Todays Horoscope: आजचे राशी भविष्य 19 जानेवारी 2022, ‘या’ राशीच्या लोकांनी अती घाईत निर्णय घेऊ नये

| Updated on: Jan 19, 2023 | 12:54 AM

आजचे राशी भविष्य, जाणून घ्या कसा जाणार तुमचा आजचा दिवस. या राशीच्या लोकांचे घरगुती वातावरण हसते-खेळते राहील.

Todays Horoscope: आजचे राशी भविष्य 19 जानेवारी 2022, या राशीच्या लोकांनी अती घाईत निर्णय घेऊ नये
आजचे राशी भविष्य
Image Credit source: Tv9 Marathi
Follow us on

मुंबई, ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Todays rashibhavishya Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

 

बारा राशींचे राशींचे राशी भविष्य

 

हे सुद्धा वाचा

मेष:-

तुम्ही आतुरतेने वाट पाहत असलेली गोष्ट समोर येऊन ठेपेल. भौतिक सुखाचा आनंद घ्याल. एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदला. गरजूंना मदत कराल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. उगाच कोणाच्या भरवश्यावर राहू नका. आवश्यक त्या गोष्टी समजावून घ्या. कार्यालयीन सहकार्‍यांची मदत मिळेल. नवीन ओळख भविष्यात उपयोगी पडेल. व्यावसायिक गोष्टीत याच उपयोग होईल.

वृषभ:-

कौटुंबिक वादात पडू नका. कोणतेही वचन देताना सावध रहा. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे. बचतीकडे लक्ष द्यावे. नवीन योजनांवर लक्ष केन्द्रित करावे. जुन्या दुखण्यांना गांभीर्याने घ्या. सामाजिक क्षेत्रात नवीन ओळखी होतील. भावनेला आवर घालावी लागेल. घरगुती प्रश्न सामोपचाराने सोडवा. कामातील निर्णय योग्य ठरतील.

मिथुन:-

आपल्यातील कौशल्याचा पुरेपूर वापर करावा. निर्णय तुमच्या बाजूचा असेल. मुलांच्या काही बाबी गांभीर्याने घ्या. व्यवसईकांनी संधीचा लाभ घ्यावा. ज्येष्ठ बंधूंचा पाठिंबा मिळेल. अनोळखी लोकांशी व्यवहार टाळा. इतरांच्या मनीचे गुज जाणून घ्या. संमिश्र घटना घडू शकतात. मनातील इच्छा पूर्ण होईल. कौटुंबिक वातावरणात रमाल.

कर्क:-

आपल्या मर्जीप्रमाणे वागाल. दिवस कलासक्त असेल. वरिष्ठांना खुश कराल. मित्रांविषयि गैरसमज होऊ शकतात. काही अनपेक्षित बदल दिसून येतील. काही गोष्टी नरमाईने घ्या. भडक मत दर्शवू नका. तडजोडीने मार्ग काढावा. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवा. कामाची धांदल उडू शकते.

सिंह:-

मित्रांच्या मदतीने कामे पूर्ण होतील. अधिकाराची अंमलबाजावणी करावी. वैचारिक स्थिरता ठेवावी. पायाची दुखणी संभवतात. विद्यार्थांचे प्रश्न सुटतील. अहंकाराला खतपाणी घालू नका. बोलतांना इतरांच्या भावनेचा विचार करावा. पित्त विकाराचा त्रास जाणवेल. मदतीला मागे हटु नका. कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल.

कन्या:-

व्यवसायिकांना लाभदायक दिवस. मनातील इच्छा पूर्ण कराल. सर्व गोष्टीत आनंद वाटेल. बोलतांना सांभाळून शब्द वापरा. नातेवाईकांना नाराज करू नका. क्रोधवृत्तीला आवर घालावी. अचानक धनलाभ संभवतो. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. मौल्यवान वस्तु जपून ठेवा. अति विचार करू नका.

तूळ:-

आपल्याच मतावर अडून राहाल. इतरांच्या बाजूचा देखील विचार करावा. वागण्यातून अति स्पष्टता दर्शवू नका. कौटुंबिक बाबी देखील विचारात घ्याव्यात. कामाची धांदल राहील. पराक्रमाला वाव आहे. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. कामातून इतर गोष्टींकडे लक्ष जाऊ शकते. तरूणांकडून नवीन विचार जाणून घ्याल. अधिकारी वर्गाचा पाठिंबा मिळेल.

वृश्चिक:-

आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. मैत्रित गैरसमज होण्याची शक्यता. डोकेदुखीचा त्रास संभवतो. पुढील गोष्टींचा अंदाज बांधावा. कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल. कामातून समाधान लाभेल. नातेवाईक भेटतील. तुमची प्रतिष्ठा वाढीस लागेल. कमिशन मधून लाभ कमवाल. वडीलांचे सहकार्य मिळेल.

धनू:-

जोडीदाराचा सल्ला अवश्य घ्यावा. संभ्रमित असताना निर्णय घेऊ नका. दिवस मध्यम फलदायी. वैचारिक स्थिरता ठेवावी. नियमांना तडा जाऊ देऊ नका. कौटुंबिक समस्या जाणून घ्याव्यात. नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा. मुलांच्या खोडकरपणात रमून जाल. दिवस खेळीमेळीत जाईल.

मकर:-

लहान आजरांकडे लक्ष ठेवा. चालढकल करू नका. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. जुन्या गोष्टी आठवत बसू नका. चारचौघात कौतुक होईल. मनाची चलबिचलता जाणवू शकते. लहान प्रवास चांगला होईल. भावंडांची उत्तम साथ मिळेल. आरोग्याची काळजी घ्यावी. हातापायाच्या दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका.

कुंभ:-

भागीदारीत फार विसंबून राहू नका. बोलतांना आपले मत शांतपणे मांडा. नवीन उत्पादने घेऊ शकाल. नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. सरकारी योजनांचा लाभ घ्या. आवडीचे पदार्थ खाल. कौटुंबिक वातावरण खेळकर राहील. विचारांना अधिक चालना देऊन पहावे. मित्रांशी वादाचे प्रसंग टाळावेत. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका.

मीन:-

स्थावर संबंधी योजनांना चालना द्याल. अतिघाईत निर्णय घेऊ नका. आरामाची इच्छा पूर्णत्वास जाईल. व्यावसायिक विकास शक्य होईल. काहीशी मानसिक शांतता लाभेल. कोणतीही गोष्ट अविचाराने करू नका. घरगुती वातावरण हसते-खेळते राहील. जोडीदाराची चंगाली साथ मिळेल. भागीदारीत फार विसंबून राहू नका.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)