Astrology: ‘या’ राशीच्या लोकांना मिळू शकतो आपल्याच माणसांकडून धोका; जाणून घ्या तुमचे राशी भविष्य

वृषभ राशीच्या लोकांना आज काही काळ धार्मिक स्थळी अथवा अनुभवी लोकांसोबतही घालवा, त्यामुळे तुम्हाला सकारात्मक उर्जा मिळू शकेल. सिंह राशीच्या व्यक्तींनी सावध राहण्याची गरज आहे. तुमचा ज्यांच्यावर विश्वास आहे, तेच तुम्हाला दगा देऊ शकतात.

Astrology: 'या' राशीच्या लोकांना मिळू शकतो आपल्याच माणसांकडून धोका; जाणून घ्या तुमचे राशी भविष्य
आजचे राशिभविष्य
Follow us
| Updated on: Jul 18, 2022 | 10:56 AM

Daily Horoscope : आज आहे सोमवार(Monday), 18 जुलै 2022. तुमचा आजचा दिवस कसा जाईल ? कोणकोणत्या उपायांनी तुम्ही आजचा दिवस आणखी चांगल्या पद्धतीने घालवू शकाल. इथे आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स देऊ, ज्यांचे पालन केल्यास तुमचा दिवस शुभ आणि यशस्वी ठरेल. आजच्या राशीभविष्यात (Today’s Horoscope0) आम्ही तुम्हाला काही अशा गोष्टी सांगू, ज्यांच्या मदतीने तुम्ही आज होणारे नुकसानही कमी करू शकता. ज्योतिष या शब्दाचा स्रोत हा मूळ संस्कृत शब्द ज्योतिमध्ये आहे. ज्योति म्हणजे प्रकाश देणारी वस्तू. माणसाच्या जन्मवेळेची आकाशातील ग्रहस्थिती आणि नंतर वेळोवेळी आकाशात निर्माण होणारी ग्रहस्थिती यांचे संयुक्त परिणाम माणसाच्या जीवनावर होतात, असे मानून त्यांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे फलज्योतिष होय. जोतिषशास्त्रात (Astrology) 12 राशींचे महत्त्व सांगण्यात आले आहे. जाणून घेऊया सोमवार, 18 जुलैचे राशीभविष्य..

मेष – मेष राशीच्या व्यक्तींची आज एखाद्या खास, अनुभवी व्यक्तीशी भेट होईल, ज्यामुळे विचारांमध्ये सकारात्मक बदल घडून येईल. जीवनाशी जोडलेले प्रत्येक कार्य करण्यासाठी चांगला दृष्टिकोन मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. ज्या गोष्टीसाठी खूप दिवसांपासून प्रयत्न करत आहात, त्यात यश मिळण्याची शक्यता आहे. कामातील व्यापामुळे कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका, त्यांना पुरेसा वेळ देणे गरजेचे आहे. तुमची महत्वपूर्ण कागदपत्रे कोणाच्याही हाती देऊ नका अथवा त्याबद्दल कोणालाही (माहिती) सांगू नका, त्याचा दुरूपयोग होऊ शकतो.

वृषभ – वृषभ राशीच्या लोकांनी आज काही काळ धार्मिक स्थळी अथवा अनुभवी लोकांसोबतही घालवा, त्यामुळे तुम्हाला सकारात्मक उर्जा मिळू शकेल. पैशांच्या देण्या-घेण्यावरून नात्यांमध्ये फूट पडू शकते. नातेवाईक- भावंडांशी चांगले संबंध राखा. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका.

हे सुद्धा वाचा

मिथुन – मिथुन राशीच्या घरातील कारभार शिस्तीने झाल्यास घरातील सर्व सदस्य एकमेकांशी सामंजस्याने वागतील. एखादे मंगल कार्य करण्याची योजना आखण्यात येईल. एखाद्या नातेवाइकांसंबंधित शुभ बातमी मिळून वातावरण आनंदी होईल. मात्र तिऱ्हाईत व्यक्तीमुळे वाद निर्माण होऊ शकतो. दुसऱ्यांच्या वादात पडू नका. रागावर नियंत्रण ठेवून परिस्थिती संयमाने हाताळा.

कर्क – कर्क राशीच्या लोकांच्या घरात धार्मिक कार्य होऊ शकेल. कुटुंबातील अविवाहीत सदस्यासाठी चांगले स्थळ येऊ शकेल. ज्या कामासाठी तुम्ही खूप दिवसांपासून मेहनत करत आहात, त्यामध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. एखाद्या मित्राशी भांडणाची परिस्थिती निर्माण झाल्यास शांततेने मार्ग काढा. अनपेक्षित खर्च समोर येऊ शकतो.

सिंह – सिंह राशीच्या व्यक्तींचा धार्मिक, अध्यात्मिक कार्यातील रस, यामुळे त्यांच्या दृष्टिकोनात सकारात्मक बदल होईल. हातात घेतलेल काम शांतपणे आणि यशस्वीपणे पूर्ण होईल. मात्र ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवला आहे, ते तुम्हाला दगा देऊ शकतात, त्यामुळे सावध रहा. शेअर्स, सट्टा अशा गोष्टींनपासूनही दूर रहा.

कन्या – एखादे सरकारी काम अडकले असेल तर प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने ते पूर्ण होऊ शकेल. अनेक अडकलेली कामे पूर्ण होतील. मात्र कोणताही महत्वाचा निर्णय घेताना, प्रॅक्टिकला घ्या. भावनेच्या भरात निर्णय घेतल्यास नुकसान होऊ शकते. इतर कोणाकडूनही जास्त अपेक्षा न ठेवता स्वत:च्या योग्यतेवर विश्वास ठेवून काम करा.

तूळ – गेल्या अनेक दिवसांपासून ज्या समस्येमुळे त्रस्त आहात, त्यावरील उपाय सापडेल. तुमच्या व्यक्तिगत कामावर लक्ष केंद्रित करु शकाल. कुटुंबाची सोबतही मिळेल. जवळच्या मित्राच्या सल्ल्याने तुमची कामे पूर्ण होतील. अनपेक्षित संकटामुळे गाबरू नका, त्यावर उपाय शोधा. तणावामुळे कोणत्याही वादात अडकू नका. विद्यार्थ्यांनी अभ्यास , करीअरकडे दुर्लक्ष करू नये.

वृश्चिक – मोठ्या, अनुभवी लोकांमुळे जीवनातील अनेक समस्यांबद्दल मार्गदर्शन मिळू शकते. कामाच्या व्यापात असलात तरी मित्र आणि नातेवाईकांसाठी अवश्य संपर्क ठेवा. त्यामुळे मनाला शांतता मिळेल. विद्यार्थ्यांनी मजा-मस्तीत वेळ घालवता अभ्यासाकडे लक्ष द्यावे.

धनु – कामाचे थकलेले पैसे मिळतील व आर्थिक स्थिती बळकट होईल. एखाद्या समस्येत अडकला असाल तर जवळच्या मित्राचा सल्ला घ्या. कोणतेही चुकीचे काम तुम्हाला त्रासदायक ठरू शकेल. परिवारातील ज्येष्ठ व्यक्तींची सोबत आणि त्यांच्या अनुभव तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

मकर – मकर राशीतील व्यक्ती, धार्मिक किंवा अध्यात्मिक कार्यात काही वेळ घालवतील, त्यामुळे मनाल शांतता मिळेल. प्रॉपर्टीसंबंधी रखडलेली कामे पूर्ण होतील. कामाच्या व्यापामुळे कुटुंबाकडे दुर्लक्ष होऊ शकते.

कुंभ – रोजच्या रुटिनमध्ये बदल केल्यास चांगले वाटेल. योगासने आणि मेडिटेशनमधील तुमची वाढती रुची चांगला बदल घडवत आहे. त्यामुळे अनेक महत्वाचे निर्णय सहज घेू शकाल. भावनेच्या भरात घेतलेल निर्णय चुकू शकता. व्यक्तिगत गोष्टी इतरांना सांगू नका, लोकं त्याचा गैरफायदा घेऊन तुम्हाला दगा देऊ शकतील,

मीन – मीन राशीतील व्यक्तींच्या ग्रहांची स्थिती अनुकूल आहे. पैशांची गुंतवणूक करण्यासाठी योग्य वेळ आहे, मात्र त्यापूर्वी अनुभवी लोकांचा सल्ला नक्की घ्या. घरातील वरिष्ठांचा नेहमी मान राखा. स्वभावातील राग किंवा चिडचिडेपणा यामुळे तुमच्या कामात विघ्न येऊ शकते. त्यामुळे स्वत:चे अवलोकन जरूर करा.

(टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा.)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.