AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Karwa Chauth 2022: करावा चौथला राशीनुसार परिधान करा या रंगाचे वस्त्र, मनोकामना होतील पूर्ण

करावा चौथच्या दिवशी स्त्रियांनी राशीनुसार वस्त्र परिधान केल्यास विशेष लाभ मिळतो. जोतिषशात्रानुसार जाणून घेऊया कोणत्या राशीच्या स्त्रियांनी कोणता रंग घालावा.

Karwa Chauth 2022:  करावा चौथला राशीनुसार परिधान करा या रंगाचे वस्त्र, मनोकामना होतील पूर्ण
करावा चौथ २०२२Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Sep 29, 2022 | 9:18 PM
Share

मुंबई,  दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला करवा चौथ व्रत (Karwa Chauth 2022) पाळले जाते. हे व्रत हिंदू धर्मात अत्यंत शुभ मानले जाते. सवाष्ण स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी निर्जला व्रत करतात. दिवसभर अन्नपाण्याशिवाय  उपवास केल्यानंतर संध्याकाळी  चंद्र पाहून व्रताची सांगता करतात. यावर्षी हे व्रत 13 ऑक्टोबर 2022 रोजी येत आहे. धार्मिक मान्यतेनुसार करवा चौथच्या दिवशी विवाहित स्त्री सोळा श्रृंगार करून चंद्रदेवाची पूजा करते. असे केल्याने शुभ फळ मिळते असे मानले जाते.  ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी महिलांनी राशीनुसार विशिष्ट रंगाचे कपडे निवडले तर ते अधिक शुभ मानले जाते.

  1. मेष- या राशीचा स्वामी मंगळ आहे. त्यामुळे या राशीच्या महिला लाल किंवा केशरी रंगाची साडी, लेहेंगा इत्यादी परिधान करू शकतात.
  2. वृषभ- राशीचा स्वामी बुध आहे. बुध ग्रहाला हिरवा रंग आवडतो. त्यामुळे या राशीच्या स्त्रिया हिरवे कपडे घालू शकतात.
  3. मिथुन- या राशीचा स्वामी बुध ग्रह आहे. बुध ग्रह मजबूत करण्यासाठी, या राशीच्या महिलांनी हिरव्या साडीसह मॅचिंग बांगड्या घालाव्यात.
  4. कर्क- या राशीचा स्वामी चंद्र आहे. चंद्राचा रंग पांढरा आहे. पण पांढरा रंग धारण करणे शुभ मानले जात नाही. अशा स्थितीत या राशीच्या महिलांनी अशी साडी घालावी ज्यामध्ये थोडासा पांढरा रंग असेल.
  5. सिंह- सूर्य हा या राशीचा स्वामी आहे. सूर्याचा शुभ रंग लाल, केशरी आणि सोनेरी आहे हे रंग उर्जेचे प्रतीक आहेत.  या राशीच्या महिलांनी वरील रंगाचे कपडे निवडावेत.
  6. कन्या- कन्या राशीचा स्वामी बुध आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या महिलांनी पिवळे किंवा हिरवे कपडे आणि बांगड्या निवडल्या तर ते शुभ राहील.
  7.  

    तूळ- तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे. अशा स्थितीत या राशीच्या महिलांनी पांढरे किंवा सोनेरी रंगाचे कपडे परिधान करावेत.

  8.  

    वृश्चिक- या राशीचा स्वामी मंगळ आहे. त्यामुळे या राशीच्या महिलांनी लाल रंगाचे कपडे निवडावेत. तसेच लाल रंगाच्या बांगड्या घालाव्यात.

  9. धनु- बृहस्पति हा धनु राशीचा स्वामी आहे. या राशीच्या महिलांनी पिवळ्या किंवा सोनेरी रंगाची साडी, लेहेंगा किंवा शूट घालावे.
  10.  

    मकर- शनि हा मकर राशीचा अधिपती ग्रह आहे. या ग्रहाचा शुभ रंग निळा आहे. त्यामुळे या राशीच्या महिलांनी निळ्या रंगाचे वस्त्र परिधान केल्यास ते शुभ सिद्ध होते.

  11.  

    कुंभ- कुंभ राशीचाही स्वामी शनि आहे. त्यामुळे या राशीच्या महिलांनी निळ्या रंगाचे पोशाख निवडावेत.

  12. मीन- बृहस्पति म्हणजे गुरु हा या राशीचा स्वामी आहे. त्यामुळे या राशीच्या महिलांनी पिवळ्या किंवा सोनेरी रंगाचे कपडे खरेदी करावेत.

Follow Us
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती
मराठमोळ्या अभिनेत्याच्या घरी सुरेख डेकोरेशन; सामाजिक संदेश देत केलं बा
मराठमोळ्या अभिनेत्याच्या घरी सुरेख डेकोरेशन; सामाजिक संदेश देत केलं बाप्पांचं स्वागत
विनयभंगाच्या तक्रार प्रकरणी शिंदे गटातील आमदार संजय गायकवाडांची मोठी..
विनयभंगाच्या तक्रार प्रकरणी शिंदे गटातील आमदार संजय गायकवाडांची मोठी प्रतिक्रिया; थेट म्हणाले...
देवेंद्र फडणवीस यांचा राजभाषा दिनी मातृभाषा, भारतीय भाषांच्या गौरव...
देवेंद्र फडणवीस यांचा राजभाषा दिनी मातृभाषा आणि भारतीय भाषांच्या गौरवाचा संदेश
अमित शहा, फडणवीस, शिंदे अन् सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजभाषा...
अमित शहा, फडणवीस, शिंदे अन् सुनेत्रा पवार एकाच मंचावर; वाशीत राजभाषा संमेलनाचा थाट!
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत...
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत मोठी नावे
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत,
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत, खास काय?
मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजी
Ganpati Bappa Morya | मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजीरवाडी मंडळात दर्शन