लग्न जुळण्यास होत असेल विलंब तर अवश्य करा हे उपाय, जुळून येतो विवाह योग

जर तुमच्या पत्रिकेत गुरू कमजोर असेल तर तुम्हाला वैवाहिक (Astro Tips For Marriage) जीवनात अडथळ्यांना सामोरे जावे लागेल. त्याचप्रमाणे तुमच्या पत्रिकेत गुरू ग्रह त्याच्या विरोधी ग्रहासोबत असेल तर त्या व्यक्तीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

लग्न जुळण्यास होत असेल विलंब तर अवश्य करा हे उपाय, जुळून येतो विवाह योग
लग्न जुळण्यासाठी उपाय
Image Credit source: Social Media
| Updated on: Aug 30, 2023 | 10:37 PM

मुंबई : पत्रिकेतील ग्रहांच्या कमकुवत आणि मजबूत स्थितीचा व्यक्तीच्या जीवनावर मोठा प्रभाव पडतो. जर तुमच्या पत्रिकेत गुरू कमजोर असेल तर तुम्हाला वैवाहिक (Astro Tips For Marriage) जीवनात अडथळ्यांना सामोरे जावे लागेल. त्याचप्रमाणे तुमच्या पत्रिकेत गुरू ग्रह त्याच्या विरोधी ग्रहासोबत असेल तर त्या व्यक्तीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा स्थितीत त्या व्यक्तीचे वेळेवर लग्न होत नाही, त्याला लग्नाशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. एवढेच नव्हे तर, यामुळे व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान, रुग्णावर उपचार करूनही प्रकृतीत सुधारणा न होणे आदी अडथळे निर्माण झाले आहेत. या सर्व समस्यांपासून मुक्त होण्यासाठी तुम्हाला गुरू ग्रह मजबूत करावा लागेल. त्यासाठी काही विशेष उपाय योजले पाहिजेत. आज आम्ही तुम्हाला कुंडलीत बृहस्पति मजबूत करण्याचे काही उपाय सांगणार आहोत.

गुरू ग्रह मजबूत करण्याचे उपाय

  • गुरु हा सर्वात मोठा ग्रह मानला जातो. गुरु ग्रहाचा दिवस गुरुवार मानला जातो. या दिवशी गायीला चारा द्यावा.
  • गुरू ग्रह पिवळ्या रंगाचे प्रतिनिधित्व करतो, त्यामुळे ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत गुरू ग्रह कमजोर असेल त्यांनी गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे घालावेत.
  • गुरुवारी लक्ष्मी नारायणाची विधिवत पूजा करा. यासोबत हरभरा डाळ, हळद आणि गूळ यांचे काही दाणे पाण्यात टाकून केळीच्या झाडाला पाणी अर्पण करावे.
  • पाण्यात थोडी हळद टाकून स्नान केल्याने गुरू ग्रह बलवान होतो आणि त्याचा आशीर्वाद प्राप्त होतो.
  • जर तुम्हाला रत्ने घालण्याचे शौकीन असेल आणि तुमच्या पत्रिकेत गुरू कमजोर असेल तर तुम्ही ज्योतिषाच्या सल्ल्याने पुष्कराज धारण करू शकता.
  • तरुण मुलींना गुरुवारी पिवळ्या वस्तूंचे दान करावे. हे अत्यंत शुभ मानले जाते.
  • गुरुवारी केळीच्या झाडाचे मूळ पिवळ्या रंगाच्या कपड्यात बांधून उजव्या हाताला धारण करावे.
  • गुरुवारी साबण, तेल इत्यादी वापरू नका. तसेच या दिवशी नखे आणि केस कापू नयेत. या दिवशी पुरुषांनी केस कापणे, शेव्हिंग देखील करू नये.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)