AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology: चंद्राच्या संक्रमणामुळे तयार होत आहेत तीन योग, जाणून घ्या तुमच्या राशीवर काय परिणाम पडणार?

11 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 02:23 वाजता चंद्र मीन राशीत प्रवेश करेल. यामुळे मीन राशीत गजकेसरी योग तयार होईल. बृहस्पति एका वर्षासाठी मीन राशीत वास्तव्यास आहे. बृहस्पति हा मीन राशीचा स्वामी आहे. गजकेसरी योग अत्यंत शुभ मानला जातो.

Astrology: चंद्राच्या संक्रमणामुळे तयार होत आहेत तीन योग, जाणून घ्या तुमच्या राशीवर काय परिणाम पडणार?
चंद्राचे संक्रमण Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Sep 08, 2022 | 7:18 PM
Share

Astrology: चंद्र हा वैदिक ज्योतिषशास्त्रातील सर्वात वेगाने भ्रमण करणारा  ग्रह आहे. अडीच दिवसात चंद्र (moon transit) राशी बदलतो. त्यामुळे हा ग्रह प्रत्येक राशीवर (Horoscope) त्याच्या संक्रमणानुसार परिणाम करतो. तसेच या प्रभावाचा कालावधी देखील अल्पकाळ असतो. काही वेळा एकाच राशीत दोन ग्रह एकत्र येऊन योग तयार होतो. काही योग शुभ तर काही अशुभ असतात. ज्योतिषशास्त्रात चंद्राला मनाचा स्वामी मानले जाते. चंद्राच्या प्रभावामुळे व्यक्तीचे मन चंचल किंवा स्थिर होते. अनेकदा चंद्राच्या संक्रमणाचे शुभ आणि अशुभ असे दोनीही प्रभाव पडतात. विशेष म्हणजे चंद्र राशीतील बदल सर्वच राशींवर परिणाम करतो.

चंद्राचा मीन राशीत प्रवेश

11 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 02:23 वाजता चंद्र मीन राशीत प्रवेश करेल. यामुळे मीन राशीत गजकेसरी योग तयार होईल. बृहस्पति एका वर्षासाठी मीन राशीत वास्तव्यास आहे. बृहस्पति हा मीन राशीचा स्वामी आहे. गजकेसरी योग अत्यंत शुभ मानला जातो. जन्मकुंडलीत तयार झालेल्या सर्व धन योगांपैकी हा सर्वात शक्तिशाली योग आहे. धनाचा स्वामी बृहस्पति आणि मनाचा स्वामी चंद्र हा योग तयार करतात. कुंभ राशीच्या दुसऱ्या घरात, मिथुन राशीच्या दहाव्या घरात आणि वृषभ राशीच्या 11 व्या घरात हा योग तयार होत आहे. या राशींना चांगला फायदा होईल.

या राशींना ग्रहण योगाचा फायदा झाला आहे

13 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 06:35 वाजता चंद्र मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करेल. यामुळे मेष राशीमध्ये ग्रहण योग तयार होईल. राहू दीड वर्ष मेष राशीत स्थित आहे. जेव्हा चंद्र राहूसोबत येतो तेव्हा ग्रहण योग तयार होतो, जो अशुभ मानला जातो. ज्या लोकांवर ते वर्चस्व गाजवते. त्याचा त्यांच्या मानसिक स्थितीवर वाईट परिणाम होतो. ज्योतिषशास्त्रानुसार राहू आणि चंद्राच्या संबंधामुळे चंद्र बाधित होतो. त्याचा प्रभाव मीन, कर्क आणि मिथुन राशीच्या लोकांवर राहील.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?