Baba Vanga : ज्याची भीती होती तेच झालं, बाबा वेंगांची पहिली भविष्यवाणी झाली खरी; 2025 बाबत वर्तवलंय महाभयंकर भाकित

बाबा वेंगा यांनी वादळात सापडल्यामुळे आपली दृष्टी गमावली, मात्र असं मानलं जातं त्यानंतर त्यांना दिव्य दृष्टी प्राप्त झाली, आणि पुढच्या काळात जगात ज्या काही घडामोडी घडणार आहेत, त्याबद्दल त्यांनी भविष्यवाणी केली आहे.

Baba Vanga : ज्याची भीती होती तेच झालं, बाबा वेंगांची पहिली भविष्यवाणी झाली खरी; 2025 बाबत वर्तवलंय महाभयंकर भाकित
| Updated on: Mar 03, 2025 | 9:31 PM

प्रसिद्ध भविष्यवेत्ता बाबा वेंगा यांनी आपल्या लहानपणीच दृष्टी गमावली होती, एका वादळात सापडल्यामुळे बाबा वेंगा यांना आपल्या डोळ्याची दृष्टी गमवावी लागली असं म्हणतात. त्यांनी आपल्या हयातीमध्ये पुढील काळात जगामध्ये घडणाऱ्या अनेक घटनांची भविष्यवाणी करून ठेवली आहे.त्यातील अनेक घटना या खऱ्या ठरल्याचा दावा देखील केला जातो. बाबा वेंगा यांनी 2025 बाबत देखील काही भाकीतं वर्तवली आहेत. 2025 साली जगाच्या अंताची सुरुवात होईल, युद्ध आणि भूकंप होतील असं बाबा वेंगा यांनी म्हटलं होतं.

बाबा वेंगा यांची ही भविष्यवाणी खरी ठरताना दिसत आहे, बाबा वेंगा यांच्या या भाकि‍ताची झलक गेल्या काही दिवसांमध्ये भारतासह इतर काही देशांमध्ये पाहायला मिळाली आहे. बाबा वेंगा यांनी सांगितलं होतं की 2025 मध्ये काही विनाशकारी भूकंपांचा जगाला सामना करावा लागेल. या घटनेत मोठ्या प्रमाणात वित्तहानी आणि जीवितहानी होईल. बाबा वेंगा यांचं हे भाकित आता खरं होताना दिसत आहे. अमेरिकेपासून ते आशिया खंडातील अनेक देशांना सध्या भूकंपाचे धक्के बसत आहेत. भारताबाबत बोलायचं झाल्यास भारतात देखील दिल्लीपासून ते बिहार आणि पश्चिमबंगालपर्यंत भूकंपाचे धक्के जानवले आहेत, त्यामुळे बाबा वेंगा यांची भविष्यवाणी खरी होणार का? अशी भीती
आता व्यक्त केली जात आहे.

बाबा वेंगा यांनी वादळात सापडल्यामुळे आपली दृष्टी गमावली, मात्र असं मानलं जातं त्यानंतर त्यांना दिव्य दृष्टी प्राप्त झाली, आणि पुढच्या काळात जगात ज्या काही घडामोडी घडणार आहेत, त्याबद्दल त्यांनी भविष्यवाणी केली आहे. 2025 साली जगाच्या अंताची सुरुवात होईल, या वर्षात प्रचंड महाभयंकर भूकंपांचं संकट जगावर येईल, पूर्वेकडील देशांमध्ये युद्ध होतील याचा परिणाम पश्चिमेकडील देशांवर देखील होईल असं बाबा वेंगा यांनी म्हटलं आहे. दरम्यान आता मार्च महिना सुरु झाला आहे, मार्च महिना सुरू होण्याआधीच जगातील अनेक देशांमध्ये भूकंपांचे धक्के जानवले आहेत, तसेच युद्ध स्थिती देखील आहे. त्यामुळे बाबा वेंगा यांचं भविष्य खरं होणार का? अशी भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान 2025 च्या मार्च आणि एप्रिल महिन्यात अनेक अनाकलनीय घटना घडतील असं भाकीत देखील बाबा वेंगा यांनी वर्तवलेलं आहे, त्यामुळे नेमकं काय घडणार? याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)