AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आजचे राशीभविष्य 31 March 2025 : व्यवसायात मोठी ऑर्डर, धार्मिक ठिकाणी जाण्याचा योग…आज तुमच्या राशीत काय?

Horoscope Today 31 March 2025 in Marathi : ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते. तुमचा आजचा दिवस कसा जाईल ? काय घडणार आजच्या दिवसात ? हे जाणून घेण्यासाठी अवश्य वाचा आजचे राशीभविष्य

आजचे राशीभविष्य 31 March 2025 : व्यवसायात मोठी ऑर्डर, धार्मिक ठिकाणी जाण्याचा योग...आज तुमच्या राशीत काय?
| Updated on: Mar 31, 2025 | 7:30 AM
Share

ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 31 March 2025) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनू, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

मेष राशी (Aries Daily Horoscope)

आजचा दिवस मेष राशीच्या व्यक्तींसाठी आर्थिक स्थितीत सुधारणा करणारा असणार आहे. आजपासून तुम्ही काही नवीन कौशल्य शिकू शकता. तसेच जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल, तर आज चांगला दिवस आहे. मित्रांसोबत फिरण्याचा बेत देखील आखाल. नोकरीत बढतीचे योग आहेत.

वृषभ राशी (Taurus Daily Horoscope)

वृषभ राशीच्या व्यक्तींना आज काहीतरी गुडन्यूज मिळेल. नोकरी करणाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. मात्र बिझनेस करणाऱ्यांनी खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहेत. घर खरेदीसाठी उत्तम दिवस आहे. आज तुम्ही एखादी मोठी डील करु शकता. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील.

मिथुन राशी (Gemini Daily Horoscope)

मिथुन राशीच्या व्यक्तींनी आज जोडीदारासोबतचे वाद टाळावेत. कारण यामुळे नात्यात कटुता निर्माण होते. गुंतवणुकीसाठी आज फार उत्तम संधी मिळू शकतात. परंतु शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी एकदा जाणकारांशी संवाद साधवा. तसेच आर्थिक गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा.

कर्क राशी (Cancer Daily Horoscope)

कर्क राशीच्या लोकांनी आपल्या जोडीदारसोबत वेळ घालवावा. जर एखाद्या विषयावर काही अडचणी असतील तर मनमोकळेपणाने संवाद साधा. या आठवड्यात कोणतीही गुंतवणूक करु नका, अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकते.

सिंह राशी (Leo Daily Horoscope)      

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम राहील. बचत करण्यावर लक्ष द्या. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आज खूप धावपळ होईल. काही कारणामुळे प्रवासाचे योग संभवतात.

कन्या राशी (Virgo Daily Horoscope)

कन्या राशीच्या व्यक्ती जर विवाह करण्याचा विचार करत असतील, तर थोडा आर्थिक बाजूचा विचार करावा. प्रवासाचे योग संभवतात. करिअर आणि वैयक्तिक जीवन यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न कराल.

तूळ राशी (Libra Daily Horoscope)

तूळ राशीच्या व्यक्ती आज आपल्या जोडीदारासोबत वेळ घालवतील. कामाच्या ठिकाणी त्रास होण्याची शक्यता आहे. तुमच्या वरिष्ठांकडून आज तुम्हाला ओरडा बसेल. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर मोठी ऑर्डर मिळेल.

वृश्चिक राशी (Scorpio Daily Horoscope)

वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस नात्यातील संबंध अधिक दृढ करण्याचा असेल. नोकरी करणाऱ्यांना गुडन्यूज मिळेल. आर्थिक बाजू सुधारेल. मात्र खर्चाचे प्रमाण अधिक असल्याने बचत करणं शक्य होणार नाही. अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा. आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत वाद होण्याची शक्यता आहे.

धनु राशी (Sagittarius Daily Horoscope)

धनु राशीच्या व्यक्तींनी आज अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक आहे. भविष्यातील गरजा लक्षात घेता बचत करा. शांत राहून मार्ग काढा. तसेच तणाव येईल असे वागू नका.  कुटुंबासोबत धार्मिक ठिकाणी जाण्याचा योग आहे.

मकर राशी (Capricorn Daily Horoscope)

मकर राशीच्या लोकांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. वैवाहिक जीवनात पती-पत्नीमध्ये छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद वाढतील. जवळचे मित्र-मैत्रिणी भेटतील. जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळेल. अचानक धनलाभ संभावतो.

कुंभ राशी (Aquarius Daily Horoscope)

कुंभ राशीच्या व्यक्तींनी सर्व काम वेळेवर पूर्ण करावी. तुमचे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन चांगले राहील. नवीन संधी प्राप्त होतील. आपल्या नात्यात प्रेम टिकवून ठेवणे महत्त्वाचे आहे, ज्यामुळे तुमचे नाते अधिक दृढ होईल.

मीन राशी (Pisces Daily Horoscope)

मीन राशीच्या व्यक्ती आज आपल्या जोडीदारासोबत दर्जेदार वेळ घालवतील. करिअरमध्ये चांगली संधी मिळेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आज खूप धावपळ होईल. अचानक प्रवासाचे योग संभवतात.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
Independence Day 2026 | पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं - पंतप्रधान मोदी
PM Narendra Modi : स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं, पंतप्रधान मोदींकडून भारताच्या प्रगतीवर भर
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवाना रद्द केला, नेमकं कारण काय?
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
Eknath shinde | काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात, 45 सरकारांचा दाखला देत म्हणाले...
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
Nagpur Farmer | शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! नागपूरच्या शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल चर्चेत, व्हिडिओ होतोय व्हायरल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही म्हणत मोदींवर निशाणा
शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
तू तेव्हा वाचला आहेस, आता वाचणार नाहीस! शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल
MNS Protest | केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल; आंदोलन पेटलं
हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Ramp Walk | हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन; रेशीम उद्योगाला मिळणार नवी झेप