AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology: म्हणून शनिवारी शनि मंदिरातून चपला जोडे चोरी जाणे असते शुभ; अनेकाकांना नाही माहिती कारण

एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शनि ग्रह (Shani Planet) अशुभ स्थितीत असेल तर कामात यश सहजासहजी मिळत नाही. होणारे कामसुद्धा बिघडत जाते . जुन्या लोकांकडून आपण ऐकले असेल की शनी मंदिरातून चपला चोरी जाणे शुभ (shoes stolen from shani mandir)  असते. आपण ज्या चपला घालतो त्यामध्ये आपल्या ऊर्जेचे वास्तव्य असते. मग ती ऊर्जा सकारात्मक असो वा नकारात्मक […]

Astrology: म्हणून शनिवारी शनि मंदिरातून चपला जोडे चोरी जाणे असते शुभ; अनेकाकांना नाही माहिती कारण
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jul 11, 2022 | 6:05 PM
Share

एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शनि ग्रह (Shani Planet) अशुभ स्थितीत असेल तर कामात यश सहजासहजी मिळत नाही. होणारे कामसुद्धा बिघडत जाते . जुन्या लोकांकडून आपण ऐकले असेल की शनी मंदिरातून चपला चोरी जाणे शुभ (shoes stolen from shani mandir)  असते. आपण ज्या चपला घालतो त्यामध्ये आपल्या ऊर्जेचे वास्तव्य असते. मग ती ऊर्जा सकारात्मक असो वा नकारात्मक त्या ऊर्जेचा प्रभाव ती धारण करणाऱ्यावर होतो. म्हणूनच आपल्या संस्कृतीत संतांच्या पादुकांना विशेष महत्त्व आहे. जोतिष्यशास्त्रात (Astrology) शनी हा न्यायदेवता म्हणून ओळखला जातो.  शनी मंदिरातून चपला चोरी जाणे शुभ का मानतात या मागे कशी करणं आहेत त्याबद्दल जाणून घेऊया.

चामडे आणि पाय या दोन्हींवर शनीचा प्रभाव पडतो

भारतीय ज्योतिषशास्त्रामध्ये असे मानले जाते की चामडे आणि पाय या दोन्हींवर शनीचा प्रभाव पडतो, त्यामुळे शनिवारी जोडे आणि चप्पल चोरीला गेल्यास त्रासदायक दिवस लवकरच दूर होणार आहेत असे मानले जाते. शनिदेवाचे दुःख कमी व्हावे म्हणून अनेक लोक शनिवारी शनी मंदिरात बूट आणि चप्पल टाकून जातात. किंबहुना, मंदिरातून चपला आणि जोडे चोरीला जाणे शुभ संकेत आहे. भारतीय ज्योतिषशास्त्रात याबाबत अनेक प्रकारच्या समजुती आहेत. शनिवारी मंदिरातून बूट आणि चप्पल चोरीला गेल्यास ते खूप शुभ मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार हे शुभ संकेत आहे. जर शनिवारी मंदिरातून बूट आणि चप्पल हरवली किंवा चोरीला गेली तर याचा अर्थ असा होतो की लवकरच तुमचा वाईट काळ संपणार आहे, आणि आर्थिक संकटसुद्धा लवकरच संपणार आहे.

शनिवारी जोडे आणि चप्पल चोरीला जाणे  शुभ असते

ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की, शनि चरणात वास करतो. पायाशी शनि ग्रहाचा संबंध असल्याने शनी चप्पल आणि जोडे यांचा कारक आहे. यासोबतच असे मानले जाते की शनिवारी जोडे आणि चप्पल दान केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि सर्व संकटे दूर होतात.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच