AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology : बुद्धिमान आणि जोखिम स्विकारणाऱ्यांना आवडतात हे रंग, रंगांबद्दल जोतिशषास्त्र काय सांगतं?

आपण परिधान केलेले रंग आपल्याला सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम देतात. ते आपल्या भावनांवर परिणाम करतात आणि थेट आपल्या राशिचक्रांशी (Astrology) देखील जोडले जाऊ शकतात.

Astrology : बुद्धिमान आणि जोखिम स्विकारणाऱ्यांना आवडतात हे रंग, रंगांबद्दल जोतिशषास्त्र काय सांगतं?
जोतिशषास्त्रImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Mar 14, 2023 | 11:46 PM
Share

मुंबई : आवाज ज्या प्रकारे शांतता दूर करतो. तसे, विविध रंग जीवनातील नकारात्मकता दूर करतात आणि जीवनात विविध रंग भरतात. ज्याप्रमाणे पांढऱ्या कपड्याला रंग लावल्याने त्या कपड्याचा रंग बदलतो, त्याचप्रमाणे रंगांची निवडही माणसाचा स्वभाव सांगते. तुमचा यावर विश्वास असो किंवा नसो आपण परिधान केलेले रंग आपल्याला सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम देतात. ते आपल्या भावनांवर परिणाम करतात आणि थेट आपल्या राशिचक्रांशी (Astrology) देखील जोडले जाऊ शकतात. जोखिम घेणाऱ्या आणि बुद्धिमान लोकांना काही विशीष्ट रंग आवडतात. जाणून घेऊया ते रंग कोणते आहेत.

बुद्धिमान लोकांना आवडतात हे रंग

  1. पिवळा- हा रंग आध्यात्मिक तसेच प्रेम आणि उर्जेचे प्रतीक आहे. या रंगाने प्रभावित लोक संवेदनशील असतात. इतरांना मदत करण्याची भावना त्यांच्यात खूप प्रबळ असते. ज्या लोकांना हा रंग आवडतो ते तल्लख बुद्धिचे असतात. एकूणच, त्यांचा स्वभाव चांगला असतो आणि त्यांचा निसर्गावर खूप प्रेम आहे.
  2. तपकिरी- ज्या लोकांना तपकिरी रंग आवडतो, ते दीर्घकालीन नातेसंबंध आणि तर्कावर विश्वास ठेवतात. असे लोकं तपकिरी रंग पसंत करतात. ज्या लोकांना हा रंग आवडतो ते कोणतेही काम संयमाने करण्यावर विश्वास ठेवतात. हे लोकं व्यापारात जोखीम स्विकारतात.
  3.  हिरवा- भाज्यांचा हिरवा रंग सुरक्षा, तर्कशास्त्र, रचना आणि शिस्त इत्यादींवर विश्वास ठेवण्याची प्रवृत्ती दर्शवतो. हा रंग शारीरिक आणि मानसिक शक्ती देखील दर्शवतो. ज्यांना हा रंग आवडतो ते लोक बुद्धिमान असतात.  त्यांच्याकडे अनेक कल्पना असतात आणि त्या आधारे ते कामही करतात. त्यांच्याकडे प्रचंड स्पर्धात्मक क्षमता आहे आणि ते कधीही जोखीम घेण्यास चुकत नाहीत. जोडीदाराकडून योग्य आदर अपेक्षित आहे. ते कोणाशीही जुळवून घेतात.
  4. निळा- ज्या लोकांना हा रंग आवडतो ते सर्वात प्रेमळ आणि सहकार्य करणारे लोक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या जीवनात नातेसंबंध आणि अध्यात्म महत्त्वाचे आहेत.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?