AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology: आजचे राशी भविष्य, ‘या’ राशीच्या लोकांना कार्यक्षेत्रात मिळणार अपेक्षित यश

दैनिक राशिफल (Daily Horoscope Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे.

Astrology: आजचे राशी भविष्य, 'या' राशीच्या लोकांना कार्यक्षेत्रात मिळणार अपेक्षित यश
राशी भविष्य
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Sep 14, 2022 | 7:57 AM
Share

Astrology:  ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Daily Horoscope Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

  1. मेष- नवीन काम सुरू करण्यासाठी शुभ दिवस आहे. दिवस अतिशय खास बनविण्यासाठी तुम्ही कुटुंबासोबत वेळ घालवाल, मन प्रसन्न होईल. तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. काही नवीन काम सापडेल.
  2. वृषभ-  मंगल कार्यांसाठी बुधवार  शुभ असेल. तुमचं मन प्रसन्न होईल. बर्‍याच दिवसानंतर तुम्हाला कुणाला तरी भेटण्याची संधी मिळेल. नवीन काम सुरू करणे फायद्याचे ठरेल. कोर्टाच्या खटल्यांमधून सुटका होऊ शकते. दिवस चांगल्या बातमीने प्रारंभ होणार आहे.
  3. मिथुन- तुमचा दिवस चांगला सुरू होणार आहे. तुम्हाला व्यवसायात देखील फायदा होणार आहे. याशिवाय नोकरीत पदोन्नती मिळेल. उधार दिलेले पैसे परत मिळतील. मित्र किंवा कुटुंबियांसह तुमचा चांगला प्रवास होईल, एकमेकांशी चांगला वेळ घालवाल.
  4. कर्क- शिक्षण घेण्याऱ्यांसाठी शुक्रवार चांगला दिवस आहे. परिश्रमानुसार यश मिळेल. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची योजना यशस्वी होईल. दिवसाची सुरुवात आत्मविश्वासाने होईल. कुटुंबाचं प्रेम आणि सहकार्य मिळेल.
  5. सिंह- तुमचा दिवस चांगला जाईल. व्यवसायात फायदा होईल. नोकरीची परिस्थिती देखील चांगली राहील. तुम्हाला हवं तसं कामाचं फळ तुम्हाला मिळेल. कार्यक्षेत्रात आज पैशाची प्राप्ती होईल. मित्र, कुटुंबातील सदस्य आणि सहकारी तुम्हाला मदत करतील.
  6. कन्या- आज आरोग्याची काळजी घ्या. धावपळ करु नका. दिवस आनंदाचे आहेत. आयुष्यात आनंदाची बरसात होणार आहे. धनलाभ होण्याची संधी आहे.
  7. तूळ- हुशारीचा वापर करून काम केलं तर त्यात तुम्हाला नक्की यश मिळेल. मोठे व्यवहार टाळा. आज शक्यतो आराम करा. अधिकचा ताण घेऊ नका. गोष्टी मनाजोग्या होतील फक्त थोडा वेळ द्या.
  8. वृश्चिक- नव्या विचारानं पुढे जा. कामाच्या बाबतीत काही नवे व्यवहार कराल. भावनांवर नियंत्रण ठेवा. तुमच्या भावनांचा गैरफायदा कोणालाही घेऊन देऊ नका.
  9. धनु- बुधवार तुमच्यासाठी चांगला दिवस असेल. कामात यश मिळवून लाभ होईल. तुम्ही स्तुतीस पात्र ठरेल. भाग्य तुमच्या सोबत असणार आहे. कार्यक्षेत्रात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. वैवाहिक जीवनाचा आनंद घ्याल.
  10. मकर- आज तुमच्या नेतृत्त्वंक्षमतेची परीक्षा आहे. महत्त्वाची कामं मार्गी लागतील. अडकलेले पैसे परत मिळतील. कोणालाही कमी लेखू नका. प्रत्येकाचे आभार माना.
  11. कुंभ- तुमचा दिवस उत्साहाने भरलेला असेल. मंगल कार्यात तुम्ही भाग घ्याल. कार्यक्षेत्रात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक केलं जाईल. शिक्षण आणि स्पर्धा क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल. कुटुंबातील सदस्यांकडून सर्व शक्य सहकार्य मिळेल.
  12. मीन- कुटुंबाकडून आज सुख मिळेल. मंगल कार्य किंवा समारंभात सामील व्हाल. एखाद्या विशेष व्यक्तीशी भेटणं आठवणीत राहील. कामासाठी दिवस चांगला आहे, नवीन उत्साह आणि उत्साह मनामध्ये दिसेल. प्रेम संबंधात यश मिळेल.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
आमसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष
सिंधुदुर्गातील दोडामार्ग आमसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष
विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर आश्रमशाळा व्यवस्थापनावर उईके संतापले
साप चावल्याने विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर आश्रमशाळा व्यवस्थापनावर मंत्री उईके संतापले
मांसाहार करत असाल तर... भावेश कावरे यांच्या व्हिडिओने मुंबईत खळबळ
Tardeo Estate Agent | मांसाहार करत असाल तर... भावेश कावरे यांच्या व्हिडिओने मुंबईत खळबळ, नेमकं प्रकरण काय?
'बावनकुळेंना चांगलं म्हणायचो, पण आता ते मनातून उतरले'
बावनकुळेंना चांगलं म्हणायचो, पण आता ते मनातून उतरले - जरांगे पाटलांचे खळबळजनक विधान.
पतीला गमावलं, महिनाभरात पत्नीनेही आयुष्य संपवलं; नेमकं काय घडलं?
पतीला गमावलं, महिनाभरात पत्नीनेही आयुष्य संपवलं; दोन मुलींवरून आई-वडिलांचं छत्र हरपलं, नेमकं काय घडलं?
विद्यार्थिनींचा अभिजीत दिपके यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल
नागपूरमधील विद्यार्थिनींचा संघर्ष: बस सेवेच्या मागणीचा अभिजीत दिपके यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल
मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत: मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
राज ठाकरंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, काय घडलं?
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, असं काय घडलं?
राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
संजय राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे...
ताडदेव गृहप्रकल्प वाद; मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे नेते थेट...