AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मूलांक 6 असणाऱ्यांची लव्ह लाइफ, रिलेशनशीप कशी?; स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वही जाणून घ्या

प्रत्येकाला आपल्या भविष्यात डोकावण्याची सवय असते. माझं भविष्य काय आहे. मी कसा जगू शकतो. माझ्या आयुष्यात काय घडेल याची सर्वांना उत्सुकता असते. त्यामुळे अनेक लोक आपलं भविष्य बघतात. पण मूलांकावरूनही तुमचं भविष्य सांगितलं जाऊ शकतं हे तुम्हाला माहीत आहे काय?

मूलांक 6 असणाऱ्यांची लव्ह लाइफ, रिलेशनशीप कशी?; स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वही जाणून घ्या
numerologyImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 15, 2024 | 9:13 PM
Share

आपल्या आयुष्यात काय होईल. आपल्या लाइफमधील स्थिती काय होईल? हे कुणालाच माहीत नसतं. हे जाणून घेण्यासाठी लोक ज्योतिषशास्त्राचा आधार घेतात. भविष्यातील गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करतात पण मूलांकामुळेही बरीच काही माहिती मिळते हे तुम्हाला माहीत आहे का? त्याला अंक ज्योतिषही म्हटलं जातं. अंक ज्योतिषाच्या माध्यमातूनही तुम्ही बरंच काही जाणून घेऊ शकता. अंक ज्योतिषाच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मूलांकाबाबत येणाऱ्या काळाची माहिती घेता. आज आपण मूलांक 6 बाबत जाणून घेऊ.

6, 15 आणि 24 तारखेला जन्मलेल्यांचा मूलांक 6

मूलांकाची गणना 1 ते 9 पर्यंत होते. ती जन्म तारखेने ठरवली जाते. म्हणजे तुमचा जन्म जर 12 तारखेचा असेल तर 1+2 केल्यास उत्तर 3 येतं. त्यामुळे तुमचा मूलांक हा 3 होतो. या मूलांकावरूनच व्यक्तीचा स्वभाव, व्यवहार आणि गुणदोषाची माहिती मिळते. जर तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15 आणि 24 तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक 6 होतो.

लव्ह लाइफ भारीच

ज्यांचा मुलांक 6 आहे, त्यांच्यासाठी 2024 हे वर्ष अत्यंत चांगलं जाणार आहे. हे वर्ष आनंददायक असलं तरी कौटुंबिक वाद होण्याचीही शक्यता आहे. आर्थिक दृष्ट्या हे वर्ष तुमच्यासाठी अत्यंत चांगलं असेल. नोकरी धंद्यात नवीन संधी मिळेल. तुमची लव्ह लाइफही अत्यंत चांगली राहील. या मूलांकाचे लोक या वर्षी विलासी आयुष्य घालवतील.

रिलेशनशीप कसं?

हे वर्ष प्रेमीयुगुलांसाठी चांगलं राहणार आहे. तुमची रिलेशनशीप घट्ट होईल. तुमच्या रिलेशनशीपमधील अडथळे दूर होतील. तुमच्या पार्टनरसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. मात्र, कुटुंब आणि सोशल लाइफ चांगली करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. मूलांक 6 चे लोक त्यांच्या आयुष्यात अत्यंत बॅलन्स्ड असतात. त्यामुळे ते आपल्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाइफमध्ये सामंजस्य बनवतात.

करिअर

मूलांक 6च्या लोकांच्या लोकांच्या करिअरकडे पाहिले तर त्यांच्या कार्यशैलीवर सर्व काही अवलंबून आहे. जर तुम्ही योग्य निर्णय घेऊन पुढे गेला तर करिअरमध्ये कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवणार नाही. वर्ष 2024 हे करिअरसाठी अत्यंत चांगलं ठरणार आहे. तुम्हाला नव्या कामाच्या प्रकल्पासाठीही तयार राहावं लागेल. नव्या संधी मिळतील. संधीच्या ठिकाणी तुम्ही तुमचं कौशल्य दाखवाल.

आरोग्य

या मूलांकाच्या लोकांना आरोग्याची अधिक काळजी घ्यावी लागेल. आरोग्याच्या कुरबुरी होतील, त्यामुळे खर्च वाढेल. तुम्हाला पचन आणि डोकेदुखी सारख्या समस्या जाणवतील. योग आणि ध्यानाच्या माध्यमातून तुमची दिनचर्या चांगली करू शकता.

शुभ दिवस

या मूलांकाच्या लोकांसाठी 6, 15 आणि 24 तारीख शुभ असते. पांढरा आणि निळा रंग यांच्यासाठी शुभ असतो. तसेच सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार शुभ दिवस असतो.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.