पुण्यात 143 नवे कोरोनाबाधित, एका दिवसातील सर्वाधिक रुग्णसंख्या

पुण्यात कोरोना प्रादुर्भाव वाढलेल्या ठिकाणी पुन्हा अतिरिक्त निर्बंध घालण्याचा पोलिस प्रशासनाचा विचार आहे. यासंदर्भात पोलिस उपायुक्तांनी प्रस्ताव सादर केला (Pune Corona Patients Increase significantly in a day)

पुण्यात 143 नवे कोरोनाबाधित, एका दिवसातील सर्वाधिक रुग्णसंख्या
Follow us
| Updated on: Apr 29, 2020 | 7:47 AM

पुणे : पुणे जिल्ह्यात एका दिवसातील सर्वाधिक म्हणजे 143 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1491 वर पोहचली. पुण्यात कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचे वेग नऊ दिवसांवर गेला आहे. (Pune Corona Patients Increase significantly in a day)

पुणे जिल्ह्यात कालच्या दिवसात (मंगळवार 28 एप्रिल) तीन कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत 83 कोरोनाग्रस्त रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. पुणे जिल्ह्यात मंगळवारी 20 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत 230 जण डिस्चार्ज मिळाल्याने घरी गेले आहेत. पुण्यात कोरोना रुग्णांचा दुप्पट होण्याचा वेग सातवरुन तर नऊ दिवसांवर गेला आहे.

राज्यात काल (28 एप्रिल) दिवसभरात तब्बल 729 नवे रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 9 हजार 318 वर पोहोचला आहे. विशेष म्हणजे मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 6 हजारांवर गेली आहे.

हेही वाचा…तर 18 मेपर्यंत पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या 9600 पोहोचण्याचा अंदाज : आयुक्त

पुणे शहरात काल दिवसभरात 122 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. शहरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णसंख्या 1339 वर गेली आहे. गेल्या चोवीस तासात दोन कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत पुण्यात 79 कोरोनाग्रस्त रुग्ण दगावले आहेत. 27 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून 73 गंभीर रुग्णांवर उपचार सुरु आहेत. ॲक्टिव्ह कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1057 आहे. (Pune Corona Patients Increase significantly in a day)

दरम्यान, पुण्यात कोरोना प्रादुर्भाव वाढलेल्या ठिकाणी पुन्हा अतिरिक्त निर्बंध घालण्याचा पोलिस प्रशासनाचा विचार आहे. यासंदर्भात पोलिस उपायुक्तांनी प्रस्ताव सादर केला. दाट लोकवस्ती असलेल्या आणि नियमांचं उल्लंघन होणाऱ्या भागात अतिरिक्त निर्बंध लावले जातील.

नागरिकांसाठी दीडशे शाळा उपलब्ध करण्यात आल्या असून 15 ते 20 टक्के नागरिक इथे स्वतःची सोय करण्याचा अंदाज आहे. प्रशासन कोणाला हलवणार नसून आपण जागा दिली आहे. निर्णय हा नागरिकांवर अवलंबून आहे, अशी माहिती मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.

महाराष्ट्रातील ‘कोरोना’ग्रस्तांची ताजी आकडेवारी इथे पाहा :

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861

(Pune Corona Patients Increase significantly in a day)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.