
ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 12 April 2025) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनू, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
मेष राशीच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती मजबूत राहील. सकस आहार घेतल्याने आरोग्य चांगले राहील. ऑफिसमध्ये शांत राहा. यामुळे विरोधकांच्या डावपेचावर सहज मात कराल. तुम्हाला तुमच्या सर्व कल्पना मांडण्याची संधी मिळेल. ऑफिसमधील काम वेळेवर पूर्ण करा.
वृषभ राशीच्या ज्या व्यक्ती मालमत्तेच्या शोधात आहेत, त्यांना लवकरच स्वस्त दरात मालमत्ता खरेदी करण्याची संधी मिळेल. कामाच्या बाबतीत तुमच्या आयडियामुळे लाभ मिळेल. कामामध्ये तुमचे मित्र तुम्हाला मदत करतील.
मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आज ऑफिसमधील कठीण परिस्थिती राहील. त्यामुळे एखाद्या वरिष्ठ व्यक्तीला हस्तक्षेप करु देणे योग्य ठरेल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. कौटुंबिक नातेसंबंध अधिक घट्ट होण्याची शक्यता आहे. परदेशात जाण्याची संधी मिळू शकते.
कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आज पैशाच्या बाबतीत हात आखडता घ्याल. तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही बचत करण्यास सुरुवात कराल. आरोग्य चांगले राहिल. सुट्ट्यांचा कालावधी आनंदात घालवाल. वरिष्ठ अधिकारी तुम्हाला पाठिंबा देतील.
सिंह राशीच्या व्यक्ती नवीन घर खरेदी करु शकतात. बाहेरचे खाणं टाळा. त्यामुळे तुमच्या आरोग्यासाठी नुकसान पोहोचू शकते. त्यामुळे ते टाळा. वैयक्तिक पातळीवर कोणीतरी तुमच्याकडून सल्ला मागू शकते. कामाच्या बाबतीत गोष्टी पुढे सरकू शकतात. ऑफिसमधील जवळची व्यक्ती तुम्हाला एखादे काम पूर्ण करण्यास मदत करेल.
ऑफिसमध्ये तुमच्या सहकाऱ्यांशी थोडा वाद होऊ शकतो, पण तुम्ही त्यावर मात कराल. काही लोक आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घेतील. आर्थिकदृष्ट्या दिवस सामान्य राहील. व्यावसायिक यश मिळेल.
एखाद्या कामातून चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील व्यक्तीला मदत केल्यावर तुम्हाला बरे वाटेल. काही लोक परदेशात जाऊ शकतात. बाहेरचे तळलेले पदार्थ खाणे टाळा. जुन्या मालमत्तेमुळे चांगला फायदा देऊ शकते.
ज्यांचे लग्न ठरत नाही, त्यांचे लग्न जमेल. तुम्हाला परदेश दौऱ्याचे योग येतील. घरातले लोक तुम्हाला एखाद्या कार्यक्रमाला घेऊन जाण्याचा हट्ट करू शकतात. अचानक धनलाभ होईल.
आज प्रवास करताना तुमचा एखादा जुना मित्र भेटू शकतो. गरजू लोकांना मदत करा. गुंतवणुकीची चांगली संधी मिळू शकते, पण गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या.
मकर राशीच्या व्यक्ती त्यांच्या हुशारी आणि योजनांमुळे कामात इतरांपेक्षा पुढे राहतील. चांगल्या लोकांचा सल्ला घेतल्यास तुम्हाला तुमचे ध्येय गाठता येईल. कुटुंबात चांगली बातमी मिळाल्याने आनंद येईल.
कुंभ राशीच्या व्यक्तींच्या पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला स्वस्त दरात नवीन घर खरेदी करण्याची संधी मिळू शकते. काही लोक परदेशात जाऊ शकतात. जर कोणी तुमच्याकडे मदतीसाठी आले, तर त्याला निश्चित मदत करा.
मीन राशीच्या व्यक्तींनी कामात जे कष्ट घेतले आहेत, त्याचे त्यांना चांगले फळ मिळेल. गरीब लोकांना मदत केल्याने तुम्हाला आनंद वाटेल. तुमच्या आसपासचे लोक तुमच्या कामाची प्रशंसा करतील.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)