AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology: ‘या’ राशींवर कायम असते शनिदेवाची कृपा, साडेसातीतही होत नाही फार त्रास

शनीची साडेसाती हा प्रत्येकासाठीच कठीण काळ असतो. मात्र शनिदेवाची काही राशींवर कृपादृष्टी असल्याने साडेसातीचा या राशींना फारसा त्रास होत नाही.

Astrology: 'या' राशींवर कायम असते शनिदेवाची कृपा, साडेसातीतही होत नाही फार त्रास
शनिदेव Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Nov 20, 2022 | 4:46 PM
Share

मुंबई, शनिदेव आणि साडेसाती (Sadesati) हा शब्द देखील उच्चरला तरी अनेकांच्या अंगावर काटा उभा राहतो. मात्र वास्तवात शनी (Shani) हा लाभदायक ग्रह आहे.  लोकांना त्यांच्या कर्मानुसार शुभ आणि अशुभ फळ देण्याचे काम शनिदेव करतात, अशी धार्मिक मान्यता आहे. ज्योतिषशास्त्रात शनीचे विशेष महत्त्व आहे. ज्या लोकांच्या कुंडलीत शनिदेव अशुभ घरामध्ये बसलेले असतात, त्यांच्या जीवनात विविध प्रकारचे संकट येतात. कुंडलीत शनीची दशा बरोबर नसेल तर व्यक्तीचे राजवैभव, वैभव आणि संपत्ती या सर्वांचा नाश होतो. दुसरीकडे, जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शनि चांगल्या घरात असेल तर सामान्य व्यक्तीलाही उच्च पदावर बढती मिळू शकते. ज्योतिष शास्त्रात शनिच्या साडेसातीला खूप त्रासदायक मानले जाते. ज्या लोकांच्या आयुष्यात साडेसातीचा कालावधी असतो त्यांना आर्थिक नुकसान, गंभीर आजार आणि विविध प्रकारच्या त्रासांना सामोरे जावे लागते. पण शनिदेव इतका त्रास सर्वांना देत नाहीत. सर्व 12 राशींमध्ये, शनिदेव विशेषत: 5 राशीच्या लोकांवर दयाळू असतात.

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार शनिदेवाला दोन राशींचे स्वामी मानले गेले आहे. मकर आणि कुंभ राशीचा स्वामी शनि आहे. या दोन्ही राशी शनिदेवाला अतिशय प्रिय आहेत. ज्योतिषशास्त्रात, राहू आणि केतू वगळता, सर्व ग्रहांवर एक किंवा दुसऱ्या राशीचा मालकी हक्क आहे. ज्या ग्रहांना राशीचा मालकी हक्क मिळाला आहे, ते ग्रह त्या राशींवर विशेष कृपा करतात. मकर आणि कुंभ व्यतिरिक्त, शनिदेव इतर काही राशींवर दयाळू आहेत.  या राशींवर फार परिणाम होत नाही.

शनिदेवाच्या 5 आवडत्या राशी कोणत्या आहेत? मकर

  1.  मकर राशीचा स्वामी शनिदेव आहे. मकर ही भगवान शनिदेवाच्या आवडत्या राशींपैकी एक आहे. ज्यावेळी शनीची साडेसाती मकर मकर राशीला असते.  तेव्हा शनिदेव मूळ राशीला फारसा त्रास देत नाहीत.  मकर राशीवर शनिची शुभ स्थिती असते तेव्हा या राशीच्या लोकांना सर्वात शुभ परिणाम मिळतात. मकर राशीच्या लोकांवर शनिदेव नेहमी कृपा ठेवतात.
  2.  कुंभ- मकर राशीव्यतिरिक्त शनि कुंभ राशीचाही स्वामी आहे. कुंभ राशीवर शनिदेव आपली विशेष कृपा ठेवतात. शनिदेवाच्या आशीर्वादामुळे या राशीच्या लोकांना कधीही आर्थिक समस्या येत नाही. कुंभ राशीच्या लोकांना साडेसातीचा फार त्रास होत नाही.
  3. तूळ- ज्योतिषशास्त्रानुसार तूळ शनिदेवाची उच्च राशी आहे. तूळ राशीमध्ये शनिदेव नेहमी चांगले फळ देतात. तूळ राशीत उर्वरित ग्रह अनुकूल असतील तर शनिदेव सर्व प्रकारच्या सुखसोयी प्रदान करतात. तूळ राशीमध्ये शनि साडेसाती असल्यास या राशीच्या राशीच्या लोकांना जास्त त्रास सहन करावा लागत नाही.
  4. धनु- धनु राशीचा स्वामी देवगुरु ग्रह आहे. शनि आणि गुरू या दोघांनाही एकमेकांशी मैत्रीची भावना आहे. याच कारणामुळे धनु राशीच्या लोकांवर शनिदेव विशेष कृपा करतात. धनु राशीला शनीची साडेसती आणि अडीचकी  राहिल्यास फारसा त्रास होत नाही. शुभ स्थितीत, शनिदेव धनु राशीच्या लोकांना अपार संपत्ती तसेच सुख आणि समृद्धी देतात.
  5. वृषभ- शुक्र हा वृषभ राशीचा अधिपती ग्रह असून शुक्राच्या राशीत शनिदेव हा योग कारक मानला जातो. या कारणास्तव शनिदेव वृषभ राशीच्या लोकांना जास्त त्रास देत नाहीत.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी