AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Horoscope Today 31 July 2023 : आजचे राशी भविष्य, या राशीच्या लोकांना प्रवासातुन लाभ होईल

Horoscope Today 30 July 2023 आजचे राशी भविष्य या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात आज वाढ होणार आहे. प्रवासातून देखील लाभ होईल. जोडीदाराकडून अपेक्षित सहकार्य लाभेल. घरगुती सुविधेत वाढ होईल.

Horoscope Today 31 July 2023 : आजचे राशी भविष्य, या राशीच्या लोकांना प्रवासातुन लाभ होईल
राशी भविष्यImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jul 31, 2023 | 6:44 AM
Share

मुंबई : ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Todays rashi bhavishya Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

बारा राशींचे आजचे राशी भविष्य

मेष

आज व्यवसायिक मंडळीना नवीन व्यापार सुरू करण्याकरिता उत्तम दिनमान आहे. योगकारक दिवस आहे. व्यवसायात धाडसी निर्णय घ्याल. भांवडाकडून सहकार्य लाभेल. व्यापारात नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे. मित्रमैत्रीणीचे सहकार्य लाभेल. मनोबल उंचावेल. प्रवासातुन लाभ होईल. कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल. आरोग्य देखील उत्तम असणार आहे. शुभ कार्यात सामील व्हाल. मान सन्मान मिळेल. प्रयत्नाच्या तुलनेत लाभ अधिक होईल.

वृषभ

आज ग्रहमान अनुकूल राहतील. रचनात्मक कामात यश मिळेल. कुंटुबातील व्यक्तीकडून विशेष सहकार्य मिळेल. मोठ्यांची मर्जी व मान राखाल. रोजगारात वाढ होईल. खर्चावर काहीस नियंत्रण ठेवावे लागेल. व्यापारात आर्थिक योग उत्तम आहे. देवधर्म आध्यात्मिक कार्य घडेल. दुरवरच्या प्रवासातुन लाभ होतील. गुढशास्त्राची आवड निर्माण होईल. परमेश्वरावर श्रद्धा ठेवा. धनलाभ होण्याची शक्यता आहे.

मिथुन

आज प्रतिकुल दिवस असणार आहे. घातपाताचं भय रहिल. दुर्घटना गंभीर दुखापततीची शक्यता आहे. दिवस कष्टदायक स्वरूपाचा आहे. घरात वादविवादाचे प्रसंग शक्यतो टाळावेत. मन आणि वाणीवर नियंत्रण ठेवा. दुःखद घटना ऐकायला मिळतील. निराशाजनक परिणाम येण्याची शक्यता आहे. मानसिक अस्वस्थता जाणवेल. वादविवाद होण्याची शक्यता अधिक आहे.

कर्क

आज सार्वजनिक जीवनात समाजात मानसन्मान मिळाल्याने उत्साह वाढेल. परिवारात स्नेहपूर्वक वातावरण निर्माण होईल. नवीन व्यवसायिक घटना घडणार आहे. वेगवेगळ्या मार्गाने धनलाभ होतील. नवे मित्रमैत्रिणी भेटतील. संततीकरिता आजचा दिवस उत्सहाचा आहे. प्रवासाचे योग घडतील. कुटुंबातील सुखद वातावरणात वृद्धी होईल. आज गुंतवणूक करा. भविष्यात ही गुंतवणुक फायदेशीर ठरेल. प्रोत्साहन मिळेल.

सिंह

आज काहीसी तणावमय परिस्थिती निर्माण होईल. मनाची चलबिचल वाढेल. व्यापारात देण्याघेण्याच्या व्यवहारात सावध रहा. संततीकडे विशेष लक्ष दयावे. मुलांच्या कामावर नजर ठेवा. आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष केल्याना मोठ्या समस्या उद्‌भवतील. मान प्रतिष्ठा संभाळावी. हितशत्रुचा त्रास जाणवेल. आपल्या विरोधात वातावरण तयार होऊ नये याची काळजी घ्या. निरर्थक कामात आपला वेळ जाणार आहे. वेळेचा अपव्यय टाळा. स्थावर मालमत्तेबाबत अडचण येण्याची शक्यता आहे.

कन्या

आज आपल्या कार्यक्षेत्रात कामाचा विस्तार वाढणार आहे. नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जातील. महिलावर्गासोबत आदरभाव युक्त व्यवहार ठेवावेत. मानी आणि अहंकारी वृत्तीचा मात्र त्याग करा. वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्या. आज यश निश्चित लागेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी प्राप्त कराल. नवीन कल्पना नक्की मांडा. आपल्याला सहकार्य लाभणार आहे. व्यापारीवर्गाकरिता आकस्मिक धनलाभ होईल.

तुला

आज सफलतादायक दिवस आहे. परिवारात शुभ कामाचे आयोजन केले जाईल. खर्चाचा आवाका जपा. व्यापारात परिस्थिती चांगली राहिल. मोठी गुंतवणूक फायदेशीर ठरेल. नवीन उपक्रम राबवू शकाल. कौटुंबिक जीवनात मनासारख्या घटना घडतील. अचानक लाभ होण्याची शक्यता असून वारसा हकाचे प्रकरण मार्गी लागेल. अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तीं सोबत परिचय होईल.

वृश्चिक

आज नियोजित कार्य वेळेत पूर्ण होईल. आपल्या कार्यक्षेत्रात सन्मान मिळेल. आर्थिक उत्पनात वाढ होईल. व्यापाराच्या दृष्टीने चांगला दिवस आहे. नवीन प्रकल्पात गुंतवणुकीसाठी व शुभ कार्यासाठी दिवस उत्तम राहिल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अनेक मान्यवर व्यक्तींचे सहकार्य लाभेल. सामाजिक क्षेत्रातील व्यक्तिंच्या मान सन्मानात वाढ होईल. प्रतिष्ठीत व्यक्तींच्या संपर्कात प्रतिष्ठा वाढेल.

धनु

आज आकस्मिक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. उद्योगक्षेत्रातील व्यक्तींना भरभराटीचा दिवस आहे. प्रत्यक्ष दूरदर्शीपणाने योग्य कामे होतील. व्यवसायातील वातावरण चांगले राहिल. वारसा हक्काची प्रकरण मार्गी लागेल. मान्यवर व मोठ्या व्यक्तींचा सहवास लाभेल. घरातील कौटुंबिक वातावरण चांगले राहिल. चांगल्या भावनेने काम करा. आपल्या अंगीभूत कलागुणांसाठी चांगले वातावरण आहे. संततीकडून शुभवार्ता ऐकण्यास मिळतील.

मकर

आज व्यापारी वर्गाकरीता महत्वाचा योग आहे. आज उत्पन्नात वाढ होणार आहे. प्रवासातून देखील लाभ होईल. जोडीदाराकडून अपेक्षित सहकार्य लाभेल. घरगुती सुविधेत वाढ होईल. वरिष्ठाची मदत मिळेल. कामाप्रती विशेष ओढ निर्माण होईल. काही नव-नवीन कल्पना आमलात आणा. नवीन कल्पना सुचतील. नव कल्पनेवर अमल करण्यासाठी दिवस योग्य आहे. संधीचं सोनं करा. विचलीत होऊ नका. प्रशासकीय कामकाजात यश प्राप्त होईल.

कुंभ

आज मानसिक स्वास्थ बिघडण्याची शक्यता आहे. प्रकृतीवर विपरित परिणाम होऊ शकतात. मानसिक ताण वाढणार आहे. व्यक्तिगत समस्या निर्माण होतील. कौटुंबिक जबाबदारी कडे लक्ष द्या. आहारात नियमितता ठेवा. मानसिक आणि शारिरिक थकवा जाणवेल. नुकसानीची घटना घडण्याची शक्यता आहे. कर्ज घेणे आज टाळा. प्रवास नुकसानकारक राहिल. मान अपमानचे प्रसंग घडतील.

मीन

आज व्यवहारात आर्थिक लाभ झाल्याने आंनदी रहाल. व्यवसायात आर्थिक समस्या दूर होईल. मनोबल उंचावलेल असेल. कायदेशीर कामात यश मिळेल. धाडसी निर्णय घ्याल. अपेक्षित यश लाभेल. गृहसौख्य आणि पत्नीची साथ मिळेल. प्रेमसंबंध दृढ होतील व्यापारात आर्थिक प्राप्तीत वाढ होईल. भागीदाराकडून उत्तम सहकार्य लाभेल. व्यापारात मोठे लाभ होईल. कलाक्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कार मिळतील. दिर्घकालीन गुंतवणुक फायदेशीर ठरेल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?