खूप सोसलं आता शनी दाखवणार अच्छे दिन; या 3 राशींच्या लोकांना नवीन वर्षात लागणार जॅकपॉट!
शनीला न्याय देवता असं देखील म्हटलं जातं, शनी देव कर्मफळ दाता आहेत. शनी ठरावीक काळानंतर आपली राशी आणि नक्षत्र बदलतात.
शनीला न्याय देवता असं देखील म्हटलं जातं, शनी देव कर्मफळ दाता आहेत. शनी ठरावीक काळानंतर आपली राशी आणि नक्षत्र बदलतात. सध्या शनी देव आपली स्वत:ची राशी कुंभ राशीमध्ये विराजमान आहेत. नक्षत्राबाबत बोलायचं झाल्यास सध्या शनी शतभिषा नक्षत्रात भ्रमण करत आहेत. ज्योतीष शास्त्रानुसार शनीच्या नक्षत्र परिवर्तनाचा देखील बारा राशींवर चांगला -वाईट परिणाम होत असतो. सध्या शनी देव हे राहुचं नक्षत्र असलेल्या शतभिषा नक्षत्रात विराजमान आहेत. मात्र येणाऱ्या 27 डिसेंबरला शनी देव नक्षत्र परिवर्तन करणार आहेत. ते पूर्वभाद्रपदा नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. शनी देव गुरुच्या नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. शनीच्या या नक्षत्र बदलाचा काही राशींच्या लोकांना विशेष फायदा होणार आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच त्यांना आनंदाची बातमी मिळू शकते. जाणून घेऊयात त्या नेमक्या कोणत्या राशी आहेत त्याबद्दल
मेष राशी – शनीने पूर्वभाद्रपदा नक्षत्रात प्रवेश केल्यानंतर शनी देव या राशीच्या आकराव्या स्थानी येणार आहेत. त्यामुळे नवीन वर्षांत या राशींच्या व्यक्तींना धन प्राप्तीचा योग आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अडलेलं एखादं मोठा काम मार्गी लागण्याची देखील शक्यता या काळात आहेत. घर, एखादी संपत्ती किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर ही इच्छा देखील तुमची या काळात पूर्ण होऊ शकते. जुन्या मित्रांसोबत तुमची भेट होऊ शकते.
वृषभ राशी – या राशीच्या दहाव्या स्थानी शनी देव विराजमान होणार आहेत. इथे शनी हे भाग्याचे स्वामी असतात. त्यामुळे नवं वर्ष हे तुम्हाला खूप लकी ठरण्याची शक्यता आहे. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळणार आहे. दहाव्या स्थानी शनी आणि लग्न भावात गुरु विराजमान असल्यामुळे या राशीच्या लोकांच्या भौतिक सुखात मोठी वाढ होणार आहे. पुढील काही महिन्यात तुमच्या जीवनात अनेक बदल पाहायला मिळू शकतात. पत्नी-पत्नीमध्ये काही वाद असेल तर सर्व वाद दूर होऊन तुम्हाला या काळात आनंदाची बातमी मिळू शकते.
कन्या राशी – शनी देवाने पूर्वभाद्रपदा नक्षात प्रवेश केल्यानंतर या राशीच्या सहाव्या भावात शनीचं आगमण होणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना नवीन वर्षाची सुरुवात ही खूप चांगली जाणार आहे. तुम्हाला विविध क्षेत्रामध्ये लाभ होण्याची शक्यता आहे. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना एखादी चांगली संधी या काळात मिळू शकते.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)