AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धनंजय मुंडेंच्या केसाला जरी धक्का लागला तर.., मनोज जरांगे पाटलांना थेट मोठी धमकी, नेत्याच्या पोस्टने खळबळ

मोठी बातमी समोर येत आहे, मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना सोशल मीडियावरून धमकी देण्यात आली आहे, या पोस्टमुळे खळबळ उडाली आहे.

धनंजय मुंडेंच्या केसाला जरी धक्का लागला तर.., मनोज जरांगे पाटलांना थेट मोठी धमकी, नेत्याच्या पोस्टने खळबळ
manoj jarange patil Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 28, 2026 | 5:21 PM
Share

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठा लढा उभारला, त्यांनी अनेकदा त्यासाठी उपोषण देखील केलं आहे. अखेर त्यांच्या लढ्याला यश आलं,  सरकारने राज्यात हैदराबाद गॅझेट लागू केलं.  मात्र यामुळे राज्यात मराठा समाजाविरोधात ओबीसी समाज असा नवा वाद निर्माण झाला. राज्यातील सर्व ओबीसी नेते सरकारच्या या भूमिकेविरोधात एकवटल्याचं  पहायला मिळालं. यावरून मनोज जरांगे पाटील यांच्यावर देखील त्यावेळी टीका करण्यात आली. मनोज जरांगे पाटील यांनी देखील ओबीसी नेत्यांवर विशेष: धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता.

त्यानंतर बीड जिल्ह्याच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली. या घटनेचे राज्यभरात पडसाद उमटले, नागरिकांमध्ये संतापाची लाट पहायला मिळाली. या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असलेला वाल्मिक कराड सध्या जेलमध्ये आहे. त्यावरून देखील मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली होती.

तर त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपल्याला मारण्याचा कट रचण्यात आल्याचा दावा देखील केला, या प्रकरणात अमोल खुणे या तरुणाला संशयीत आरोपी म्हणून अटक झाली होती, तो आता सध्या  जामिनावर बाहेर आहे. दरम्यान या प्रकरणात देखील मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले होते.

दरम्यान आता एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे थेट मनोज जरांगे पाटील यांना धमकी देणारी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे.  समोर आलेल्या माहितीनुसार धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आणि परळी बाजार समितीचे माजी सभापती गोविंद फड यांची ही पोस्ट आहे, ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय बनली आहे.  इंग्रजी भाषेमध्ये ही पोस्ट टाकण्यात आली आहे. ‘धनंजय मुंडे यांच्या केसाला पण धक्का लागला तर कार्यक्रम खल्लास.. जरांगे, सुरेश धस भंडारा लावून बोलतोय’ असा या पोस्टमधील मजकूर आहे. दरम्यान नेमकी अशी पोस्ट का केली यासंदर्भात माहिती भेटू शकलेली नाहीये, मात्र या पोस्टमुळे आता वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Follow Us
आंदोलनाने सरकार बदलत नाही! ठाकरेंना गुलाबराव पाटील यांचे प्रत्युत्तर
Gulabrao Patil on Uddhav Thackeray | आंदोलनाने सरकार बदलत नाही! उद्धव ठाकरेंना गुलाबराव पाटील यांचे थेट प्रत्युत्तर
डहाणूमध्ये भरदिवसा ज्वेलर्सवर शस्त्र दरोडा; लाखोंचा सोन्याचा ऐवज लंपास
Dahanu | डहाणूमध्ये भरदिवसा ज्वेलर्सवर शस्त्र दरोडा; लाखोंचा सोन्याचा ऐवज लंपास, घटना CCTV मध्ये कैद
केंद्रातील हालचाली वाढल्या! अमित शहांसह दोन बड्या नेत्यांची तब्बल 3...
केंद्रातील हालचाली वाढल्या! अमित शहांसह दोन बड्या नेत्यांची तब्बल 3 तास बैठक
फार चिंताजनक! देशात लोकशाही संपली; आंदोलनावर अंधारेंची प्रतिक्रिया
Sushma Andhare | फार चिंताजनक! देशात लोकशाही संपली; दिल्ली आंदोलनावर सुषमा अंधारेंची सडेतोड प्रतिक्रिया
सीजेपीच्या आंदोलनातील हादवणारे फुटेज समोर, पहाच...
CJP Protest | सीजेपीच्या आंदोलनातील हादवणारे फुटेज समोर, पहाच...
कल्याणमध्ये दृश्यम स्टाईल हत्याकांड; प्रियकराचा खून करून मृतदेह...
Kalyan Dombivali | कल्याणमध्ये दृश्यम स्टाईल हत्याकांड; प्रियकराचा खून करून मृतदेह गोणीत लपवला, प्रेयसी फरार
CJP च्या आंदोलनाबाबत मोठी अपडेट! ठाकरे गटाचे नेते वांगचुक यांची भेट...
CJP च्या आंदोलनाबाबत मोठी अपडेट! ठाकरे गटाचे नेते वांगचुक यांची भेट घेणार
आंदोलन करून काही होणार नाही शांततेच्या मार्गाने...हेमा मालिनी
Hema Malini | आंदोलन करून काही होणार नाही शांततेच्या मार्गाने... CJP आंदोलनावर हेमा मालिनी यांचं मोठं विधान
मंत्री जे. पी. नड्डा यांच्यासोबतच्या बैठकीत CJPचा मोठा निर्णय;
Big Breaking | मंत्री जे. पी. नड्डा यांच्यासोबतच्या बैठकीत CJPचा मोठा निर्णय; सोनम वांगचुक...
दिल्लीत बैठक सुरू; IB प्रमुख, गृहसचिव आणि पोलीस आयुक्त एकाच टेबलावर
मोठी बातमी! CJP आंदोलनावर दिल्लीत बैठक सुरू; IB प्रमुख, गृहसचिव आणि पोलीस आयुक्त एकाच टेबलावर
CJP Protest Delhi : दिल्लीतील आंदोलनानंतर अभिजीत दिपके यांची पहिली प्रतिक्रिया समोर, पोलिसांवर गंभीर आरोप.

CJP Protest Delhi : दिल्लीतील आंदोलनानंतर अभिजीत दिपके यांची पहिली प्रतिक्रिया समोर, पोलिसांवर गंभीर आरोप

जरांगे विरुद्ध मुंडे संघर्ष पेटला! धनंजयला कसं मंत्री करतात ते बघतोच, जरांगेंचा इशारा.

जरांगे विरुद्ध मुंडे संघर्ष पेटला! धनंजयला कसं मंत्री करतात ते बघतोच, जरांगेंचा इशारा

CJP च्या निदर्शकांवर दिल्लीत लाठीमार, अण्णा हजारे यांची पहिली प्रतिक्रिया आली, म्हणाले की….

CJP च्या निदर्शकांवर दिल्लीत लाठीमार, अण्णा हजारे यांची पहिली प्रतिक्रिया आली, म्हणाले की…

सरकारवर दबाव टाकता येत नाही, गोंधळ घालून विरोध करणं अयोग्य, CJP च्या आंदोलनावर कंगना रनौत यांची टीका!.

सरकारवर दबाव टाकता येत नाही, गोंधळ घालून विरोध करणं अयोग्य, CJP च्या आंदोलनावर कंगना रनौत यांची टीका!

IMD weather update : महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज, आयएमडीचा हाय अलर्ट, गरज असेल तरच घराबाहेर पडा.

IMD weather update : महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज, आयएमडीचा हाय अलर्ट, गरज असेल तरच घराबाहेर पडा

CJP Delhi Protest : माझे उपोषण सुरूच राहणार, सोनम वांगचूक यांची घोषणा; सरकारकडे केली महत्त्वाची मागणी!.

CJP Delhi Protest : माझे उपोषण सुरूच राहणार, सोनम वांगचूक यांची घोषणा; सरकारकडे केली महत्त्वाची मागणी!