AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शुक्र-बुध युतीने बनतोय महालक्ष्मी योग: ‘या’ चार राशींना मिळणार फायदा

ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा एखादा ग्रह आपली राशी बदलतो तेव्हा ग्रहांचा संयोग होतो. ग्रहांच्या संयोगाचा प्रभाव सर्व राशींवर होत असतो. तथापि, या काळात ग्रहांचा एखाद्या राशीवर विशेष प्रभाव असतो, तर काही राशींवर त्याचा कमी प्रभाव पडतो. शुक्र स्वतःच्या राशीत वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत बुध देव आधीच विराजमान आहे. अशा स्थितीत बुध आणि शुक्र यांच्या […]

शुक्र-बुध युतीने बनतोय महालक्ष्मी योग: 'या' चार राशींना मिळणार फायदा
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jun 20, 2022 | 1:19 PM
Share

ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा एखादा ग्रह आपली राशी बदलतो तेव्हा ग्रहांचा संयोग होतो. ग्रहांच्या संयोगाचा प्रभाव सर्व राशींवर होत असतो. तथापि, या काळात ग्रहांचा एखाद्या राशीवर विशेष प्रभाव असतो, तर काही राशींवर त्याचा कमी प्रभाव पडतो. शुक्र स्वतःच्या राशीत वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत बुध देव आधीच विराजमान आहे. अशा स्थितीत बुध आणि शुक्र यांच्या संयोगाने महालक्ष्मी योग (Mahalakshmi yog) तयार होत असल्याचे तज्ञांचे मत आहे. ज्योतिषशास्त्रात शुक्र हा विलास, संपत्ती, प्रणय आणि ऐश्वर्य इत्यादींचा कारक मानला जातो. दुसरीकडे, बुध ग्रह बुद्धी, तर्क, संवाद आणि कारक मानला जातो. काही राशींना 18 जून रोजी तयार होणाऱ्या महालक्ष्मी योगाचा विशेष लाभ होईल. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

  1. वृश्चिक- या राशीच्या लोकांसाठी महालक्ष्मी योग शुभ सिद्ध होऊ शकतो. या योगाच्या प्रभावाने उत्पन्न वाढू शकते. तसेच व्यवसायात आर्थिक लाभ होऊ शकतो. या व्यतिरिक्त या राशीच्या लोकांचे वैवाहिक जीवन किंवा प्रेम जीवन सुखकर असणार आहे. जीवनात आनंद मिळेल. मित्रांचे आणि  जोडीदाराचे सहकार्य मिळेल.
  2. सिंह – ज्योतिषशास्त्रानुसार या राशीच्या लोकांच्या कुंडलीच्या दहाव्या घरात महालक्ष्मी योग तयार होणार आहे. या योगाच्या शुभ प्रभावाने करिअरमध्ये प्रगती होण्याची दाट शक्यता आहे. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली ऑफर मिळू शकते. तसेच व्यवसायात प्रगती होऊ शकते. नोकरदार लोकांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते.
  3. मेष- या राशीच्या लोकांच्या कुंडलीत दुसऱ्या घरात महालक्ष्मी योग तयार होणार आहे. कुंडलीचे दुसरे घर धन आणि वाणीचे मानले जाते. अशा परिस्थितीत या काळात अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. रोखलेले पैसे मिळू शकतात. तसेच, या काळात आर्थिक स्थितीत महत्त्वपूर्ण बदल होऊ शकतात. हा योग अतिशय शुभ सिद्ध होईल.
  4. कर्क- ज्योतिषशास्त्रानुसार या राशीच्या उत्पन्नाच्या घरात महालक्ष्मी योग तयार होणार आहे. त्यामुळे उत्पन्नात वाढ होऊ शकते. व्यवसायात आर्थिक प्रगतीचे योग येतील. तसेच, व्यवसायात मोठी डील निश्चित केली जाऊ शकते. याशिवाय या काळात माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?