्या सदस्यावर गुन्हा दाखल केला आहे.

त्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांनी 5 एप्रिल रात्री 12 वाजेपासून ते 30 एप्रिल 2020 च्या रात्री 12 वाजेपर्यंत व्हाट्सअॅप ग्रुपसह सर्वच सोशल मीडियावर अंकुश घातले. अफवा, प्रक्षोभक आणि आक्षेपार्ह मेसेज आणि व्हिडीओ निघाल्यास संबंधित ग्रुप ऍडमीन आणि सदस्यावर फौजदारी गुन्हे दाखल (WhatsApp Group Admin) करण्याचे आदेश दिलेत.

संबंधित बातम्या :

पुणेकरांची चिंता वाढली, चोवीस तासात तिसरा ‘कोरोना’ बळी

नवी मुंबईत कोरोना संसर्ग पसरवल्याचा ठपका, दहा फिलीपाईन्स नागरिकांवर गुन्हा

पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा शंभरी पार, राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 661 वर

Corona : कोरोना नाही, केवळ ताप, ‘कस्तुरबा’तील कर्मचाऱ्यांनी पिटाळल्याचा दावा, रुग्ण निघाला ‘कोरोनाग्रस्त’

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *