AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महादेवाची पूजा करतांना हे नियम अवश्य पाळा, सदैव राहिल भोलेनाथाची कृपादृष्टी

असे मानले जाते की श्रावण महिन्यात भोलेनाथ भक्तांवर कृपा करतात. त्याचबरोबर भगवान शंकराची पूजा करताना काही वास्तु नियमांची काळजी घेणे आवश्यक आहे.

महादेवाची पूजा करतांना हे नियम अवश्य पाळा, सदैव राहिल भोलेनाथाची कृपादृष्टी
शिव परिवारImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jul 12, 2023 | 4:58 PM
Share

मुंबई : श्रावण महिना (Shrawan 2023) 18 जूलैपासून सुरू होणार आहे. यावेळी श्रावण 59 दिवसांचा असणार आहे. सावन महिन्यात भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. यासोबतच भोलेनाथाची पूजाही केली जाते. असे मानले जाते की श्रावण महिन्यात भोलेनाथ भक्तांवर कृपा करतात. त्याचबरोबर भगवान शंकराची पूजा करताना काही वास्तु नियमांची काळजी घेणे आवश्यक आहे. भगवान शंकराच्या पूजेमध्ये वास्तुशी संबंधित चुका  करू नयेत. असे केल्याने पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही. ते नियम काय आहेत जाणून घेऊया.

या दिशेला असावे शिवलींग

शास्त्रानुसार, भगवान शिवाचे निवासस्थान कैलास पर्वत आहे, जे उत्तर दिशेला असल्याचे मानले जाते. घरामध्ये महादेवाची पिंड किंवा फोटो स्थापित करताना त्याची दिशा उत्तरेकडेच असावी हे लक्षात ठेवा.

तांडव नृत्य करतांनाचा फोटो लावू नये

शास्त्रानुसार भगवान शिव यांना भोले भंडारी या नावाने ओळखले जातात. आजच्या काळात बाजारात शंकराच्या अनेक मूर्ती आणि चित्रे उपलब्ध आहेत. अशा स्थितीत कधीही घरामध्ये भगवान शंकराचे क्रोध मुद्रोमधला कोणताही फोटो ठेवू नका. असे करणे हे विनाशाचे प्रतीक मानले जाते.

पूजेत या गोष्टी वापरू नये

शिवपूजेत लक्षात ठेवा की तुटलेला तांदूळ, सिंदूर, हळद, तुळस, शंख पाणी, केतकी, चंपा, केवड्याची फुले शिवलिंग आणि भोलेनाथावर अर्पण करू नयेत. असे केल्याने भगवान शिव क्रोधित होतात.

शिव कुटुंबाचा फोटो लावा

जर तुम्ही विवाहित असाल तर घरात शिव कुटुंबाचा फोटो लावा. भगवान शिवाच्या कुटुंबाच्या चित्रात गणेश आणि माता पार्वती दिसत आहेत पण कार्तिकेय दिसत नाही. एखाद्याने नेहमी अशी मूर्ती निवडावी ज्यामध्ये कार्तिकेय उपस्थित असेल कारण ते देखील भगवान शिवाचे पुत्र आहेत. तेच चित्र लावा, ज्यात भगवान शिव, माता पार्वती, भगवान गणेश आणि कार्तिकेय आहेत.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?
मोठी बातमी! शिंदे गटाचं टेन्शन वाढलं? कोर्टाच्या निदर्शनात असं काय आलं
मोठी बातमी! शिंदे गटाचं टेन्शन वाढलं? कोर्टाच्या निदर्शनात असं काय आलं?