AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Horoscope Today 13 September 2023 : आजचे राशी भविष्य, गुंतवणूक करताना या राशीच्या लोकांनी घ्यावी काळजी

Horoscope Today 13 September 2023 : आजचे राशी भविष्य, जाणून घ्या कसा जाणार तुमचा आजचा दिवस. या राशीच्या लोकांनी गुंतवणूक करताना काळजी घेणं गरजेचं आहे.

Horoscope Today 13 September 2023 :  आजचे राशी भविष्य, गुंतवणूक करताना या राशीच्या लोकांनी घ्यावी काळजी
आजचे राशी भविष्य
| Updated on: Sep 12, 2023 | 11:59 PM
Share

मुंबई : ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 13 September 2023) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

बारा राशींचे आजचे राशी भविष्य

मेष : आजचा दिवस कुटुंब आणि मित्रांसोबत शांततेत दिवस घालवाल असं ग्रहमान आहे. मित्रांसोबत काही जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. खूप दिवसांनी एकत्र आल्याने मन शांत होईल. पत्नीसोबत वेळ घालवल्याने काही समस्या सोडवण्यात मदत होईल. उद्योग धंद्यात भरभराट होईल. भागीदारीच्या धंद्यात नवा पार्टनर मिळेल. त्यामुळे आर्थिक अडचण सुटेल.

वृषभ :आजचा दिवस आरोग्यदायी असेल. त्यामुळे एकदम आनंदी असाल आणि आत्मविश्वास दुणावलेला राहील. आरोग्य विषयक तक्रारींचं निवारण झाल्याने जीव भांड्यात पडेल. या कालावधीत खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील. अविवाहित लोकांना काही स्थळं पाहण्याचा योग जुळून येईल.

मिथुन : आजचा दिवस तुम्हाला संमिश्र परिणाम देणारा आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील. तसेच गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळणार असल्याने आनंदी राहाल. यशाची नवी शिखरं या काळात गाठाल. कौटुंबिक पातळीवर आनंदी राहाल. नवीन योजना मार्गी लावण्यास मित्रांची मदत होईल.

कर्क : आजचा दिवस आनंदात जाईल. कुटुंबासोबत जवळच्या ठिकाणी फिरण्याचा योग जुळून येईल. भौतिक सुखांसाठी पैसे खर्च कराल. गेल्या काही दिवसांपासून असलेली इच्छा पूर्ण होईल. पण महत्त्वाच्या नसलेल्या गोष्टींवर जास्त खर्च करणे टाळा. भविष्याच्या दृष्टीकोनातून पैशांची बचत करा.

सिंह : आजचा दिवस कठोर परिश्रम केल्याशिवाय पर्याय नाही हे लक्षात ठेवा. दिवसभर केलेल्या मेहनतीनुसार फळ न मिळाल्याने तुम्ही अस्वस्थ व्हाल. तुम्ही तुमचा पैसा योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता. व्यवसायात कोणताही करार करण्यापूर्वी दहावेळा विचार करा. आर्थिक फटका बसू शकतो.

कन्या : आज मुलाच्या करिअरमध्ये किंवा भविष्याच्या दृष्टीकोनातून व्यस्त असाल. करिअरचा पर्याय निवडण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्या. तुमच्या मुलाच्या निकालाबद्दल तुम्हाला चांगली बातमी कानावर येईल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल. तुम्ही तुमच्या कौटुंबिक व्यवसायातही गुंतवणूक करू शकता.

तूळ : आजचा दिवस तुमच्यासाठी चिंताजनक असेल असं ग्रहमान आहे. आरोग्य विषयक तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. नवीन घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. विनाकारण वाद करणं टाळा. गेल्या काही दिवसांपासून अडकलेलं काम आज पूर्ण होऊ शकते. प्रतिकूल परिस्थितीत तुम्हाला संयम राखावा लागेल.

वृश्चिक : आज आर्थिक स्तरावर कोणलाही कुठलाही शब्द देऊ नका. तुमचं नुकसान होऊ शकतं. गुप्तशत्रूंकडून एखादा सापळा रचलेला असू शकतो. जोखिम असलेली गुंतवणूक करणे किंवा इतरांना पैसे देणे टाळा. तणाव कमी करण्यासाठी ध्यान आणि योग करा. विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अधिक मेहनत घ्यावी.

धनु : आजचा दिवस तुमच्यासाठी इतर दिवसांपेक्षा चांगला जाईल. समाजात तुमच्या शब्दाला मान असल्याचं दिसून येईल. कुटुंबाच्या हितासाठी ठोस पाऊल उचलू शकता. एखाद्याचं बोलणं मनाला लागू शकते. पण त्याचा जास्त विचार करण्यात अर्थ नाही. तुमच्या मित्रांसोबत पार्टी करण्याचा विचार करू शकता. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करावे लागेल.

मकर : नोकरी शोधणाऱ्या जातकांना आज नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते किंवा सध्याच्या नोकरीत पदोन्नती मिळू शकते. व्यवसाय वाढवण्यासाठी ही उत्तम वेळ आहे. तज्ज्ञ व्यक्तींच्या भेटीगाठी घेऊन पुढच्या योजना आखा. अविवाहित लोकांना चांगला जोडीदार मिळू शकतो. घरगुती जीवनात जोडीदारापासून कोणतंही गोष्ट लपवू नका. अन्यथा भविष्यात त्रास होऊ शकतो.

कुंभ : आजचा दिवस तुमच्यासाठी अडचणींचा ठरणार आहे. कौटुंबिक आणि व्यवसायात घडलेल्या घटनांमुळे त्रास होईल. जवळच्या व्यक्तींकडून तुमची फसवणूक होऊ शकते. आर्थिक गणित बिघडू शकते. कायदेशीर प्रकरणात अडकू शकता. त्यामुळे कोणतंही पाऊल उचलण्यापूर्वी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. वाहने चालवताना काळजी घ्यावी लागेल.

मीन : गेल्या काही दिवसांपासून करत असलेल्या मेहनतीला अपेक्षित यश मिळेल.तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीबद्दल चांगली बातमी मिळू शकेल. तुम्हाला तुमची कौशल्ये सुधारण्यास मदत मिळेल. नोकरी शोधणाऱ्यांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थी त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.