AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gajlakshmi Rajyog : उद्या जुळून येतोय गजलक्ष्मी राजयोग, या राशीच्या लोकांना होणार आर्थिक लाभ

ज्या राशीत गजलक्ष्मी योग (Gajlakshmi Rajyog) तयार होतो, त्या राशीत शनीची साडेसाती संपते. गजलक्ष्मी योगाच्या प्रभावाने धन आणि सुखात वृद्धी होते आणि निराशेचा नकारात्मक प्रभाव दूर होतो.

Gajlakshmi Rajyog : उद्या जुळून येतोय गजलक्ष्मी राजयोग, या राशीच्या लोकांना होणार आर्थिक लाभ
गजलक्ष्मी राजयोगImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Aug 06, 2023 | 2:33 PM
Share

मुंबई : जेव्हा राहु मेष राशीत असतो आणि गुरु त्याच वेळी मेष राशीत प्रवेश करतो तेव्हा गजलक्ष्मी योग तयार होतो. या योगाच्या प्रभावामुळे घरात सुख, शांती, समृद्धी, वैभव यांची भरभराट होते. ज्या राशीत गजलक्ष्मी योग (Gajlakshmi Rajyog) तयार होतो, त्या राशीत शनीची साडेसाती संपते. गजलक्ष्मी योगाच्या प्रभावाने धन आणि सुखात वृद्धी होते आणि निराशेचा नकारात्मक प्रभाव दूर होतो. 7 ऑगस्ट रोजी शुक्र कर्क राशीत प्रवेश करेल. शुक्राच्या या प्रवासातून गजलक्ष्मी राजयोग तयार होणार आहे. यामुळे 4 राशीच्या लोकांना धन, यश आणि कीर्ती सोबतच देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल. कर्क राशीत शुक्र शुभ स्थितीत असेल. या काळात मेष राशीत बसलेल्या गुरूची दृष्टी कर्क राशीवर राहील.

या राशीच्या लोकांना होणार लाभ

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी गजलक्ष्मी राजयोग शुभ सिद्ध होईल. तुमच्या संपत्तीच्या घरात शुक्र प्रतिगामी आहे. अशा परिस्थितीत आर्थिक स्थितीत बरीच सुधारणा होईल. या काळात बचत करण्यात यश मिळेल. तुमची संभाषण शैली सुधारेल. प्रसारमाध्यमांशी निगडित लोकांचा वेळ चांगला जाईल.

कर्क

कर्क राशीच्या लोकांसाठी गजलक्ष्मी राजयोग अत्यंत फलदायी ठरेल. या काळात आर्थिक स्थिती चांगली राहील. व्यापाऱ्यांचा नफा वाढू शकतो. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. तसेच, तुम्ही धार्मिक प्रवासाला जाण्याचा विचार करू शकता.

कन्या

शुक्राचे संक्रमण कन्या राशीच्या राशीच्या लोकांना खूप लाभदायक ठरेल. तुमच्या उत्पन्नाच्या घरात शुक्र प्रतिगामी आहे. या काळात गुंतवणुकीचा फायदा होईल. तुमच्या योजना यशस्वी होतील. दीर्घकाळ प्रलंबित पैसे मिळतील. तुमची मुले त्यांच्या यशाशी संबंधित काही चांगली बातमी देऊ शकतात.

तूळ

तूळ राशीच्या लोकांसाठी गजलक्ष्मी राजयोग शुभ ठरू शकतो. शुक्र तुमच्या राशीत प्रतिगामी आहे. तुमच्या व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. सहकाऱ्यांशी संबंध पूर्वीपेक्षा मधुर होतील. नोकरीत बढतीची शक्यता आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?