
ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 20 January 2025) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
मेष राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस लाभदायक जाणार आहे. आज तुम्ही एखाद्या चांगल्या योजनेत पैसे गुंतवाल आणि त्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल. तुम्ही पार्टनरशिप एखादा चांगला व्यवसाय सुरु करु शकतात. यातून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. लवकरच फिरायला जाण्याचा योग आहे. कुटुंबात भव्य कार्यक्रम होईल. उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळेल.
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मिश्र स्वरुपाचा असणार आहे. लवकरच चांगली नोकरी मिळू शकते. लवकरच एखाद्या तीर्थयात्रेला जाण्याचा योग आहे. आज तुमचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. कोणताही निर्णय घेताना सावधगिरी बाळगा. कुटुंबातील व्यक्तींसोबत वेळ घालवाल.
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील. एखाद्या सामाजिक कार्यात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. आरोग्याच्या बाबतीत कधीही हलगर्जीपणा करु नका. कार्यक्षेत्रात चांगली प्रगती होईल.
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. आज तुम्ही जे काही काम हाती घ्याल ते पूर्ण होईल. त्यातून तुम्ही तुमची प्रगती करु शकाल. यामुळे तुमची आर्थिक बाजू सुधारेल. कामाच्या निमित्ताने लवकरच तुम्हाला परदेशवारी करण्याचा योग आहे. तसेच एखाद्या सरकारी योजनांचा तुम्हाला लाभ मिळेल.
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फारच सामान्य असेल. आज तुम्ही एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करु शकता. पण त्यासाठी फार मेहनत घ्यावी लागेल. आज मुलांकडून तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल. काम पूर्ण झाल्याने मानसिक शांतता मिळेल. रोज योग, ध्यान करा.
आज कन्या राशीसाठी खूप चढ-उतारांचा दिवस असणार आहे. आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला मानसिक तणावाचा सामना करावा लागेल. आत तुमचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे आर्थिक गणित काळजीपूर्वक मांडा. विद्यार्थ्यांना आज नवीन शिकण्याची संधी मिळेल. तसेच आज तुमचा जोडीदार तुम्हा एखादी भेटवस्तू देऊ शकतो.
आज तुमचा दिवस काहीसा आव्हानात्मक असेल. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या. विनाकारण आपले निर्णय इतरांवर लादू नका. सामाजिक कार्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळेल. आज घरी लांबचे नातेवाईक येतील, यामुळे काही प्रमाणात दगदग होईल.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्याचा असेल. विद्यार्थ्यांना आज शाळेत बक्षीस मिळू शकते. त्यांच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल. आज या राशीतील व्यक्तींनी तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. तुम्हाला पोटाच्या संबंधित आजार जाणवू शकतो. तुम्हाला प्रवासाची संधी मिळेल. तसेच चांगल्या कामाची प्रशंसा होईल.
आज धनू राशीच्या व्यक्तींना ऑफिसच्या कामात यश मिळेल. आर्थिक बाबतीत सुख-समृद्धीचे शुभ योग येतील. तसेच गुंतवणुकीमुळे फायदे होईल. एखाद्या व्यक्तीमुळे तुमच्या आयुष्यात जीवनात सुख-समृद्धी येईल. पण तुम्ही विचारांवर ठाम राहून निर्णय घ्या. तरच तुम्हाला लाभ मिळेल. पदोन्नतीसह महत्त्वाची जबाबदारी येऊ शकते.
आज मकर राशीच्या लोकांना कामात यश मिळेल. पण काही प्रमाणात निराशा होईल. प्रवासामुळे लाभ होईल. थोडासा संयम ठेऊन निर्णय घ्या. आर्थिक चणचण होऊ शकते. कोर्ट कचेरीच्या कामात वेळ आणि पैसा जास्त प्रमाणात खर्च होण्याची शक्यता आहे. तब्येतीची काळजी घ्या, सर्दी-खोकल्यामुळे त्रास होऊ शकतो.
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आव्हानात्मक असेल. आज कोणतीही जोखीम हाती घेऊ नका. तसेच, कोणालाही विनाकारण आव्हान देऊ नका. यामुळे तुमचे नुकसान होईल. कुटुंबियांसोबत तुम्ही चांगला वेळ घालवाल. विरोधकांच्या कारवायांवर लक्ष ठेवा. कामात अडथळे वाढू शकतात.
आज ऑफिसमध्ये प्रगतीचे योग आहेत. आज तुमची कामे पटापट मार्गी लागतील. आर्थिक बाबतीत अनुकूल स्थिती असल्याने धनलाभ होईल. आज आर्थिक धोका होण्याची शक्यता आहे, त्यामुळे व्यवहार करताना काळजी घ्या. आज तुमचे मन प्रसन्न राहील.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)