AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lunar Eclipse 2023 : ग्रहण काळात गर्भवती स्त्रियांनी अशी घ्यावी काळजी, किती वाजता लागणार सुतक काळ

जोतिषशास्त्रानुसार सर्वांच्या जीवनावर त्याचा परिणाम दिसून येईल. ज्योतिषशास्त्रानुसार 28 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून चंद्रग्रहण सुरू होईल आणि पहाटे 2.25 वाजता संपेल. शास्त्रानुसार अशा वेळी लोकांनी अनेक विशेष गोष्टींची काळजी घ्यावी. विशेषत: गरोदर महिलांनी ग्रहणकाळात काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

Lunar Eclipse 2023 : ग्रहण काळात गर्भवती स्त्रियांनी अशी घ्यावी काळजी, किती वाजता लागणार सुतक काळ
चंद्रग्रहणImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Oct 25, 2023 | 12:04 PM
Share

मुंबई : ज्योतिषशास्त्रात (Astrology) ग्रहणाची घटना खूप खास आणि महत्वाची मानली जाते. या वर्षीचे शेवटचे चंद्रग्रहण 28 ऑक्टोबरला शरद पौर्णिमेच्या दिवशी होणार आहे. 30 वर्षांनंतर शरद पौर्णिमेच्या मुहूर्तावर ग्रहण होणार आहे. या वर्षातील हे शेवटचे ग्रहण (Lunar Eclipse) असेल, जे भारतात दिसणार आहे. या कारणास्तव त्याचा सुतक कालावधी देखील वैध असेल. जोतिषशास्त्रानुसार सर्वांच्या जीवनावर त्याचा परिणाम दिसून येईल. ज्योतिषशास्त्रानुसार 28 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून चंद्रग्रहण सुरू होईल आणि पहाटे 2.25 वाजता संपेल. शास्त्रानुसार अशा वेळी लोकांनी अनेक विशेष गोष्टींची काळजी घ्यावी. विशेषत: गरोदर महिलांनी ग्रहणकाळात काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. असे मानले जाते की ग्रहणाच्या वेळी नकारात्मक शक्ती प्रबळ होतात. अशा परिस्थितीत त्याचा प्रभाव विशेषतः गर्भवती महिलांवर दिसून येतो. गरोदर स्त्रीसाठी शास्त्रामध्ये काही खास गोष्टी सांगण्यात आल्या आहेत.

सुतक कालावधी कधी सुरू होईल?

वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण 28 ऑक्टोबर रोजी शरद पौर्णिमेच्या दिवशी होणार आहे. हे ग्रहण 30 वर्षांनंतर शरद पौर्णिमेच्या दिवशी होणार आहे. त्याचा सुतक कालावधी सुमारे 9 तास आधी सुरू होईल. अशा परिस्थितीत गर्भवती महिलांनी काही खास नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

गरोदर महिलांनी ग्रहण काळात या नियमांचे पालन करावे

ज्योतिष शास्त्रानुसार गरोदर महिलांनी चंद्रग्रहण पाहणे टाळावे. या काळात घराबाहेर पडणेही टाळावे.

ज्योतिष शास्त्रानुसार गरोदर महिलांनी घरातील अशा ठिकाणी थांबावे, जिथे ग्रहणाच्या किरणांचा प्रभाव पडू शकत नाही.

शास्त्रानुसार गरोदर महिलांनी चंद्रग्रहणाच्या दिवशी जास्तीत जास्त विष्णु सहस्त्रनाम पठण करावे. महिलांनी पूजेवर लक्ष केंद्रित करावे, परंतु या काळात महिलांनी मंदिरात जावू नये.

गर्भवती महिलांनी या कात अन्न ग्रहण करू नये. ग्रहणाच्या किरणांमुळे अन्न दुषीत होते. तसेच ग्रहण झाल्यानंतर मिठाच्या पाण्याने घर पुसावे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही) 

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?