AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology: आजचे राशी भविष्य, ‘या’ राशीच्या लोकांची रखडलेली कामं होणार पूर्ण

आजचे राशी भविष्य. या राशीच्या लोकांची रखडलेली काम होणार पूर्ण. जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाणार

Astrology: आजचे राशी भविष्य,  'या' राशीच्या लोकांची रखडलेली कामं होणार पूर्ण
आजचे राशी भविष्य Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Nov 13, 2022 | 7:35 AM
Share

मुंबई, ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Daily Horoscope Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

  1. मेष- कोणतंही काम करण्यासाठी घाई करू नका. प्रयत्नांना फळ मिळेल. ज्यांना खेळामध्ये रस आहे त्यांची कामगिरी चांगली असेल. पैशाच्या आगमनाने तुम्हाला आनंद मिळेल. जास्तीत जास्त उत्पन्नाचा प्रयत्न कराल आणि यशस्वी होईल.
  2. वृषभ- आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा जाणार आहे. तुमच्या मेहनतीतून अपेक्षित यश मिळू शकतं. आर्थिक काही समस्या असतील, तर त्याही दूर होतील. कुटुंबातील सदस्यांना आरोग्याशी संबंधित काही समस्या असू शकतात.
  3. मिथुन- आज आरोग्याची काळजी घ्या. धावपळ करु नका. दिवस आनंदाचे आहेत. आयुष्यात आनंदाची बरसात होणार आहे. धनलाभ होण्याची संधी आहे.
  4. कर्क- आजचा दिवस तुमच्यासाठी चढउतारांनी भरलेला असू शकतो. कमी प्रयत्नाने तुम्हाला अधिक नफा मिळू शकेल. व्यवसायाशी संबंधित मित्राच्या मदतीने तुम्ही प्रगती करू शकता. आज तुमचा बॉस तुम्हाला प्रोत्साहित करेल.
  5. सिंह- व्यापारामध्ये लाभ होणार आहे. व्यवसायाच्याच निमित्ताने प्रवास करण्याचा योग आहे. आज कुटुंबातील काही व्यक्तींशी चांगला संवाद साधू शकाल.
  6. कन्या- सद्यस्थिती पाहता भविष्यातील बेत आखत त्या मार्गानं काम करण्यासाठी योग्य वेळ आहे. आताच आराखडा तयार करा, भविष्य घडवण्याची संधी तुमच्या हाती आहे.
  7. तूळ- नोकरीच्या ठिकाणी आजचा दिवस आनंदाचा आहे. धनलाभ होणार आहे. आज आपल्या लोकांसोबत वेळ घालवा. एखाद्या ठिकाणी भटकंतीचा योग आहे.
  8. वृश्चिक- आजच्या दिवशी तुमची रखडलेली कामं पूर्ण होतील. कामात यश मिळण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ चांगला जाणार आहे.
  9. धनू- आजच्या दिवशी तुम्हाला अधिक मेहनत करावी लागणार आहे. तसंच कठीण परिस्थितीत स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. व्यवसायिकांनी कामात सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. योग्य माहिती न घेता कोणत्याच ठिकाणी गुंतवणूक करणं टाळा.
  10. मकर- आजच्या दिवशी कोणतेही नवीन काम सुरु करू नका. तुमच्या भाषेवर संयम ठेवा. नकारात्मक गोष्टींपासून दूर राहा. आरोग्याची आज काळजी घ्या.
  11. कुंभ- प्रवासासाठी आजचा दिवस फार अनुकूल आहे. व्यवसायातील बदलाशी संबंधित कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्या. नवीन व्यवसायाकडे वाटचाल करू शकाल. रुग्णांना फळं दान करा.
  12. मीन- या राशीच्या व्यक्तींना नोकरीत मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे. मित्रांचं सहकार्य मिळू शकतं. गाडी चालवताना नियंत्रण ठेवा.

    (वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट