AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Todays Horoscope : आजचे राशी भविष्य 20 फेब्रुवारी 2023, या राशीच्या लोकांनी अनावश्यक राग आणी तापटपणा टाळावा

आजचे राशी भविष्य. जाणून घ्या कसा जाणार तुमचा आजचा दिवस. या राशीच्या नोकरवर्गाकरिता आनंदाची बातमी मिळेल

Todays Horoscope : आजचे राशी भविष्य 20 फेब्रुवारी 2023, या राशीच्या लोकांनी अनावश्यक राग आणी तापटपणा टाळावा
राशी भविष्यImage Credit source: Tv9 Marathi
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Feb 20, 2023 | 12:05 AM
Share

मुंबई, ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Todays rashibhavishya Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

आजचे बारा राशींचे राशी भविष्य

मेष:

प्रकृती वर लक्ष द्या. मानसिक क्लेश वाढेल. स्वभावात मत्सर, चिडचिड पणा राहिल. कौटुंबिक पातळीवरही समस्या उद्‌भवतील. कुटुंबापासुन दूर जाल.अनावश्यक राग आणी तापटपणा टाळावा.मोठी गुंतवणूक आज करू नये. मित्रमैत्रिण, नातेवाईकांसोबत सलोख्याने वागा.  कामाच्या ठिकाणी अतिरिक्त ताण जाणवेल. शत्रुपक्ष वरचढ होतील. विरोधकाच्या कारवायात वाढ होईल. आरोग्याबाबतीत विशेष काळजी घ्या.

वृषभ:

वाहन खरेदीचा विचार करत असाल तर आजचा दिवस आनंददायी आहे. पत्नीकडून सहकार्य लाभेल. जोडीदार नोकरी करत असल्यास बढतीचे योग आहेत. राजकीय, कलाक्षेत्रातील व्यक्तींना पद प्रतिष्ठा लाभेल. आरोग्यही उत्तम राहील. शुभ दिनमान असेल. प्रेमप्रकरणात स्नेह वाढेल. विवाह बद्दल इच्छित असणाऱ्याचे विवाह खात्रीशीर जुळतील. संततीकडून समाधान सुख लाभेल. कौटुंबिक पातळीवर संतुष्ट राहाल. पत्नीकडून विशेष सहकार्य लाभेल.

मिथुन:

मन प्रसन्न राहील. नवनवीन कल्पना सुचतील आणि त्या आमलातही आणाल. त्यातून आर्थिक स्रोत वाढेल. मनातील संभ्रम दूर ठेवा. दाम्पत्य जीवन सुखी राहील. विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळू शकते. नवीन व्यापार कामकाजास प्रारंभ करण्यासाठी उत्तम दिवस आहे. आरोग्य उत्तम राहील. नवीन घर, वाहन खरेदीस करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. कुटुंबात मंगल कार्य घडतील. कुटुंबातील वातावरण आनंददायक राहिल. आपल्या कार्यात यश आणि प्रसिद्धी लाभेल.

कर्क:

मनातील संयशावृती वाढेल. भावनेवर नियंत्रण ठेवा.  स्त्रींयासोबत सन्मानाने आदरभावयुक्त व्यवहार ठेवावेत. नोकरी बदलाची शक्यता आहे. मनावरचा संयम कमी होऊ शकतो. शासकीय कामकाजात अडचणीत आणणारे दिनमान राहील. मित्रमैत्रीणींसोबत आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा. भांवडासोबत वादविवाद टाळा. व्यावसायिक स्पर्धेत अपेक्षित सहकार्य लाभणार नाही. निरर्थक कामात वेळ वाया घालवाल. स्वःतावर नियंत्रण ठेवा. मनात सदैव नकारात्मकता राहण्याची शक्यता आहे. व्यापारात काळजीपूर्वक व्यवहार करावेत.

सिंह:

वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्या. आज यश निश्चित लागेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी प्राप्त कराल. नवीन कल्पना नक्की मांडा. आपल्याला सहकार्य लाभेल. भाग्यस्थ राहु व्यापारीवर्गाकरिता आकस्मिक धनलाभ होईल. विदेश भ्रमणाचे योग आहे. प्रवासातुन आर्थिक लाभ घडतील. पोलिस सैन्यातील व्यक्तीकरीता कर्मस्थ मंगळामुळे पदप्राप्ती मानसन्मान वाढीस लागेल. गृहस्थी सौख्य लाभेल. एकंदरीत आजचे दिनमान उत्तम आहे.आकस्मिक धनलाभ होईल.

कन्या:

नोकरीत उपयोगी चर्चा घडून येतील. टाळत असलेले काम पूर्ण होण्याचा योग आहे. व्यापारातील विस्ताराच्या दृष्टीने केलेल्या योजनात यशस्वी व्हाल. कला क्षेत्रातील व्यक्तींना नवीन संधी व मानधनात वाढ होईल.कामाचे कौतुक होऊन मानसन्मान वाढेल.संततीच्या प्रश्नामध्ये निर्णायक यश मिळेल. वैवाहिक जीवनात पत्नीचा पूर्ण पाठिंबा मिळाल्याने आपले मनोबल वाढवणारा दिवस राहील. प्रवास लाभदायक होतील. वाचनाची गोडी लागेल.

तुला:

शारिरिक इजा अथवा जुने आजार त्रास देतील. कुंटुंबातील वरिष्ठमंडळीच्या प्रकृतीकडे लक्ष दया. कोणतेही महत्वाचे निर्णय आज घेऊ नये. अशुभ, अप्रिय घटना ऐकायला मिळतील. सावधानीपूर्वक वाटचाल करावी. व्यापारात आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करावेत. निर्धारित वेळेत काम पूर्ण होण्याची काळजी घ्या. रागावर नियंत्रण ठेवून वाटचाल करा.

वृश्चिक:

वरिष्ठ मंडळी आपल्या कामावर समाधानी असतील. राजकीय सामाजिक, कला क्षेत्रातील व्यक्तींना शुभ दिनमान आहे. सरकारी योजना आमलांत आणल्या जातील. कलाकाराचा मान-सन्मान वाढेल. व्यापारात आर्थिक लाभ होतील. जुनी येणी येतील. कर्जप्रकरण मंजूर होतील. प्रवासातून लाभाचा दिवस आहे. प्रकृती स्थिर राहिल. नवीन कार्यास आंरभ करण्यासाठी दिवस योग्य आहे. व्यवसायिक प्रवास होईल. प्रवासातून आर्थिक लाभ होतील.

धनु:

मित्रमैत्रिणी नातेवाईकाकडून मदत मिळेल. कार्यक्षेत्रात मन मग्न राहिल. कामाचा योग्य मोबादला मिळाल्याने आत्मसंतुष्टी मिळेल. पत्नीसौख्य आणी संततीसौख्यही उत्तम असेल. आनंददायी वातावरण राहिल. स्वभावातील गुणदोषं मात्र टाळावेत. सामाजिक, राजकीय क्षेत्रातील व्यक्तींकडून सहकार्य लाभेल. शासकिय योजनेतून लाभ होईल. मनोबल उत्तम राहील. अचानक लाभ होईल.

मकर:

नोकरीत अतिरिक्त कामाची जबाबदारी मिळेल. बढतीची संधी आहे. आप्तेष्ट मित्रपरीवारांकडून सहकार्य लाभेल. कौटुंबिक जिवन आनंदी राहील. प्रेमप्रकरणात यश लाभेल. संततीविषयी चिंता मिटेल. कोर्टकचेरीची प्रकरण असतील तर निकाल आपल्या बाजूने लागेल. जमीन खरेदी-विक्रीतून अधिक लाभ होईल. शिक्षक वर्गाचा मान-सम्मान वाढेल. आजचे दिनमान सफलतादायक आहे. संशोधन क्षेत्रातील व्यक्तींच्या मानधनात वाढ होईल. मानसन्मान आणि पुरस्कार,प्रसिद्धी मिळेल.

कुंभ:

विरोधक डोके वर काढतील.शत्रुपक्षाच्या कारवाया वाढण्याची शक्यता राहिल.कौटुंबिक पातळीवर काही समस्या उद्भभवतील. मानसिक स्वास्थ बिघडणार नाही. याबाबत काळजी घ्यावी लागेल. अनावश्यक कामात वेळ वाया घालू नका. मागील स्मृती उजाळल्याने दुखः होईल. शक्यतो प्रवास टाळा. अपघात दुघर्टना घडण्याची शक्यता आहे.

मीन:

प्रेमसंबंधामध्ये जोडीदाराबद्दल प्रेमभावना वाढेल. नोकरवर्गाकरिता आनंदाची बातमी मिळेल. कुटुंबातील वातावरण उत्साहवर्धक व आंनदायक राहिल. व्यापारीवर्गाकरिता आर्थिक दृष्टीकोनातून आजचा दिवस उत्तम स्वरूपाचा आहे. धनवृद्धी होईल, विरोधकावर मात कराल. संततीकडून चांगली बातमी मिळेल. ओळखीच्या लोकांकडून फायदा होईल. नवीन घर वाहन खरेदीस चांगला दिवस आहे. वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य लाभणार आहे. गुरू स्वराशीत असल्यामुळे लाभदायक दिवस आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
माझ्या कार्यक्रमानंतर भाजपकडून स्टेजचं शुद्धीकरण - खर्गे
Mallikarjun Kharge | माझ्या कार्यक्रमानंतर भाजपकडून स्टेजचं शुद्धीकरण - खर्गे
राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या
महाराष्ट्र आणि राष्ट्रीय घडामोडी: राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट....
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट सुप्रीम कोर्टात बाजू मांडणार!
धनुष्यबाण गोठणार? शिवसेना ठाकरेंना परत मिळणार? सरोदेंचा खळबळजनक दावा!
धनुष्यबाण गोठणार? शिवसेना ठाकरेंना परत मिळणार? असीम सरोदेंचा खळबळजनक दावा!
टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
मोठी घडामोड! टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
महाराष्ट्र आधी राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
महाराष्ट्र आधी… राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला निर्णय
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला मोठा निर्णय, व्हिडिओ बघाच
शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा
Sanjay Raut | शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बस्तर सफरीत काळाचा घाला! मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या....
Kumbh Mela | बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या नावाने नेमकं काय घडलं?