AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology: ‘या’ राशींच्या लोकांना उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळाल्याने आर्थिक परिस्थीती सुधारेल!

मेष- मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा दिवस मेहनतीचा असणार आहे. व्यवसायातील कामात सुधारणा होईल. जुना काळ विसरून पुढे गेलात तर यशस्वी रहाल. कोणताही वाद लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करा. महिलांचा दिवस घरातील कामांमध्ये व्यतीत होईल. वृषभ- तुमच्या आयुष्यात खूप आनंद येणार आहे. स्वतःचे घर खरेदी करण्याची योजना आखू शकता. व्यापाऱ्यांसाठी हा दिवस शुभ आहे. कामाच्या ठिकाणी […]

Astrology: 'या' राशींच्या लोकांना उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळाल्याने आर्थिक परिस्थीती सुधारेल!
राशी भविष्य
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jul 14, 2022 | 5:00 AM
Share
  1. मेष- मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा दिवस मेहनतीचा असणार आहे. व्यवसायातील कामात सुधारणा होईल. जुना काळ विसरून पुढे गेलात तर यशस्वी रहाल. कोणताही वाद लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करा. महिलांचा दिवस घरातील कामांमध्ये व्यतीत होईल.
  2. वृषभ- तुमच्या आयुष्यात खूप आनंद येणार आहे. स्वतःचे घर खरेदी करण्याची योजना आखू शकता. व्यापाऱ्यांसाठी हा दिवस शुभ आहे. कामाच्या ठिकाणी असलेल्या तुमच्या कामगिरीवरून अनेकजण प्रभावित होतील. मेहनतीने अगदी कठीण कार्ये देखील सहजपणे पूर्ण केली जातील.
  3. मिथुन- तुम्ही कुटुंबातील सदस्यांच्या अपेक्षांप्रमाणे सर्वकाही होईल. मनाला शांती मिळेल.उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळाल्याने आर्थिक परिस्थिती सुधारेल. सर्जनशील कार्य करण्याची संधी मिळेल.
  4. कर्क- तुम्ही स्वतःला सिद्ध करून दाखवू शकता. नशिबाच्या मदतीने  मोठे यश मिळवू शकता. आर्थिक यश मिळण्याची शक्यता अधिक आहे. पर्यटनस्थळी  भेट देण्याची योजना करू शकता.
  5. सिंह-  संपूर्ण दिवस मजेत जाईल. व्यक्तिमत्व विकासासाठी प्रयत्न कराल. नातेवाईकांसोबत संबंध सुधारतील. तुमच्या मालमत्तेविषयी कोणतीही माहिती गोपनीय दुसऱ्यांना सांगू नका.  नोकरीबाबत निष्काळजीपणा करू नका.
  6. कन्या- तुम्हाला तुमची विचारसरणी आणि वागणं संतुलित ठेवणे आवश्यक आहे. दागिने आणि कपडे खरेदीची शक्यता आहे. व्यवसायात नवीन प्रयोग करून पुढे जाण्याची संधी मिळेल. नवीन आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे.
  7. तुला-  कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल. लोह आणि धातूचा व्यवसाय करणार्‍यांसाठी फलदायी दिवस आहे. उधार-उसने देणे टाळा. आपण आपल्या दैनंदिन कामात काही बदल करू शकता.
  8. वृश्चिक-  जुन्या मित्र-मैत्रिणींची भेट होईल.आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साही असेल. कौटुंबिक कलह होणार नाही याची काळजी घ्या. आपलं उत्पन्न वाढू शकते. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो.
  9. धनु- अंथरून पाहून पाय पसरा. कार्यालयीन कामामुळे मनस्ताप होऊ शकतो. कामाशी संबंधित चांगल्या आणि व्यावहारिक कल्पना आपल्या मनात येतील.
  10. मकर- वडीलधाऱ्यांकडून आदर आणि सहकार्य मिळेल. इतरांच्या पुढे जाण्याची इच्छा आज तीव्र होऊ शकते. आर्थिक परिस्थितीत काही मोठे बदल होण्याची शक्यता आहे. व्यवसायात अनुभव महत्वाचा असतो, पुन्हा होणाऱ्या चुका टाळा. आपल्या जोडीदाराबरोबर तुमचा काळ चांगला जाईल.
  11. कुंभ- तुमच्यात आत्मविश्वास वाढेल. वडिलोपार्जित मालमत्तेचे प्रकरण निकाली लागेल. उत्साहाने व्यवसायासंबंधी योजना पूर्ण कराल. कोणत्याही नवीन बदलासाठी स्वत:ला तयार करा.
  12. मीन- आजचा दिवस धकाधकीचा असेल. घरातून निघताना गोड खाऊन निघाल्यास सगळी काम होतील. घाऊक विक्रेत्यांसाठी दिवस चांगला आहे. प्रॉपर्टी किंवा पैशांच्या व्यवहाराबाबत काळजी घ्या.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
आदित्य ठाकरे यांच्याकडून त्र्यंबकेश्वरमधील पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... एकीकडे कोर्टात सुनावणी सुरू दुसरीकडे शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान
विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं 61% कामकाज ठप्प
विनोद तावडे: विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं 61% कामकाज ठप्प
कंगना राणावत यांची टीका: गृह मंत्रालयाबाबत दुहेरी भूमिका
राहुल गांधींच्या भूमिकेवर कंगना राणावत यांची टीका: गृह मंत्रालयाबाबत दुहेरी भूमिका
रायगडचा पालकमंत्री मीच, लवकरच निर्णय
भरत गोगावले यांची घोषणा: रायगडचा पालकमंत्री मीच, लवकरच निर्णय