AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आजचे राशीभविष्य 4 April 2025 : ऑफिसमध्ये बॉसकडून स्तुती, तर प्रवासात मित्र-मैत्रिणींशी भेट…तुमच्या राशीत आज काय?

Horoscope Today 4 April 2025 in Marathi : ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते. तुमचा आजचा दिवस कसा जाईल ? काय घडणार आजच्या दिवसात ? हे जाणून घेण्यासाठी अवश्य वाचा आजचे राशीभविष्य

आजचे राशीभविष्य 4 April 2025 : ऑफिसमध्ये बॉसकडून स्तुती, तर प्रवासात मित्र-मैत्रिणींशी भेट...तुमच्या राशीत आज काय?
| Updated on: Apr 04, 2025 | 7:30 AM
Share

ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 4 April 2025) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनू, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

मेष राशी (Aries Daily Horoscope)

आजचा दिवस मेष राशीच्या व्यक्तींसाठी कामात बदल होणारा असणार आहे. ऑफिसमध्ये वरिष्ठ तुमची प्रशंसा करतील, मात्र यामुळे इतर सहकाऱ्यांची गैरसोय होऊ शकते. आज इतरांसाठी धावपळ कराल. व्यवसायात पैशाशी संबंधित तुमच्या सर्व योजना यशस्वी होतील. तब्येत बिघडेल.

वृषभ राशी (Taurus Daily Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस समाधानकारक असेल. राजकीय क्षेत्रात प्रगती होईल. आज एखादी गुडन्यूज मिळेल. यामुळे पद आणि प्रतिष्ठेत वाढ होईल. रात्री काही अप्रिय लोकांसोबत भेट होईल. यामुळे तुम्हाला अनावश्यक त्रास होईल.

मिथुन राशी (Gemini Daily Horoscope)

आज मिथुन राशीच्या लोकांना वडिलांच्या आशीर्वादाने कृपेने मौल्यवान वस्तू किंवा मालमत्ता मिळू शकते. तुमचा दिवस खूप व्यस्त असेल. अनावश्यक खर्चापासून दूर राहा. गाडी चालवताना सावधगिरी बाळगा. प्रिय लोकांची भेट होईल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. कुटुंबातील लोकांकडून तुम्हाला मदत मिळेल. आज तुम्हाला यश मिळेल.

कर्क राशी (Cancer Daily Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. ग्रहांच्या शुभ स्थितीमुळे तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुमचा मान-सन्मान वाढेल. कोणताही निर्णय घाईत घेणे टाळा, अन्यथा तुम्हाला नंतर पश्चात्ताप होऊ शकतो. संध्याकाळपासून रात्रीपर्यंत काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जावे लागू शकते.

सिंह राशी (Leo Daily Horoscope)      

सिंह राशीच्या व्यक्तींना राजकीय क्षेत्रात मोठे यश मिळेल. मुलांप्रती तुमच्या जबाबदाऱ्या तुम्ही पूर्ण कराल. तुम्हाला स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळण्याची शक्यता आहे. तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील. तुम्हाला आर्थिक लाभ होईल. संध्याकाळपासून रात्रीपर्यंतचा वेळ हसण्यात-खेळण्यात जाईल. खाण्यापिण्याची काळजी घ्या.

कन्या राशी (Virgo Daily Horoscope)

कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस यशाने भरलेला असेल. तुमच्या कामांना गती मिळेल.  तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून आणि नातेवाईकांकडून आनंदाची बातमी मिळेल. तुमचे भाग्य तुमच्या सोबत असेल. पण रागावर नियंत्रण ठेवा. घर-कुटुंबातील समस्या सुटतील. तुम्हाला सरकारी मदतही मिळेल. अचानक लाभ होण्याची शक्यता आहे.

तूळ राशी (Libra Daily Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी शिक्षण आणि स्पर्धा क्षेत्रात विशेष यश मिळेल. तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. धनलाभ होईल. तुम्हाला बोलण्यामुळे लोक प्रभावित होतील. तुम्हाला प्रत्येक कार्यात सन्मान मिळेल. धावपळीमुळे तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल. प्रवासाचा योग संभवतो. तुमच्या सन्मानात वाढ होईल.

वृश्चिक राशी (Scorpio Daily Horoscope)

वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आर्थिक लाभाचे योग आहेत. तुमच्या धन-सन्मानात वाढ झाल्यामुळे मन प्रसन्न राहील. तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील. प्रियजनांशी भेट होईल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा, नाहीतर तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. संध्याकाळी आणि रात्री फिरण्याची संधी मिळेल.

धनु राशी (Sagittarius Daily Horoscope)

धनु राशीच्या लोकांचे आज घरातील वस्तूंवर पैसे खर्च होतील. कोणत्याही कर्मचाऱ्यामुळे किंवा नातेवाईकामुळे ताण वाढेल. आज कोणताही  व्यवहार करु नका. सावधगिरी बाळगा, नाहीतर तुमचे पैसे अडकू शकतात. सरकारी कामासाठी कोर्ट-कचेरीच्या फेऱ्या माराव्या लागू शकतात. पण तुमचा विजय होईल. सावध राहा आणि आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा

मकर राशी (Capricorn Daily Horoscope)

मकर राशीच्या लोकांनी आशावादी राहा. नकारात्मक विचार सोडा. घरात सलोख्याचे वातावरण ठेवा. अचानक प्रेम व्यक्त करण्याची संधी मिळेल. आज भाऊबहिणींसोबत चित्रपट पाहण्याचा योग आहे. त्यामुळे त्याचा आनंद घ्या. एकमेकांच्या भावना समजून घ्या. प्रेम वाढवा.

कुंभ राशी (Aquarius Daily Horoscope)

कुंभ राशीच्या व्यक्तींनी आरोग्याची काळजी घ्या. अनोळखी व्यक्तीच्या सल्ल्याने केलेल्या गुंतवणुकीतून फायदा होईल. घरात वाद होण्याची शक्यता आहे. जपून बोला. प्रवासात जवळचे मित्र-मैत्रिणी भेटू शकतात. खरेदीत जास्त खर्च करू नका. आज वैवाहिक जीवन खूप आनंदी राहील.

मीन राशी (Pisces Daily Horoscope)

मीन राशीच्या व्यक्तींसाठी आज परिस्थिती नियंत्रणात असेल. त्यामुळे चिंता मिटेल. आर्थिक लाभ होतील. नातेवाईकांना आर्थिक व्यवस्थापन करू देऊ नका. तुमचा जोडीदार तुमच्यावर कायम प्रेम करेल. कामाच्या ठिकाणी चांगली ओळख होईल. लोकांबरोबर बोलण्यात वेळ वाया घालवू नका. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या प्रेमात खूप आनंद मिळेल.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.