तुम्हाला जोडीदाराची रास माहिती असेल तर प्रेमविवाह जमेल का? जाणून घ्या षडाष्टक योगाबाबत

| Updated on: Feb 06, 2023 | 7:52 PM

प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं, असं म्हंटलं जातं. पण ज्योतिषशास्त्र मानणाऱ्यांना राशी आणि गुणांचा अडसर येतो. गुण जुळवण्यापूर्वी रास जुळतंय का? पाहणं महत्त्वाचं ठरतं, जाणून घ्या काय सांगतं ज्योतिषशास्त्र

तुम्हाला जोडीदाराची रास माहिती असेल तर प्रेमविवाह जमेल का? जाणून घ्या षडाष्टक योगाबाबत
तुम्हाला जोडीदाराची रास माहिती आहे का? लग्न जमणार की नाही? षडाष्टक योगाबाबत जाणून घ्या
Follow us on

मुंबई- प्रेम कधी कोणावर कसं जडेल सांगता येत नाही. प्रेमाच्या अनेक कथा आपण वाचल्या असतील, रुपेरी पडद्यावर पाहिल्या असतील किंवा प्रत्यक्षात अनुभवल्या देखील असतील. सध्या प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी फेब्रुवारीतील येता आठवडा महत्त्वाचा आहे. 7 फेब्रुवारीपासून 14 फेब्रुवारीपर्यंत आपल्या भावना प्रेयसीपर्यंत पोहोचवण्यासाठीचा हा आठवडा आहे. रोझ डे, प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमिस डे, हग डे, किस डे आणि शेवट व्हॅलेंटाइन डेनं होतो. पण अनेकदा प्रेयसी किंवा प्रियकराने होकार दिल्यानंतर ही कुंडलीवर अडून बसतं. नाव, रास आणि गुण जुळतात का? यावर घरचे नकार देतात. त्यामुळे लग्न करायचं की नाही असा प्रश्न पडतो. अनेकदा कुंडलीतील ग्रह तारे सोडून प्रेमाचा स्वीकार केला जातो आणि लग्न केलं जातं. मात्र अडचणी आल्या की गुण-राशीचा उल्लेख भांडणात होतो. जर तुम्हाला तुमच्या प्रेयसी किंवा प्रियकराची रास माहिती असेल तर लग्न जुळतं की नाही हे पाहू शकता. यासाठी तुम्हाला प्राथमिक टप्प्यावर तरी ज्योतिषाकडे जाण्याची गरज नाही. प्रियकर आणि प्रेयसीची रास षडाष्टक टप्प्यात येत असेल तर मात्र लग्न जमणं कठीण होतं.लग्न झालं तरी भावी आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं.

षडाष्टक योग असलेल्या राशी

राशीचक्रात एकूण 12 राशी आहेत. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु,मकर, कुंभ, मीन या क्रमाने बारा राशी येतात.
उदाहरण घ्यायचं तर राशीचक्रातील मेष ही पहिली रास येते.मेष राशीला पहीले स्थान दिले असता पुढे सहावी रास कन्या येते, म्हणजे षड (सहा) त्यानंतर कन्या राशीला प्रथम स्थान दिलं आणि मोजलं तर मेष रास ही आठव्या स्थानी (अष्टक) येते. म्हणजेच मेष आणि कन्या राशीचं षडाष्टक योग होतो.ह्या राशींच्या व्यक्तींचे एकमेकांशी पटत नाही असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे.प्रत्येक राशीचा स्वत:चा असा गुणधर्म असतो. त्यामुळे दोन राशी परस्पर विरोधी ठरतात. मेष राशीचं वर्णन एक घाव दोन तुकडे असं केलं जातं. तर कन्या रास ही एक पाऊल मागे घेत वाटाघाटीला प्राधान्य देते.एकमेकांपासून सहाव्या किंवा आठव्या स्थानी आलेल्या राशींबरोबर षडाष्टक योग तयार होतो.

षडाष्टक असलेल्या राशी

  • मेष X कन्या
  • वृषभ X तूळ
  • मिथुन X वृश्चिक
  • कर्क X धनु
  • सिंह X मकर
  • कन्या X कुंभ
  • तूळ X मीन

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)