Daily Horoscope 28 May 2022: आरोग्य चांगले राहील, नोकरीत प्रमोशन होण्याची शक्यता

Daily Horoscope 28 May 2022: आरोग्य चांगले राहील, नोकरीत प्रमोशन होण्याची शक्यता

आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल ? आजचे तारे काय सांगतात. दैनिक राशी भविष्याद्वारे आजचे राशी भविष्य आणि दिवसातील घडामोडीची माहिती जाणून घ्या.

सिद्धी बोबडे

| Edited By: सिद्धेश सावंत

May 28, 2022 | 5:10 AM

मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीची रास त्याच्या जन्मतारीख आणि जन्मवेळेवर आधारित असते. ज्योतिषशास्त्रात (Astrology) 27 नक्षत्र, 9 ग्रह आणि 12 राशींचे वर्णन केले आहे. याआधारावर व्यक्तीची रास (Zodiac) ठरवली जाते. आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? आजचे तारे काय म्हणतात? दैनिक राशिभविष्याद्वारे आजचे राशीभविष्य आणि संपूर्ण दिवसातील घडामोडींची माहिती जाणून घेवूया.

तुळ (Libra) –

तुम्ही तुमच्या चातुर्याने आणि मृदू बोलण्याने वाईट संबंध सुधारण्यास सक्षम असाल. नशिबापेक्षा कर्मावर विश्वास ठेवण्यासारखी तुमची सकारात्मक विचारसरणी तुमच्यासाठी चांगली परिस्थिती निर्माण करेल. घरामध्ये कोणताही धार्मिक कार्यक्रम होऊ शकतो.कधीकधी तुमचा लहरी स्वभाव इतरांना त्रासदायक ठरू शकतो. त्यांने लोकांना त्रास होऊ शकतो. घरातील लहानसहान गोष्टीवरूनही कुटुंबातील सदस्यांसोबत गैरसमज होऊ शकतात. ज्याला काही बाहेरच्या व्यक्तीचा हस्तक्षेप असेल.यावेळी तुमची एखादी गोष्ट उघड होऊ शकते जी तुम्हाला सिक्रेट ठेवायची होती. व्यवसायाची कामे आता प्रलंबित राहतील. नोकरी शोधणाऱ्यांना त्यांच्या कामाशी संबंधित कार्यालयाजवळूनही प्रवास करावा लागू शकतो.

लव फोकस- पती-पत्नीमध्ये अहंकाराचा संघर्ष होईल. परंतु कालांतराने तुम्ही नकारात्मक परिस्थितीवर मात करू शकाल.

खबरदारी- आरोग्य चांगले राहील. रक्तदाब आणि मधुमेहासाठी स्वत:ची तपासणी करून घ्या.

शुभ रंग – हिरवा

भाग्यवान अक्षर –

अनुकूल क्रमांक –5

वृश्चिक (Scorpio) –

काही काळापासून चालत आलेले अडथळे आज तुम्ही दूर करू शकाल. ज्यामुळे तुम्हाला आत्म-समाधानाची भावना देखील असेल.तसंच मनशांती लाभेल.  राजकीय-सामाजिक कार्यात विशेष योगदान मिळेल, विशेष स्थानही प्राप्त होईल.पण लक्षात ठेवा की स्वतःचा जवळचा मित्र फसवणूक किंवा लबाडी करू शकतो. तरुणांचे त्यांच्या करिअरकडे होणारे दुर्लक्ष भविष्यासाठी घातक ठरेल. त्यामुळे काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.कार्यक्षेत्रात एखाद्या खास व्यक्तीशी झालेली भेट प्रगती आणि विजयासाठी उपयुक्त ठरेल. नोकरीत तुमचे लक्ष्य साध्य करण्यात यश मिळेल. एखाद्याशी भागीदारी करताना, साधक आणि बाधकांचा विचार करा.

लव फोकस- पती-पत्नीमधील जवळीक वाढेल. लग्न, एंगेजमेंट यासारख्या कामातही व्यस्तता राहील.

खबरदारी- वाहन किंवा मशिनरी संबंधित उपकरणे जपून वापरा. कारण काही प्रकारची दुखापत किंवा अपघात होण्याची शक्यता असते.

शुभ रंग – बदामी

भाग्यवान अक्षर –

अनुकूल क्रमांक – 4

धनु (Sagittarius)-

वेळ हा सन्मान आणि प्रतिष्ठेचा विषय आहे. धर्म-कर्म आणि अध्यात्मिक कार्यात रुची राहील. व्यवसाय, घर आणि संसार यात तुम्ही उत्तम संतुलन राखाल. उधार दिलेले काही पैसे परत मिळू शकतात.एखाद्या जवळच्या मित्राच्या नकारात्मक कामाने तुम्हाला धक्का बसेल बसेल. कार किंवा घराशी संबंधित कागदपत्रे सोबत ठेवा. कधीकधी एखाद्या विशिष्ट विषयाबद्दल सखोल जाणून घेण्याची इच्छा तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर जाऊ शकते.मी कोणत्याही प्रकारच्या व्यावसायिक स्पर्धेत हरू शकतो. असं तुम्हाला सारखं वाटतं राहील.  पण हा ताण तुमच्यावर ओढवू देऊ नका. हारण्याची भीती मनातून काढून टाका. कमं शांत आणि सावकाशपणे करा. यश नक्कीच मिळेल. नोकरीत प्रमोशन किंवा बदली होण्याची शक्यता आहे.

लव् फोकस- पती-पत्नीच्या नात्यात गोडवा येईल. विरुद्ध लिंगाच्या मित्राला अचानक भेटल्याने जुन्या आनंदी आठवणी जातील.

खबरदारी- युरिन इन्फेक्शन सारख्या समस्या उद्भवू शकतात. भरपूर पाणी प्या.

शुभ रंग – नारिंगी

भाग्यवान अक्षर –

अनुकूल क्रमांक – 1

हे सुद्धा वाचा

(टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा.)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें