Shukra Gochar 2023 : वर्षाच्या अखेरीस शुक्र ग्रह करणार स्वराशीत प्रवेश, तीन राशींना मिळणार लाभ
शुक्र हा ग्रह भौतिक सुखांचा कारक मानला जातो. त्यामुळे राशीचक्रात शुक्राची स्थिती नेमकी कुठे आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरतं. शुक्र ग्रह तूळ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे राशीचक्रावर सकारात्मक परिणाम दिसून येईल. पण तीन राशीच्या जातकांना सर्वाधिक फायदा होणार आहे.

मुंबई : राशीचक्रावर ग्रहांच्या गोचराचा प्रभाव पडत असतो. गोचर कालावधी, ग्रहांची दृष्टी यानुसार फलज्योतिष मांडलं जातं. हे आकलन ढोबळमानाने घेतलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र हा ग्रह भौतिक सुखांचा कारक आहे. शुक्र ग्रह वैयक्तिक कुंडलीत बलवान असेल तर धन, वैभव, ऐश्वर्य आणि भौतिक सुखांची अनुभूती मिळते. गोचर कुंडलीनुसार शुक्र ग्रह 30 नोव्हेंबरला स्वरास असलेल्या तूळ राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र ग्रहाच्या गोचराचा राशीचक्रावर परिणाम दिसून येईल. पण राशींच्या जातकांना जबरदस्त लाभ मिळणार आहे. आर्थिक स्थितीही या काळात सुधारेल असं ग्रहमान असेल. चला जाणून घेऊयात कोणत्या तीन राशींना लाभ मिळणार ते…
या तीन राशींना मिळणार लाभ
मिथुन : या राशीचा स्वामी ग्रह बुध आहे. त्यात बुध आणि शुक्र ग्रहांमध्ये मित्रत्वाचं नातं आहे. शुक्र ग्रह या राशीच्या पंचम स्थानात असणार आहे. त्यामुळे या कालावधीत प्रगती दिसून येईल. खासकरून मुलांच्या अभ्यासात बदल दिसून येईल. त्यांची प्रगती पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. पण बुध आणि शुक्राच्या मैत्रीचा हा परिणाम असेल. प्रेम प्रकरणातही अपेक्षित यश मिळेल. लग्नासाठी होकार मिळू शकतो. व्यवसायात काही योजना राबवू शकता.
कन्या : या राशीच्या जातकानाही शुक्राचं पाठबळ मिळेल. बोलणं आणि वागण्यात फरक दिसून येईल. तुमच्या वागण्याचा प्रभाव लोकांवर पडेल. त्यामुळे समाजात मानसन्मान वाढेल. नोकरीच्या ठिकाणीही सकारात्मक बदल दिसून येईल. नवीन जबाबदारी मिळू शकते. नशिबाची उत्तम साथ मिळेल. काही किचकट कामं झटपट पूर्ण होऊ शकतात. कामानिमित्त प्रवास करण्याचा योग जुळून येईल.
मकर : या राशीचं स्वामित्त्व शनि ग्रहाकडे आहे. शनि आणि शुक्र यांच्या मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे शुक्राची या राशीच्या जातकांना उत्तम साथ मिळेल. शुक्र ग्रह कर्म स्थानात गोचर करणार आहे. त्यामुळे नोकरी करणाऱ्या जातकांना अपेक्षित लाभ मिळेल. करिअरशी निगडीत काही सकारात्मक घडामोडी घडतील. घेतलेलं शिक्षण आणि त्या क्षेत्राशी निगडीत कामं मिळण्यास सुरुवात होईल. चित्रपट, मीडियातील लोकांना लाभ मिळेल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)