AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology : उद्या बुध करणार मिथुन राशीत गोचर, या पाच राशीच्या लोकांना होणार मोठा फायदा

24 जून 2023 रोजी बुध मिथुन राशीत प्रवेश करेल. बुधाचा सूर्यासोबत येथे आधीपासून असलेला संयोग बुधादित्य योग निर्माण करेल. बुधाच्या संक्रमणाने या 5 राशींना राजयोगाचा लाभ मिळेल.

Astrology : उद्या बुध करणार मिथुन राशीत गोचर, या पाच राशीच्या लोकांना होणार मोठा फायदा
बुध गोचरImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jun 23, 2023 | 9:48 AM
Share

मुंबई : वैदिक ज्योतिषशास्त्रात (Astrology) बुधला ग्रहांचा राजकुमार म्हटले गेले आहे. बुध तरुण आहे, ग्रहांचा राजकुमार आहे आणि तो गणित, ज्योतिष आणि लेखनाचा कारक मानला जातो. 24 जून रोजी बुध मिथुन राशीत प्रवेश करेल आणि जेव्हा तो मिथुन राशीत प्रवेश करेल, तेव्हा त्याच्या स्वतःच्या राशीत आल्यामुळे, या संक्रमणातून पंचमहापुरुष राजयोगांपैकी एक भद्रा महापुरुष राजयोग तयार होईल. बुधाच्या या संक्रमणाने 5 राशींना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. चला जाणून घेऊया त्या 5 राशी कोणत्या आहेत.

या पाच राशींच्या लोकांना होणार मोठा फायदा

  1. कन्या – कन्या राशीचा देखील स्वामी बुध आहे. बुधादित्य राजयोगाच्या प्रभावामुळे कन्या राशीच्या लोकांसाठी धनात वाढ होण्याची शक्यता आहे. बौद्धिक क्षमतेत वाढ होईल ज्यामुळे तुमच्या कार्यात भर पडेल. पदोन्नतीची दाट शक्यता आहे. व्यवसायात अडकलेले पैसे परत मिळतील.
  2. मिथुन – मिथुन राशीच्या राशीत बुधाचे संक्रमण होत आहे, यामुळे या राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये फायदे होतील. माध्यम, लेखन किंवा कला क्षेत्राशी निगडित लोकं प्रगती साधतील. अधिकारी तुमच्या कामावर खूश होतील. बुधाचे संक्रमण तुम्हाला आर्थिक लाभ देईल.
  3. सिंह- सिंह राशीच्या लोकांसाठी बुधाचा राशी बदल फायदेशीर ठरेल. नवीन नोकरीचा शोध पूर्ण होईल, चांगल्या ऑफर मिळू शकतात. नोकरीत निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करा. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होईल. उत्पन्नासह स्त्रोत वाढतील.
  4. तूळ- बुधाचे संक्रमण तूळ राशीच्या लोकांना भौतिक सुख देईल. या दरम्यान तुमच्या प्रेम जीवनात ताकद येईल. समाजात मान-सन्मान वाढेल. व्यापारी वर्गासाठी हा काळ अनुकूल राहील, व्यवसायात चांगली कमाई होईल.
  5. वृषभ- बुधाच्या राशी बदलामुळे वृषभ राशीच्या नोकरदारांना चांगले दिवस येतील. नोकरीत येणाऱ्या अडचणी दूर होतील. तुम्हाला काही कारणास्तव अडकलेली प्रमोशन मिळू शकते. आपल्या कामात सर्वांना आनंद देईल. कुटुंबात सहकार्य मिळेल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!