AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आजचे राशीभविष्य 12 May 2025 : विदेशात नोकरी, पार्टनरसोबत डेटींग…; तुमच्या राशीसाठी आजचा दिवस कसा असेल?

Horoscope Today 12 May 2025 in Marathi : ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते. तुमचा आजचा दिवस कसा जाईल ? काय घडणार आजच्या दिवसात ? हे जाणून घेण्यासाठी अवश्य वाचा आजचे राशीभविष्य

आजचे राशीभविष्य 12 May 2025 : विदेशात नोकरी, पार्टनरसोबत डेटींग...; तुमच्या राशीसाठी आजचा दिवस कसा असेल?
Follow us
| Updated on: May 12, 2025 | 7:30 AM

ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 12 May 2025) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनू, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

मेष राशी (Aries Daily Horoscope)

मेष राशीच्या व्यक्तींनी नात्यांमधील संवाद वाढवा. गैरसमज टाळा. करिअरमध्ये अधिक लक्ष द्या. आपल्या कामांची प्राथमिकता ठरवा. आर्थिक नियोजन विचारपूर्वक करा. अनावश्यक खर्च टाळा. आरोग्याला महत्त्व द्या. नियमित व्यायाम करा.

वृषभ राशी (Taurus Daily Horoscope)

वृषभ राशीच्या व्यक्तींच्या जीवनात अनेक क्षेत्रांमध्ये बदल जाणवण्याची शक्यता आहे. काही लोक घरात कुटुंबासोबत चांगला वेळ घालवतील. करिअर, प्रेमसंबंध, आर्थिक स्थिती आणि आरोग्य यांसारख्या क्षेत्रांतील बदलांना सकारात्मक दृष्टीकोनातून स्वीकारा. हे बदल तुमच्यासाठी चांगल्या संधी घेऊन येऊ शकतात.

मिथुन राशी (Gemini Daily Horoscope)

मिथुन राशीच्या व्यक्तींनी आज जीवनात समतोल राखावा. नातेसंबंध, करिअर, आर्थिक बाबी, आरोग्य यांसह सर्वच क्षेत्रात संतुलन महत्त्वाचे आहे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. आपल्या क्षमतांचा योग्य वापर करून आव्हानांना आणि संधींना सामोरे जा.

कर्क राशी (Cancer Daily Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडा व्यस्त असू शकतो. अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या तुमच्यावर येऊ शकतात. ज्यामुळे थोडा तणाव जाणवू शकतो. आज तुमचा दिवस प्रेमळ आणि आनंदाच्या क्षणांनी भरलेला असू शकतो.

सिंह राशी (Leo Daily Horoscope)      

सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस अनेक बदल घेऊन येऊ शकतो. राजकारणासारख्या विषयांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. तसेच, जंक फूडसारखे तेलकट आणि मसालेदार पदार्थ टाळा. कामाच्या निमित्ताने काही लोकांना विदेशात प्रवास करण्याची संधी मिळते. तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत डेटवर जाऊ शकतात.

कन्या राशी (Virgo Daily Horoscope)

कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस काहीसे चढ-उतार दाखवणारा असू शकतो. जे लोक व्यवसाय करतात, त्यांना आज आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कामाच्या ठिकाणी काही क्लाईंट्स तुमच्यावर नाराज होऊ शकतात. पण दिवसाअखेरीस परिस्थितीत सुधारणा होईल. त्यामुळे धीर धरा.

तूळ राशी (Libra Daily Horoscope)

तूळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस सकारात्मक ऊर्जा घेऊन येईल. आज बाहेरचे अन्न खाणे टाळा. राजकारणात जास्त लक्ष घालू नका. तुमच्या कुटुंबाशी संबंधित, करिअर, आर्थिक व्यवहारात बदल होतील. आरोग्याची काळजी घ्या. सकारात्मक विचार करा.

वृश्चिक राशी (Scorpio Daily Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस साधारण असेल. पैशांच्या व्यवहारात तुम्हाला सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. आरोग्यासंबंधी काही लहान-मोठ्या तक्रारी जाणवल्या तर त्याबद्दल जास्त काळजी करू नका. तुमच्या जीवनात आनंद आणि उत्साह टिकून राहील.

धनु राशी (Sagittarius Daily Horoscope)

धनु राशीच्या व्यक्तींना आज ऑफिसमध्ये काही विशेष काम सोपवले जाऊ शकते, जे तुमच्या प्रमोशनसाठी महत्त्वाचे ठरेल. अविवाहित लोकांना गुडन्यूज मिळेल. आज कोणीतरी खास व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे. करिअरच्या दृष्टीने आजची परिस्थिती चांगली राहील.

मकर राशी (Capricorn Daily Horoscope)

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस त्यांच्या क्रिएटीव्हीला वाव देणारा असेल. आर्थिक बाबतीत तुम्हाला नशिबाची साथ मिळू शकते. विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. तणाव कमी करण्यासाठी योगाचा आणि ध्यानधारणेचा अवलंब करावा.

कुंभ राशी (Aquarius Daily Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला असणार आहे. करिअरच्या क्षेत्रात तुम्हाला नवीन संधी मिळू शकतात. आज पदोन्नती होण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ असेल. मात्र, आपल्या आरोग्यावर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे.

मीन राशी (Pisces Daily Horoscope)

मीन राशीच्या लोकांना आजचा दिवस चांगला असणार. आपल्या करिअरमधील ध्येय साध्य करण्यासाठी योग्य योजना तयार करा. बचत करण्यावर लक्ष केंद्रित केल्यास तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. आपल्या पार्टनरसोबत वेळ घालवा. डेटवर जाण्याचा विचार करा. आपल्या शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करा.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

पवारांची राष्ट्रवादी हा एक मोठा पक्ष सोडून कुणाशीही युती करण्यास तयार?
पवारांची राष्ट्रवादी हा एक मोठा पक्ष सोडून कुणाशीही युती करण्यास तयार?.
बावनकुळेंनी घेतली बच्चू कडूंची भेट तर फोनवरून फडणवीसांचं मोठं आश्वासन
बावनकुळेंनी घेतली बच्चू कडूंची भेट तर फोनवरून फडणवीसांचं मोठं आश्वासन.
अपघातात वडिलांचा मृत्यू, ओळख पटवण्यासाठी 8 महिन्याच्या बाळाचे DNA
अपघातात वडिलांचा मृत्यू, ओळख पटवण्यासाठी 8 महिन्याच्या बाळाचे DNA.
अपघाताचं कारण समजणार, DVR अन् ब्लॅकबॉक्सही सापडलं, कशी मिळते माहिती?
अपघाताचं कारण समजणार, DVR अन् ब्लॅकबॉक्सही सापडलं, कशी मिळते माहिती?.
विमान दुर्घटनेनंतर DGCA चा मोठा निर्णय, आता बोईंग विमानाची...
विमान दुर्घटनेनंतर DGCA चा मोठा निर्णय, आता बोईंग विमानाची....
...असं केलं विमान दुर्घटनेनंतर एकमेव जिवंत असलेल्या प्रवाशाचं रेस्क्यू
...असं केलं विमान दुर्घटनेनंतर एकमेव जिवंत असलेल्या प्रवाशाचं रेस्क्यू.
दुपारी झोपेत असताना मोठा आवाज पाहिलं तर...अकोल्याची तरूणी कशी बचावली?
दुपारी झोपेत असताना मोठा आवाज पाहिलं तर...अकोल्याची तरूणी कशी बचावली?.
अपघात टाळता येत नाही. मग यांना काय टाळता येतं?, राऊतांचा खोचक सवाल
अपघात टाळता येत नाही. मग यांना काय टाळता येतं?, राऊतांचा खोचक सवाल.
विमान दुर्घटनेत गोरेगावमधील अपर्णा महाडिक यांचा मृत्यू
विमान दुर्घटनेत गोरेगावमधील अपर्णा महाडिक यांचा मृत्यू.
कोकण किनारपट्टीसाठी रेड अलर्ट; सतर्क राहण्याचं आवाहन
कोकण किनारपट्टीसाठी रेड अलर्ट; सतर्क राहण्याचं आवाहन.