
बाबा वेंगा यांचा समावेश हा जगातील महान भविष्य वेत्त्यांमध्ये होतो. बाबा वेंगा यांनी ज्या काही भविष्यवाणी केल्या त्यातील अनेक खऱ्या ठरल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जातो. बाबा वेंगा यांचा जन्म बल्गेरियामध्ये 1911 साली झाला तर मृत्यू 1996 साली झाला, त्यांनी आपल्या हयातीमध्ये अनेक भाकीतं केली आहेत, ज्यामध्ये हिटलरचा मृत्यू, इंग्लंडच्या राणीचा मृत्यू, जपानमध्ये आलेली त्सुनामी या त्यांच्या काही प्रसिद्ध भविष्यवाणी आहेत. बाबा वेंगा यांच्याबद्दल असा देखील दावा केला जातो की, लहाणपणी त्या एका वादळात सापडल्या होत्या, त्यामुळे त्यांनी आपल्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी गमावली, त्यानंतर त्यांना दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाली.
भूकंपाचं भाकीत
2025 या वर्षाबाबत बाबा वेंगा यांनी अनेक भाकीतं केली होती, ती खरी ठरली आहेत, 2025 ही जगाच्या अंताची सुरुवात असेल असं बाबा वेंगा यांनी म्हटलं होतं. बाबा वेंगा यांनी या वर्षी विनाशकारी आणि मोठे भूकंप होतील असा इशाराही दिला होता, बाबा वेंगा यांची ही भविष्यवाणी खरी ठरली आहे. याच वर्षी 28 मार्च रोजी म्यानमारमध्ये 7.9 रिस्टल स्केलचा मोठा भूकंप झाला. या भूकंपामध्ये 1700 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला तर 4500 लोक जखमी झाले, त्यानंतर जपान, पाकिस्तान, अमेरिका या देशांमध्ये देखील भूकंप झाले, रशियामध्ये देखील याचवर्षी शक्तिशाली भूकपं झाला, 8.8 रिस्टल स्केल एवढी प्रचंड या भूकंपाची तीव्रता होती.
युद्ध
बाबा वेंगा यांनी युद्धाबाबत देखील मोठी भविष्यवाणी केली होती, 2025 मध्ये भीषण युद्ध होतील असं त्यांनी म्हटलं होतं. हे भाकीत देखील खरं ठरलं आहे. 2025 मध्ये इराण आणि इस्रायलमध्ये मोठं युद्ध झाला, रशिया आणि युक्रेनमध्ये तर अजूनही युद्ध सुरूच आहे. यामध्ये मोठं नुकसान झालं आहे, प्रचंड प्रमाणात मनुष्य आणि वित्तहानी झाली आहे.
हादरवणारं भाकीत
दरम्यान आता बाबा वेंगा यांचं जे भाकीत समोर आलं आहे, त्यामुळे जगात खळबळ उडाली आहे, 2025 च्या शेवटी जगावर एक मोठं आर्थिक संकट कोसळेल असं बाबा वेंगा यांनी म्हटलं आहे, आणि त्याची सुरुवात देखील झाल्याचं पहायला मिळत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभारतील अनेक देशांवर टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे, याचा बाजारपेठेला मोठा फटका बसू शकतो, मोठ्या आर्थिक संकटाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)