AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology : या राशीचे लोकं सिद्ध होतात चांगले जोडीदार, आयुष्यभर निभावतात साथ

ग्रहांमध्ये शत्रुत्व आणि मैत्रीची भावना देखील आहे, त्यामुळे विशिष्ट राशीच्या लोकांमध्ये आपापसात पटण्याची किंवा न पटण्याची स्थिती निर्माण होते.

Astrology : या राशीचे लोकं सिद्ध होतात चांगले जोडीदार, आयुष्यभर निभावतात साथ
जोतिषशास्त्रImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: May 19, 2023 | 5:04 PM
Share

मुंबई : ज्योतिष शास्त्रामध्ये (Astrology) राशीच्या आधारावरही व्यक्तीबद्दल अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. प्रत्येक राशीचा कोणता ना कोणता स्वामी ग्रह असतो आणि त्याचा प्रभाव त्या राशीच्या लोकांच्या व्यक्तिमत्वावर स्पष्टपणे दिसून येतो. याद्वारे कोणत्याही व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वातील लपलेले पैलू कळू शकतात.  ग्रहांमध्ये शत्रुत्व आणि मैत्रीची भावना देखील आहे, त्यामुळे विशिष्ट राशीच्या लोकांमध्ये आपापसात पटण्याची किंवा न पटण्याची स्थिती निर्माण होते. अशा परिस्थितीत, लग्नासाठी राशीनुसार अनुकूलता चाचणी घेणे चांगले ठरते. जर जीवन साथीदारांच्या राशीच्या ग्रहांमध्ये शत्रुत्वाची भावना असेल तर त्या राशीच्या लोकांचेही एकमेकांशी पटणार नाही.

कुंडली जुळण्यासोबतच लग्न किंवा प्रेमाच्या नात्याने बांधलेले लोक आपापसात कसे राहतील हे राशींच्या मदतीने देखील कळू शकते. किंवा एखाद्या राशीसाठी कोणत्या राशीची व्यक्ती चांगली जीवनसाथी सिद्ध होऊ शकते, हेही आपण जाणून घेऊ शकतो. आज आपण विशिष्ट राशींच्या लोकांसाठी कोणत्या राशींचे लोक योग्य जोडीदार सिद्ध होऊ शकतात हे जाणून घेऊया.

कुठली रास कोोमासाठी योग्य?

मेष: मेष राशीच्या लोकांसाठी मिथुन आणि तूळ राशीचे लोक चांगले जीवनसाथी सिद्ध होऊ शकतात.

वृषभ: वृषभ राशीच्या लोकांसाठी मकर आणि वृश्चिक राशीचे लोक चांगले जीवनसाथी सिद्ध होऊ शकतात.

मिथुन: मिथुन राशीच्या लोकांसाठी वृषभ, तूळ आणि सिंह राशीचे लोक चांगले जीवनसाथी सिद्ध होऊ शकतात.

कर्क: कर्क राशीच्या लोकांनी सिंह, मेष किंवा धनु राशीला जीवनसाथी म्हणून निवडावे.

सिंह : सिंह राशीच्या लोकांसाठी धनु राशीचे लोक उत्तम जोडीदार असतील. याशिवाय कर्क, मेष, वृश्चिक आणि मीन राशीतूनही जोडीदार निवडता येईल.

कन्या: कन्या राशीच्या लोकांसाठी मकर किंवा वृषभ राशीची व्यक्ती चांगली जोडीदार ठरू शकते.

तूळ: तूळ राशीच्या लोकांसाठी कुंभ राशीचे लोक उत्तम जोडीदार असतील, परंतु मेष, मिथुन, कन्या आणि मकर राशीच्या लोकांशीही त्यांचे चांगले संबंध निर्माण होऊ शकतात.

वृश्चिक: वृश्चिक राशीच्या लोकांसाठी वृषभ, धनु, कर्क आणि मीन राशीचे लोक उत्तम जोडीदार असू शकतात.

धनु : धनु राशीच्या लोकांनी जीवनसाथी निवडताना सिंह आणि मेष राशीच्या लोकांना प्राधान्य द्यावे.

मकर: वृश्चिक राशीचे लोक मकर राशीचे चांगले जोडीदार असतील. याशिवाय त्यांचे वृषभ, मिथुन, कर्क आणि तूळ राशीच्या लोकांशीही चांगले संबंध असतील.

कुंभ: या राशीच्या लोकांनी सिंह आणि वृषभ राशीच्या लोकांमध्ये आपला जीवनसाथी निवडावा.

मीन: कर्क, मेष आणि वृश्चिक हे मीन राशीच्या लोकांसाठी चांगले भागीदार असतील.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
पुण्यात धो धो धो...मान्सूनपूर्व पावसाने झोडपलं; सगळीकडे बरसल्या सरी!
पुण्यात धो धो धो...मान्सूनपूर्व पावसाने झोडपलं; सगळीकडे बरसल्या सरी!.
petrol shortage | थेट कोयता, तलवार घेऊन... पेट्रेल पंपावर मोठा राडा...
petrol shortage | थेट कोयता, तलवार घेऊन... पेट्रेल पंपावर मोठा राडा....
राज्यात SIR कसे राबवले जाणार, कोणती कागदपत्रे द्यायची? निवडणूक आयोग...
राज्यात SIR कसे राबवले जाणार, कोणती कागदपत्रे द्यायची? निवडणूक आयोग....
कॉकरोच जनता पार्टीच्या अध्यक्षाला जीवे मारण्याची धमकी, देशभरात मोठी..
कॉकरोच जनता पार्टीच्या अध्यक्षाला जीवे मारण्याची धमकी, देशभरात मोठी...
ती मोठी चूक झाली, ठाकरेंच्या जाहीर विधानाची चर्चा; त्या नेत्याबद्दल...
ती मोठी चूक झाली, ठाकरेंच्या जाहीर विधानाची चर्चा; त्या नेत्याबद्दल....
119 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी CBI ची धडक कारवाई, या 7 ठिकाणी...
119 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी CBI ची धडक कारवाई, या 7 ठिकाणी....
राजकारणात खळबळ! महायुतीत शीतयुद्ध सुरू? बडा नेता थेट म्हणाला...
राजकारणात खळबळ! महायुतीत शीतयुद्ध सुरू? बडा नेता थेट म्हणाला....
निवडणुकीची तारीख जाहीर, मात्र सुनेत्रा पवारांच्या जागी कुणाची वर्णी...
निवडणुकीची तारीख जाहीर, मात्र सुनेत्रा पवारांच्या जागी कुणाची वर्णी....
मनोज जरांगे-प्रसाद लाड यांच्यातील चर्चा LIVE, जरांगेंचं थेट उत्तर...
मनोज जरांगे-प्रसाद लाड यांच्यातील चर्चा LIVE, जरांगेंचं थेट उत्तर....
एकच खळबळ! पेपरफुटी झालीच नाही, परीक्षा रद्द करण्याचं कारण...NEET पेपर
एकच खळबळ! पेपरफुटी झालीच नाही, परीक्षा रद्द करण्याचं कारण...NEET पेपर.