Daily horoscope 20 June 2022: ‘या’ राशीच्या लोकांना फायदेशीर प्रवास होऊ शकतो; असा जाईल तुमचा आजचा दिवस

मेष  नोकरदार लोकांना कोणतंही विशेष काम यश मिळवून देऊ शकतं. परदेशी संपर्क असलेल्या लोकांना अचानक लाभ होईल आणि प्रवासही होऊ शकतो. वृषभ-  कौटुंबिक जीवनात अस्थिरता येण्याची शक्यता आहे. पालकांशी काही वैचारिक मतभेद होऊ शकतात. प्रेमसंबंधांसाठी काळ शुभ आहे. मिथुन- आर्थिक आणि व्यावसायिक दृष्ट्या फायदेशीर प्रवास होऊ शकतो. कौटुंबिक वातावरणातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे कुटुंबातील सदस्य तुमच्या यशाचा […]

Daily horoscope 20 June 2022: 'या' राशीच्या लोकांना फायदेशीर प्रवास होऊ शकतो; असा जाईल तुमचा आजचा दिवस
नितीश गाडगे

|

Jun 20, 2022 | 5:30 AM

 1. मेष  नोकरदार लोकांना कोणतंही विशेष काम यश मिळवून देऊ शकतं. परदेशी संपर्क असलेल्या लोकांना अचानक लाभ होईल आणि प्रवासही होऊ शकतो.
 2. वृषभ-  कौटुंबिक जीवनात अस्थिरता येण्याची शक्यता आहे. पालकांशी काही वैचारिक मतभेद होऊ शकतात. प्रेमसंबंधांसाठी काळ शुभ आहे.
 3. मिथुन- आर्थिक आणि व्यावसायिक दृष्ट्या फायदेशीर प्रवास होऊ शकतो. कौटुंबिक वातावरणातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे कुटुंबातील सदस्य तुमच्या यशाचा पूर्ण आनंद घेऊ शकणार नाहीत.
 4. कर्क-  तुमची चांगली कामगिरी इतरांना प्रभावित करेल. तुमच्या नेहमीच्या कामाव्यतिरिक्त काही करण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला त्यात यश मिळेल. व्यावसायिकांसाठी दिवस निराशाजनक असू शकतो.
 5. सिंह- ज्येष्ठ नागरिकांनी लांबचा प्रवास टाळावा. कुटुंबातील सदस्यांमधील अस्वस्थता तुमच्यासाठी चिंतेचा विषय ठरण्याची शक्यता आहे.
 6. कन्या-  कोणत्याही नवीन उपक्रमासाठी उत्तम काळ आहे. तुम्ही बहुतांश उपक्रम यशस्वीपणे हाताळण्यास सक्षम असणार आहात.
 7. तूळ- तुमच्या संपर्कांमुळे व्यवसाय आणि व्यावसायिक संदर्भात महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता. तुमच्या प्रयत्नांमध्ये तुम्हाला चांगलं यश मिळेल.
 8. वृश्चिक- तुम्हाला वेगवेगळ्या स्तरावर अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुम्ही गोंधळलेल्या स्थितीत असाल आणि ही परिस्थिती तुम्हाला वेळेवर काम पूर्ण करण्यापासून रोखू शकते.
 9. धनू- तुम्ही कुटुंबातील सदस्यांना तुमचं मन सांगू शकाल. यावेळी तुमच्या युक्तीने तुम्हाला कुटुंबियांकडून मदत मिळू शकेल.
 10. मकर- आजच्या दिवशी तुम्ही थोडे चिंतेत राहण्याची शक्यता आहे. तुम्ही अनावश्यक गुंतागुंतीमध्ये अडकू शकता. आर्थिक समस्या सोडवण्यासही थोडा वेळ लागू शकतो.
 11. कुंभ- या काळात तुम्ही आर्थिकदृष्ट्या संपन्न असाल. व्यवसायाचा विस्तारही होऊ शकतो. तुमच्या मेहनतीचं फळ मिळणार आहे.
 12. मीन- तुम्ही व्यावसायिकदृष्ट्या खूप यशस्वी व्हाल. तुम्हाला आरोग्य चांगलं राहणार आहे. शिवाय तुमचा आत्मविश्वासही खूप वाढेल.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें